Login

मुलगी नको...! भाग ३ (अंतिम)

जन्माला आलेल्या छोट्याश्या मुलीची दुःखद कहाणी...!
मुलगी नको |

भाग ३ (अंतिम)

रूमच्या जवळ पोहोचताच तो रडण्याचा आवाज थांबून तिच्या कानावर कोणच तरी बोलणं ऐकू येत ते स्पष्ट ऐकू यावं म्हणून ती त्या रूम च्या दरवाजा जवळ जाते. दरवाजा थोडा उघडा असतो.

आता आत बोलत असलेले शब्द तिच्या कानावर स्पष्ट ऐकू येतात
" कसली रे तुझी बायको सुहास एक मुलगी मेली तरी दुसरी पण मुलगी च जन्माला घालायची आहे तिला."
ते शब्द ऐकून प्रियाच्या काळजात चर्र होते. तो आवाज तिच्या सासूचा असतो.

ती लगेच च स्वतःला सावरुन तिच्या हातातील फोन चा कॅमेरा चालू करून दरवाजाच्या थोड्या जागेतून आतल्या त्यांच्या बोलण्याची व्हिडिओ काढू लागते.

तिच्या सासू नंतर तिचा नवरा सुहास पुढे बोलू लागतो,
" हो ना यार आई एक तर मुलगी नको म्हणून कसं तरी त्या पहिल्या मुलीला मारून टाकली होती वाटलं होत हा दुसरा तरी मुलगा असेल पण आता पण मुलगीच."
त्याच ते बोलणं ऐकून तर प्रियच्या अंगातील अवसानच गळून पडते.

तिच्या लाडक्या मुलीचा तिच्या नवऱ्याने च खून केला होता. तिला तिच्या कानांवर विश्र्वासच बसत नव्हता. त्यातून पण ती स्वतःला सावरुन त्यांचं बोलण पुढे ऐकत फोन मध्ये रेकॉरडिंग करू लागते.

सुहास च बोलणं संपताच त्याचे बाबा पुढे बोलू लागतात,
"हो तिला मागच्या वेळेस फिरायला म्हणून घेऊन गेलास आणि स्वतःच गाडी खाली टाकलस तो अपघात सिद्ध झाल्यामुळे आपल्यावर कोणाला संशय च आला नाही तसचं ह्या वेळेस ह्या मुलीला आधीच संपवायचं जन्माला च येऊ द्यायचं नाही."

त्यांच्या बोलण्यावर सुहास त्यांना पुढे बोलू लागतो
"ठीक आहे मी उद्याच माझ्या डॉक्टर मित्राला भेटून काही तरी औषध आणतो आणि मग त्या मुलीचा पोटात असतानाच खातमा करून टाकू."
इतकं बोलून तिघे ही क्रूर पने हसू लागतात.

प्रिया तिच्या फोन ची रेकॉर्डिंग बंद करून त्यांच्या रूम मध्ये जाऊन दार लाऊन बेड वर बसून रडू लागते. रडत असतानाच तिला पुन्हा तोच मगासचा रडण्याचा आवाज ऐकू येतो ती डोळे पुसत समोर च्या कोपऱ्यात बघते. तिथे तिला एक लहान मुलगी ची सावली गुडग्यात तोंड घालून रडत असल्याचे दिसते.

ती तिला कोण असल्याचं विचारू लागते. त्या वर ती लहान मुलगी रडायचं थांबवून हळूच ' आई....' म्हणून प्रियाला हाक देते. ते ऐकून प्रिया लगेचच तिच्या जवळ धावत जाऊन रडत बोलू लागते
"बाळ सोनू...मला सगळ सत्य कळलं आहे मी तुला न्याय मिळवून देईन, मला फक्त एक वचन दे की आता माझ्या पोटी पुन्हा तूच जन्म घेशील."

प्रियाच ते बोलणं ऐकून त्या लहान मुली ची सावली हळूच मान वर करून प्रिया कडे बघून स्मित हास्य करते आणि बघता बघता ती अदृश्य होऊन जाते.

सकाळी प्रिया लवकर उठते. रात्र भर झोप नसल्या मुळे तिला अशक्त जाणवत होते. त्यात ती लवकर उठून कुठे तरी जाण्याची तयारी करत होती. तिची ती तयारी ची गडबड बघताना. सुहास तिला कुठे जात असल्याचं विचारू लागतो. त्यावर तिला तिच्या आई बाबांची खूप आठवण येते असल्याचं बोलून त्यांना जाऊन भेटून येण्याचं सांगते. तो तिला गाडीतून सोडून येण्याचं सुचवतो. पण त्यांचं घर जवळच असल्यामुळे ती स्वतःच तिथे जाण्याचं त्याला सांगते.

ती निघून तिच्या आई बाबांच्या घरी पोहोचते तिथे पोहोचून घडला सगळा प्रकार ती तिच्या आई बाबांना आणि भावाला सांगते. सोबत आणलेला तो व्हिडिओ त्यांना दाखवते. त्या सोबत तिने घेतलेला निर्णय त्यांना सांगते की ,
" आई बाबा आणि दादा मी माझा निर्णय घेतलाय, मी माझ्या सोनूच्या मारेकऱ्यांना शिक्षा देणार आणि माझ्या मुलीचा आयुष्यभर मी एकटी सांभाळ करणार, तिला खूप शिकवून खूप मोठी बनवणार."

तिचा निर्णय ऐकून तिच्या घरचे देखील तिच्या पाठीशी असल्याचे तिला सांगतात. तिचा भाऊ आणि बाबा तिला घेऊन पोलिसांकडे जातात. पोलिसांना व्हिडिओ सोबत सगळी हकीकत सांगून पोलिसांसोबत  सुहासच्या घरी जातात. मिळालेल्या पुराव्यासोबत पोलीस त्या तिघांनाही अटक करून घेऊन जातात.

पुढे प्रिया एका छान गोंडस मुलीला जन्म देते आणि तिच्या सोबत तिचा सांभाळ एकटीच करत छान आयुष्य जगू लागते.

समाप्त.

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
0

🎭 Series Post

View all