मालतीबाई हसून म्हणाल्या,
"का हो!तुम्हालासुद्धा एखादी खास मैत्रीण आठवली की काय?"
हे ऐकून माधवराव आणखीनच चिडले,"काहीही काय बोलतेस मालू?असे काहीही नाही."
मालतीबाई मग आणखी चिडवत म्हणाल्या,"खरं ना सदाभाऊजी!"
मालतीबाई आत गेल्या. सदा मात्र चिडला,"माधव अरे अशी चिडचिड केलीस तर वहिनींना संशय येईल ना! आता इंदू येईपर्यंत आठ दिवस आपल्याला प्रयत्न करावे लागणार.
इतक्यात गौरी बाहेर आली. माधवराव आणि सदा जायला निघणार एवढ्यात गौरी म्हणाली,
"आजोबा मला ड्रॉप करा ना गरवारे जवळ,सोहमच्या आजीकडे जायचं आहे."
हे वाक्य ऐकताच माधवरावांचे डोळे चमकले. त्यांनी पटकन गौरीला लिफ्ट दिली.वाटेत ते विविध प्रकारे सोहमच्या आजीबाबत विचारत होते.
सोहमच्या आजीचं माहेरचं नाव काय? ते मूळचे कुठले आहेत? शिक्षण कुठे झालं? पण गौरी ताकास तूर लागू देत नव्हती.
उलट आता तिला संशय येऊ लागला. ती म्हणालीसुद्धा,
"आजोबा कधी माझ्या आजीबाबत एवढे प्रश्न विचारले नाहीत? नक्की भानगड काय आहे?"
एवढ्यात सदा बोलला,
"अरे आम्ही स्नेहमेळावा भरवत आहोत शाळेतील मित्र मैत्रिणींचा,त्यावेळी कस मुलींची नाव लग्नानंतर बदलायचे ना,म्हणून आम्ही चौकशा करतो."
गौरीने बारीक डोळे करून दोघांकडे पाहिले. ती काहीतरी बोलणार एवढ्यात माधवराव म्हणाले,
"गौरी उतरतेस ना!"गौरी घाईघाईत उतरली आणि यांना बोलायची संधीसुद्धा न देता निघून गेली.
मग यांनी वाडेश्वरकडे आपला मोर्चा वळवला. तिथे यांची गॅंग भेटत असे.दिन्या आणि सुधीर आधीच येऊन बसले होते.
हे दोघे येताच दिन्या सुरू झाला,"काय मग सापडली का कमल?"
माधवराव चिडले,"गप रे!ते मी आपलं असच..."
सुधीर हसला,"माधव,तुला आजही काहीच लपवता येत नाही हेच खरं."
दिन्या परत मध्येच बोलला,"दे टाळी!अरे तुला आणि सदाला दोघांनाही कमल आवडते हे अख्ख्या शाळेला माहीत होतं."
सदा चिडून म्हणाला,"आख्ख्या शाळेला नाही,फक्त पोरांच्या ग्रुपला."
तेव्हा दिनेश परत हसला,"माधव आमची सुमन,म्हणजे माझी धाकटी बहीण दोन वर्ग मागे होती, तरीही तिला माहीत होतं. शिवाय तिला कमल नंतर कॉलेज शिक्षण घेतानासुद्धा भेटलेली."
हे ऐकताच दोघांचे डोळे चमकले. ती चमक पाहून दिनेश घाबरला. त्याने सरळ हात जोडले,"मित्रांनो या वयात धाडस परवडणार नाही.त्यात सुमी चोंबडी लगेच आमच्या हिला जाऊन सांगेल."

तेव्हा सुधीर म्हणाला,"दिन्या लेका कर की एवढी मदत."दिनेश चिडला,"एवढी मदत???
तुला काय माहित मी किती दिव्य केलीत ते."सुधीर आश्चर्याने म्हणाला,"म्हणजे!मी नाही समजलो."दिनेशने तेवढ्यात डोसा आणि चहा ऑर्डर केला.त्यानंतर तो सांगू लागला.तुला तर माहीत आहेच,माझे वडील दामोदरराव आपल्याच शाळेत शिक्षक होते.
नुसतं नाव काढताच सुधीरचा हात कानाकडे गेला. सुधीर कान चोळत म्हणाला,
"आजसुद्धा शुद्धलेखन चुकलं तर सर कान पिळत असल्याचा भास होतो,पुढे बोल तू."
तर कमलच्या घरी माझे जाणे येणे असे. या सद्या आणि माधवने एक दिवस माधवच्या बागेतली फुल आणली आणि म्हणाले ही कमलसाठी नेऊन दे.एकतर आमच्या सुमिपासून काही लपत नसे.त्यात मोगऱ्याची फुल वास येणारच.
घरात जाताच म्हणाली,
"अय्या मोगऱ्याची फुले का?कोणी दिली?काहीच सुचेना.
तेवढ्यात तीर्थरूप आले आणि वाचलो. कमल माझ्या शेजारीच रहात असे. दहा वेळा प्रयत्न केला ती फुल द्यायचा आणि शेवटी तिच्या आईने पकडलंच.
मला हाक मारत म्हणाली,
"काय रे दिनेश? काय आणलं आहेस? मग धडधडीत थाप मारली. माधवच्या आईने देवपूजेला फुले दिलीत. "ऐकून सुधीर जोरजोरात हसला. तेवढ्यात दिनेश सर्वांना शांत करत म्हणाला,
"माधवने विचारलं तर कदाचित सुमी सांगेल कमलबद्दल."सदा त्रासून म्हणाला,"त्याला का सांगेल?"
सुधीर त्यावर हसला,
"सदया हा माधव हुशार,गुणी आणि सरांचा मुलगा म्हणून सर्वांना आवडायचा."
दिनेश हसत म्हणाला,
"नाहीतर काय?आमची सुमी कधीच याला राखी बांधत नसे.विचारलं तर थातूर मातुर उत्तर देई."
माधवराव ही चर्चा ऐकून लाजले.तेव्हा सुधीर म्हणाला,"माधव!आता हे वय लाजायच नाही."हो नाही करता करता शेवटी सुमनला विचारायचे असे ठरले.दोन दिवसांनी सुमनच्या घरी जाऊ .तिथे तिला विचारता येईल.अशी चर्चा डोसा संपवत फळाला आली.

माधवराव घरी आले.दुपारचे दोन वाजले होते.मालतीबाईंनी आवाज दिला,"अहो हात धुवून घ्या,पान घेते वाढायला."
माधवराव काही बोलणार एवढ्यात गौरी मागून येऊन पचकली,"आज्जी अग वाडेश्वरच्या डोश्यासमोर तुझं पथ्याचं कोण खाणार?"
एवढं बोलून गौरी आत पळाली.मालतीबाई रागाने पहात असताना माधवराव कसनुस हसत म्हणाले,"ते आपलं दिन्या खूप दिवसांनी भेटला ना म्हणून..."
मालतीबाईंनी रागाने गौरीला आवाज दिला,"गौरे ये ग बाई जेवायला.आपण इथं वाट पहात बसायची आणि इकडे लोक मस्त मित्रांबरोबर खातात पितात."
गौरीने आणखी आगीत तेल ओतले,"आज्जी फक्त खातात ग,पिणं झेपणार आहे का आता?"
माधवराव गप्प ऐकत होते.
मालतीबाई म्हणाल्या,"तुला सांगते गौरे छान आसावरी नाव होतं माझं".पण सासूबाई म्हणाल्या,"आमच्या ....ना मालती शोभेल हो!"
आजी रागात सुद्धा माधव न म्हणता टिंब टिंब म्हणाली याच गौरीला खूप हसू आलं.तेवढ्यात मालतीबाई म्हणाल्या,"अग ती त्या देशमुखने दिलेली मुरंब्याची बरणी घे.मी कॉलेजला असताना मला फार आवडे तिच्या हातचा मुरांबा." ते नाव काढताच माधवरावांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू फुललं.

सुमनकडून कमलचा पत्ता मिळेल का?हा मैत्रीचा मुरांबा परत गोड होईल का?वाचत रहा मुरांबा..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा