मुलगा झाला हो भाग 2
मागील भागात आपण पाहिले की श्रीरंग दुसरा चान्स घ्यावा म्हणून मागे लागला आहे. सुमेधा त्याला ठाम नकार देते. राघव आणि सुधाताई यांनाही घरात दुसरे बाळ यावे असे वाटते. आता पाहूया पुढे.
सकाळी सकाळी छान लताबाईंच्या आवाजात लागलेले अभंग ऐकत सुमेधा स्वयंपाक करत होती. घरातील सगळे आवरून आज ती श्रीरंगसोबतच शाळेसाठी बाहेर पडली. गाडीत बसली आणि आईचा फोन आला. थोडावेळ बोलल्यावर अचानक सुमेधा चिडली.
"आई,हा फोनवर बोलायचा विषय आहे का? मी येईल घरी तेव्हा बोलू." सुमेधाने फोन ठेवला.
" सगळ्यांना आपली मुल हवीत. ज्यांना मुलगा आहे त्यांना मुलगी आणि मुलगी आहे त्यांना मुलगा. अरे बाईच्या मनाचा विचार आहे की नाही?" सुमेधा चिडून बोलली.
" पाणी घे."
श्रीरंगने पाण्याची बाटली तिच्या हातात दिली.
" आता शांतपणे सांग काय झाले?" श्रीरंग हसून म्हणाला.
" ह्या तुझ्या सासूबाई मला सांगत होत्या की दादा किंवा वहिनी कोणाला तरी सांग दुसरा चान्स घ्या. एक मुलगी आहे तर एक मुलगा हवा. ते काही गणितात असलेलं समीकरण आहे का?" सुमेधा वैतागली होती.
शाळेत आज वेशभूषा स्पर्धा होती. मुली अगदी नटून थटून आल्या होत्या.
बापट बाई म्हणाल्याच,"मला खूप हौस मुलीची पण दुसराही मुलगाच झाला."
सुमेधाचा मुड ऑफच होता.
सुमेधाचा मुड ऑफच होता.
दुपारी अचानक आईचा फोन आला.
" अग पुढच्या आठवड्यात सुट्ट्या आहेत तर सुधाताई आणि राघव दोघांना पाठव इकडे."
"त्यांना विचारून सांगते." एवढेच बोलून सुमेधाने फोन ठेवला.
"त्यांना विचारून सांगते." एवढेच बोलून सुमेधाने फोन ठेवला.
घरी आल्यावर पाहते तर आजी आणि नातू तिकडे जायला तयारच होते.
" तिकडे मामाची स्वरा असते खेळायला. इकडे एकट्याला कंटाळा येतो."
सुमेधा कपाळावर हात मारून आत गेली. संध्याकाळी श्रीरंग आल्यावर पुढचे चार दिवस आपण दोघेच असल्याचे समजले आणि मन में लड्डू फुटा.
श्रीरंग आणि सुमेधा दोघेच घरी असण्याचा हा योग खूप दिवसांनी घडला होता.
" सुमेधा नाटकाला जाऊया?" श्रीरंग गोड आवाजात म्हणाला.
" सुमेधा नाटकाला जाऊया?" श्रीरंग गोड आवाजात म्हणाला.
" श्री पाऊस येतोय रे खूप बाहेर. त्यापेक्षा घरीच एखादा रोमँटिक मूवी पाहूया." सुमेधाने सुचवले.
पावसाचा रंग बघून हा देखील प्रस्ताव छानच असल्याचे त्याने ताडले.
"फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे?" श्रीरंग आनंदाने म्हणाला.
" ये नाही हा सब टायटल वाचण्यात माझा वेळ जातो सगळा." सुमेधाने नाराजी दर्शवली.
" मग तू सांग?" श्रीरंग म्हणाला.
" मग तू सांग?" श्रीरंग म्हणाला.
" दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे!" दोघेही एकदम म्हणाले.
" श्री तुला आठवत ह्याच चित्रपटाला गेलो असताना तू मला प्रपोज केलेले." सुमेधा गोड लाजली.
सुमेधा आणि श्रीरंग छान चित्रपट पाहू लागले. जसजसा चित्रपट पुढे सरकू लागला दोघांमध्ये असलेले अंतर कमी होऊ लागले. सुमेधा नकळत श्रीरंगच्या खांद्यावर डोके ठेवून चित्रपट पाहू लागली. श्रीरंगचे उष्ण श्वास तिला जाणवत होते तर तिची नाजुक बोटे छातीवर फिरताना श्री केव्हाच पंचविशीत पोहोचला होता. थोड्याच वेळात प्रणय रंगात आला आणि तृप्त मनाने दोघेही झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सुमेधा उठली आणि जोरात ओरडली," श्री लवकर उठ."
" सुमेधा यार रविवार आहे. झोप निवांत." तिला जवळ ओढत श्रीरंग म्हणाला.
" श्री जागा हो. काल रात्री आपण प्रोटेक्शन वापरले नाही." सुमेधा किंचाळली.
" अग ये,केवढ्याने ओरडते? शेजारच्या काकू भिंतीला कानच लावून असतात."
श्रीरंग ओरडला तरी काल रात्री झालेली चूक त्याला आठवली होती.
" काही नाही होत. एकदा विसरलो तर." त्याने उसने अवसान आणले.
" बघ हा श्री?"
सुमेधा अजूनही साशंक होती.
श्रीरंगने तिची कशीबशी समजूत काढली.
सुमेधा अजूनही साशंक होती.
श्रीरंगने तिची कशीबशी समजूत काढली.
शनिवारी सकाळची शाळा असल्याने सुमेधा काहीही न खाता धावत शाळेत पोहोचली. समोरून दाते मॅडम येत होत्या. त्या छान अत्तर लावत. सुमेधा त्याबद्दल त्यांचे नेहमी कौतुक करत असे.
" सुमेधा जाईचा सुगंध असलेले अत्तर लावले आहे आज." त्यांनी हात पुढे केला आणि सुमेधाला एकदम मळमळले ती पटकन बेसिनकडे धावली.
उलटी झालीच नाही. तितक्यात कामिनी स्टाफ रुममध्ये आली.
" अय्या,सुमेधा गूड न्यूज की काय? ह्यावेळी जिजू सारखी देखणी मुलगी होऊ दे."
कामिनी पटकन म्हणाली.
कामिनी पटकन म्हणाली.
"कामिनी अग काही जिभेला हाड आहे की नाही? सकाळी काही खाल्ले नाहीय. ॲसिडिटी असेल."
सुमेधा पटकन म्हणाली.
कामिनी गप्प बसली तरी सुमेधा नकळत मनात गणित मांडू लागली. आपली डेट उलटून पाच दिवस झाल्याचे तिच्या लक्षात आले. आता मात्र तिला पंधरा दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग आठवला आणि सुमेधा शांत झाली. घरी जाताना तिने प्रेग्नंसी किट घेतले.
घरी जाऊन सुमेधा शांत बसली. सासूबाई अशी ही बनवाबनवी पहात होत्या. सुमेधा आत जाऊन चेक करत होती. दोन लाल रेषा उमटल्या होत्या आणि बाहेर गाणे वाजत होते.
कुणीतरी येणारं येणार ग पाहुणा घरी येणार येणार ग.
सुमेधा प्रचंड चिडली होती. आता श्रीरंग घरी यायची वाट पाहू लागली. तिचे डोकेच बंद झाले होते.
काय होईल पुढे?
सुमेधा काय निर्णय घेईल?
वाचा अंतिम भागात.
©® प्रशांत कुंजीर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा