सोहम आज सकाळच्या फ्लाइट ने घरी नागपुरला आला होता. 12 नंतर जो शिकण्यासाठी म्हणून घराबाहेर पड़ला तो असच 3-4 दिवसा करीता घरी येत असे. त्या वेळी आई पूर्ण त्याच्या सरबराइत व्यस्त राहत असे. पण या वेळी सोहम महिन्याभरा साठी आला होता. चांगला जॉब लागून सेटल झाला होता आता आई ने वधु संशोधनाचा चंग बांधला. म्हणून तो महीना भराची सुट्टी टाकून आला
आल्यापासून सोहम आईला बघत होता. आईच्या हालचाली टिपत होता आणि हसत होता
प्रसंग पहिला
दुपारची वेळ, आई टीवी बघताना रिमोट ने काम कारणे बंद केले. आईने रिमोटला दोन तीन वेळ हातावर ठोकले... रिमोट सुरु झाले. आज आईने रिमोट रिपेयर कारणाऱ्याच्या पोटावर पाय ठेवला ????????????
प्रसंग दूसरा
चहाच्या वेळी लाइटर बंद झाल. सोहम आईला म्हणाला आता कडेपेटी ने गॅस पेटव संध्याकाळी नवीन लाइटर आणतो. आई म्हणाली असू दे काही झाले नाही. थोड्या वेळात सुरु होईल अस म्हणत आईने लाइटर ठोकले त्यात फुंकर मारली आणि खिडकीत उन्हात ठेऊन दिले. संध्याकाळी लाइटर सुरु... आज लाइटर विक्रेत्याचे नुकसान झाले.
प्रसंग तीसरा
चटनी वाटताना मिक्सर बंद पडले. आईला सोहम म्हणाला आता याला रिपेयर करायला बाहेर न्यायच की हे पण तूच ठीक करणार.. आई म्हणाली अर्थात मीच.. अस म्हणत आईने मिक्सर ठोकले.. चकरी गोल फिरवली... आणि मिक्सर खालची लाल बटन सुरु बंद केली झाले मिक्सर सुरु... असे अनेक प्रसंग आले ज्यात आईने शिवणकाम, कारपेंटरी, प्लंबिंग, एलेक्ट्रीशियन असे अनेक रोल निघावले. सोहम जोरात हसला आणि म्हणाला आई माझ्या माते तुझ्या माराला फ़क्त मीच नाही तर घरातल्या सगळ्या वस्तुही घबरतात ठाऊक नव्हते. तू सर्जेन व्यतिरिक्त सर्व काही बनू शकते. आणि हो आई फार काही शिकली नाही. फ़क्त आर्ट ग्रेजुएट ????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा