Login

मुलगी नको...! | भाग २

जन्माला आलेल्या छोट्याश्या मुलीची दुःखद कहाणी...!
मुलगी नको...!

भाग २

ते ऐकून प्रियाला अतिशय आनंद होतो. तिला वाटत तिच्या पोटी पुन्हा तिची सोनू च जन्म घेणार आहे. अस ती सुहास आणि त्याच्या आई बाबांना देखील आनंदाने बोलून दाखवते.

हॉस्पिटलची सगळी प्रक्रिया आटपून ते त्यांच्या घरी निघून जातात. घरी येण्यासाठी त्यांना जवळ जवळ संध्याकाळच होते. म्हणून दुपारच जेवण ते बाहेरच करून घेतात.

घरी येऊन प्रिया तिच्या सासू सोबत घरच्या कामांना लागते. घर ची काम आणि रात्री च जेवण लवकर आटपून तिला लवकर च झोपायच होत. दिवसभर बाहेर असल्यामुळे तिला थकवा जाणवत होता. बघता बघता घरातील सर्व कामे आटपून ते सगळे जेवण करून घेतात. जेवण झाल्यावर प्रियाची सासू तिला जाऊन आराम करायला सांगते. जेवणानंतर ची राहिलेली कामे ती स्वतः आवरू लागते.

तिच्या सासूच्या बोलण्याला मान देत प्रिया त्यांच्या रूम मध्ये जाऊन बेड वर पडल्या पडल्या तिला कधी झोप लागते तिचं तिला च कळत नाही.

मध्यरात्री जवळपास दोन वाजता कसल्या तरी आवाजाने तिला जाग येते. जाग आल्यावर ती तिच्या शेजारी हाताने चाचपून बघते पण तिला कळते की सुहास तिच्या शेजारी नाही. ती तशीच डोळे चोळत तिच्या जागे वर उठून बसते. झोपेत असताना तिला कसला आवाज आल्याचा विचार करू लागते. विचार करता करता किती वाजले ते बघण्यासाठी बाजूला असलेला फोन हातात घेते. फोन मध्ये बघते तर २ वाजायला १० मिनिट बाकी असतात. फोन तसाच हातात ठेवून सुहास कुठे गेला असल्याचा ती विचार करू लागते.

विचार करत असतानाच तिच्या कानावर पुन्हा तोच मगासचा आवाज ऐकू येतो. पण ह्या वेळी तो मगासपेक्षा थोडा स्पष्ट च ऐकू येत होता. तो कोणाचा तरी मुसमुसत रडण्याचा आवाज होता. तिला कळेना की, तो कोणाचा आवाज आहे. तो आवाज त्यांच्या रूम च्या बाहेरून येत होता. ती तशीच हातात फोन घेऊन कोण रडत असल्याचं बघण्यासाठी त्या आवाजाच्या मागावर चालू लागते.

घरात सगळी कडे भिन्न काळोख असतो सर्वत्र नीरव शांतता पसरलेली असते. तिच्या कानांना ऐकू येत होता तो हळू हळू रडण्याचा स्वर. रूम बाहेर आल्यावर तो आवाज तिला सुहास च्या आई बाबांच्या रूम मधून येत असल्याचं जाणवतं. ती हळू हळू दबक्या पावलांनी त्यांच्या रूम जवळ जाऊ लागते.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
0

🎭 Series Post

View all