चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा फेरी ( संघ कामिनी )
लघुकथा फेरी ( संघ कामिनी )
शीर्षक : मुलीच्या जातीने
"राजेश एवढा नारळ फोडून दे." आजीने राजेशला नारळ फोडून देण्यासाठी हाक मारली होती तेव्हा प्रज्ञा तिथेच होती.
ती म्हणाली, "आजी मी फोडू का?"
"मुलींनी नारळ फोडायचा नसतो तुला माहीत नाही का? आपल्या घरात पुरुष नारळ फोडतात, बायका नाही." आजी म्हणाली.
"मुलींनी नारळ फोडायचा नसतो तुला माहीत नाही का? आपल्या घरात पुरुष नारळ फोडतात, बायका नाही." आजी म्हणाली.
"असं काही नसतं आजी, आमच्या शाळेत एका कार्यक्रमाला आलेल्या बाईंनीच नारळ फोडून कार्यक्रमाचे उद्घाटन केले होते. बायका, मुली नारळ फोडू शकतात, त्याने काही होत नाही." आठवीत शिकत असलेली प्रज्ञा म्हणाली.
तसा आजीचा संताप झाला. स्वयंपाकघरात घरातील महिला काम करत होत्या.
आजी प्रज्ञाच्या आईला रेवतीला बोलली, "हिची जीभ लई चुरुचुरु चालायला लागली हाय आजकाल, जरा शहाणपणा शिकव तिला! 'पोरीच्या जातीने' एवढे दाट बोलू नये."
यावर कुणीच काही बोलले नाही; पण पोरींची पण एक जात असते हे ऐकून प्रज्ञा मात्र हिरमुसली.
सुलभाताईंच्या पुढे कुणाचे काही चालायचे नाही. एकत्र कुटुंब होते, ज्यात तिच्या सुना एक शब्दही उलट बोलत नसायच्या.
त्या घरात महिलांना दुय्यम स्थान होते. त्यांच्या मनाचा कधीच विचार केला जात नसे. बायकांनी बोलायचं, बसायचं तेही माजघरात, डोक्यावर कायम पदर घ्यायचा. पुरुषांच्या समोर यायचं नाही की त्यांच्याशी फार बोलायचंही नाही.

त्यांच्या घरात पहिली पुरुष आणि मुलांची जेवणाची पंगत पडत असे, मुली आणि महिला त्यानंतर जेवणार. जे उरले असेल जेवण तेच खायचे. कधी महिलांच्या पंक्तीला भाजी कमी पडायची तर कधी भाकरी; पण जे उरले असेल तेवढेच सगळ्या जणींनी खायचे. सासूबाई सुलभाबाईंचा सर्व घरावर वचक होता.
घरात दूधदुभते होते; पण दूध मुलांना प्यायला दिले जायचे, मुलींना नाही. लाडू बनवले तर पहिले मुलांच्या हातावर ठेवले जायचे. मुलांना दुधाची, पौष्टिक खाण्याची जास्त गरज असते, पुढे जाऊन ते काम करतात म्हणून पुरुष आणि मुलांना दूध आणि इतर पौष्टिक खाऊ जेवण मिळेल याकडे सुलभाताईंचे लक्ष असायचे. मुलींना मात्र दूध आणि खाऊ मिळायचा नाही.
पूर्वीपासून म्हणजे सुलभाताईंच्या सासूबाई होत्या तेव्हापासून असेच घरात चालत आले होते.
घरातील मुली ओसरीवर, अंगणात खेळू लागल्यावर जास्त नाचू नका असा दम दिला जायचा. मोठ्याने बोलल्यावर, हसल्यावर मुलीच्या जातीने मोठ्याने हसू नये असं सांगायच्या. मुलींच्या प्रत्येक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवून मुलींच्या जातीने असं करू नये, तसं करू नये हेच बोलत राहायच्या. त्यांनी मुलींची नुसती गळचेपी करून ठेवली होती.
गौरी गणपतीच्या प्रसंगी गावातील मुली साडी नेसून नटूनथटून झिम्मा, फुगडीचे खेळ खेळायच्या, सुलभाताईंनी मात्र घरातील मुलींना, नातींना मुलींच्या जातीने फार नट्टापट्टा करू नये असे सांगितले होते. मुलींचे नटण्या-मुरडण्याचे वय; पण त्यांच्यावर खूप बंधने घातली होती. मुली नटल्या, मेकअप केला तर मुलांचे लक्ष आकर्षित करून घेतात, उगाच पिडा मागे लागू नये असे कितीतरी जुनाट विचार सुलभाताईंचे होते.

पण त्यांची नात प्रज्ञा आता आठवीत शिकत होती. तिला सगळे कळत होते. आजी जरा जास्तच बंधने घालत आहे हे तिच्या लक्षात येत होते.
प्रज्ञा हुशार होती. तिला वाचनाची आवड होती. एकदा शाळेत मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणारा कार्यक्रम आयोजित केला होता. मुलींना कराटे शिकण्यासाठी त्यातून प्रोत्साहन दिले होते. नंतर शाळेतही कराटेचे क्लास सुरू झाले. प्रज्ञाने तिच्या आईला हे गुपचूप सांगितले आणि तिच्याकडून कराटे शिकण्याची परवानगी मिळवली. ती कराटेचे धडे घेत होती; पण घरात तिच्या आई व्यतिरिक्त कोणालाही हे माहीत नव्हते.
नवरात्र सुरू झाली. घरात सगळ्या स्त्रियांचा उपवास होता. शुभमुहूर्तावर घटस्थापना केली. रोज फराळाचे पदार्थ घरात बनत असत. थोडीफार फळे आणि खिचडी असे महिलांना खायला मिळत असे.
अष्टमीच्या दिवशी आजीने देवीची ओटी भरण्यासाठी सुनांना जायला सांगितले. ती देवीसाठी ताटात ओटी साहित्य काढत होती. हिरवा ब्लाऊज पिस, नारळ, हळदी कुंकू, कंगवा, बांगड्या, देवीला फुलांचा गजरा असे सगळे शृंगाराचे साहित्य काढून झाले.
प्रज्ञाने ते बघितले आणि तिच्या आईला म्हणाली,
"देवीला सगळे शृंगाराचे साहित्य चालते; पण मग घरातील मुलींना का नाही?"
"देवीला सगळे शृंगाराचे साहित्य चालते; पण मग घरातील मुलींना का नाही?"
आजी त्यांचे बोलणे ऐकत होती. तिला प्रज्ञाचा खूप राग आला होता; पण सणाचा दिवस म्हणून ती गप्प बसली होती.
गावात मंडळाची देवी होती तिची ओटी भरायला घरातील सगळ्या महिला गेल्या. तिथे अष्टमीचे होमहवन सुरू होते. दुपारी एका महिला प्रवचनकाराचे प्रवचन ठेवले होते. नंतर आरती आणि महाप्रसादाचे आयोजन केले होते. सगळ्या ओटी भरून घरी आल्या आणि आता सुलभाताई शेजारच्या बायकांच्या बरोबर प्रवचनाला गेली. प्रवचन खूप छान होते. अन्यायाला विरोध करा, कुठल्याही क्षेत्रात मागे राहू नका असे सांगून प्रत्येक महिलेत एक दुर्गा असते असे प्रेरणादायी मार्गदर्शन प्रवचन करणाऱ्या बाईंनी केले.
काही विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांचा, मुलींचा त्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला, त्यात प्रज्ञाचाही समावेश होता. प्रज्ञाचे नाव ऐकून आणि तिला स्टेजवर पाहून सुलभाताई अवाक झाल्या होत्या. असं काय केलं आपल्या नातीने? हे
त्यांना कळले नाही. तेव्हा इतर मुलींनी एका मुलीचे रक्षण टवाळखोर मुलांपासून तुमच्या नातीने केले आहे, ती कराटेत पारंगत आहे असे सांगितले. हे ऐकल्यावर त्या अवाक झाल्या आणि त्या काही बोलूच शकल्या नाहीत. आज त्यांची बोबडी वळली होती.

घरी शाल, श्रीफळ, ट्रॉफी घेऊन आलेल्या नातीकडे आज त्या फक्त शांतपणे बघत होत्या.
प्रज्ञा आता कॉलेजमध्ये जात होती. एकेदिवशी दुपारच्या दरम्यान सुलभाताईंना चक्कर आली आणि त्या घरात कोसळल्या. ते पाहून घरातील सगळ्या महिला त्यांच्याभोवती जमा झाल्या. कोणी त्यांना पाणी देत होते, तर कोणी वारा घालत होते. तेवढ्यात कॉलेज शवरून घरी आलेल्या प्रज्ञाने भावाच्या स्कूटीवरून स्वतः सुलभाताईंना दवाखान्यात नेले. त्यांचा बी.पी. वाढला होता. डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट करून घेतले आणि अगदी वेळेवर त्यांना दवाखान्यात घेऊन आलात त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका टळला असे म्हणाले.
आज सुलभाबाईंना आपल्या नातीचा अभिमान वाटत होता.
त्यानंतर हळूहळू त्यांच्यात बदल दिसू लागला; पण स्वभावाला औषध नसते. परंपरेने आलेले मुलींबद्दलचे त्यांचे विचार पूर्णपणे बदलू शकत नव्हते; पण काही वेळा त्यांच्या ओठांवर आलेले शब्द 'मुलीच्या जातीने', तिथेच विरून जात होते.

समाप्त
©सौ. सुप्रिया जाधव
२९/९/२०२५
©सौ. सुप्रिया जाधव
२९/९/२०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा