मुलगी नको...!
भाग १
रात्री जेवण आटपून प्रिया आणि सुहास बेडरूममध्ये बेडवर लाइट्स बंद करून एकमेकांच्या मिठीत शांत पडून सुख दुःखाच्या गोष्टी करत होते.
प्रिया आता पुन्हा आई होणार असते.
ते दोघे व त्यांच्या घरचे सगळेच फार आनंदात असतात. त्यांच्या सोबत सुहासचे आई वडील देखील राहत असतात.
ते दोघे व त्यांच्या घरचे सगळेच फार आनंदात असतात. त्यांच्या सोबत सुहासचे आई वडील देखील राहत असतात.
बोलता बोलता प्रिया मध्येच थांबून कसला तरी विचार करू लागते. तिच्या चेहऱ्यावर चिंता आणि उदासी दाटून येते.
ती अचानक सुहासला बोलू लागते
"अहो ऐकता का?"
"अहो ऐकता का?"
तिच्या बोलण्यातला चिंतेचा स्वर ओळखून सुहास तिला काय झाल्याचं विचारू लागतो. त्यावर ती त्याला बोलते,
"आपल्या ह्या बाळाला आपल्या सोनू सारखं काही होणार तर नाही ना?"
इतकं बोलून ती मुसमुसून रडू लागते.
"आपल्या ह्या बाळाला आपल्या सोनू सारखं काही होणार तर नाही ना?"
इतकं बोलून ती मुसमुसून रडू लागते.
सोनू म्हणजे त्यांची पहिली मुलगी. जिचा ४ वर्षाची असतानाच अपघाती मृत्यू झाला होता. प्रियाचा ती जीव की प्राण होती.
ती तिला कधीच विसरू शकत नव्हती. पहिल्या मुलीला गमावल्यामुळे तिच्या मनात दुसऱ्या मुलाला गमवायची भीती दाटून राहते. तिच्या मनातील भीती ती सुहासला बोलून दाखवते.
सुहास तिला आणखीन जवळ घट्ट मिठीत घेऊन तिचे डोळे पुसत तिची समजूत काढू लागतो. तिच्या लांब मोकळ्या केसांवरून हात फिरवत तिला शांत झोपवतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिला जाग येते तेव्हा तिच्या शेजारी सुहास नसतो. तो आधीच उठून तयारी करत असतो. आज त्यांना एकत्र हॉस्पिटलला प्रियाच्या चेक अपसाठी जायचं असत. तिला उठायला उशीर झालेला असतो. ती जागेवरून गडबडीत उठत असताना सुहास तिथे येतो आणि हळूच प्रेमाने तिला उठवू लागतो. ह्या दिवसात तो तिची अधिकच काळजी घेत होता.
हे तिला जाणवत होतं. त्याने ती खूप आनंदीदेखील होती.
हे तिला जाणवत होतं. त्याने ती खूप आनंदीदेखील होती.
सुहासचा स्वतःचा गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय होता. त्याच्या कडे स्वतःच्या ४ गाड्या होत्या म्हणून तो जास्त वेळ घरातच असतं. गाड्यांसाठी दुसरे ड्रायव्हर ठेवले होते.
हॉस्पिटलला जाण्यासाठी सगळे तयार झाले सुहासचे आई वडील देखील त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार झाले. सुहासने गाडी आणून घरासमोर उभी केली. प्रिया आणि सुहासचे आई बाबा मागून येऊन गाडीत बसले आणि ते सगळे हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी निघाले.
काही वेळातच ते हॉस्पिटलला जाऊन पोहोचतात. तिथे जाऊन प्रिया च्या सगळ्या टेस्ट झाल्यावर तिची प्रकृती अगदी उत्तम असल्याचं कळतं. त्यासोबत त्यांना अजुन एक गोष्ट कळते की प्रिया पुन्हा एकदा मुलीला जन्म देणार आहे.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा