मागील भागात आपण पाहिलं की सुमतीला माधवने लिहिलेली चिठ्ठी सापडली. सुमती त्या चिठ्ठीच काय करेल? माधव आणि सदा काय भूमिका घेतील? कमलवर याचा काय परिणाम होईल? सगळे उलगडेल मुरंब्याची चव चविष्ट होत जाईल.वाचू या मुरांबा.
माधव, सदा आणि कमल चिठ्ठी प्रकरण पूर्णपणे विसरूनसुद्धा गेले होते. दहावीचे वर्ष असल्याने सगळ्यांचे लक्ष अभ्यासात होते. इकडे सुमती मात्र सतत कमलला कसे अपमानित करता येईल हेच पहात असे. अनेकदा ती आडून आडून तिला आई नसल्याबद्दल बोलत असे.
कमल मात्र अभ्यास सोडून कशातही लक्ष देत नसे. तो दिवस आजही माधवला जसाच्या तसा आठवतो त्या दिवशी शाळेत स्नेहसंमेलन जाहीर झाले. या कार्यक्रमात काय काय असणार याची रूपरेषा शाळेच्या गेटबाहेर फळ्यावर लावलेली असे. त्या दिवशी सगळेजण कमलकडे पाहून कुजबुज करत होते.
एवढ्यात कुंदा म्हणाली,
"कमे काय ग हे? एवढी हिंमत करशील अस वाटलं नव्हतं बाई."
कमल चिडून म्हणाली,
"कुंदा काहीही बोलू नकोस! मी काय केलंय?"
"कुंदा काहीही बोलू नकोस! मी काय केलंय?"
ते ऐकून गोदा फिसकन हसली,"घ्या हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा."
कमल पुढे बोलणार एवढ्यात सावित्रीने तिला बाजूला घेतलं. कमल सरळ शाळेच्या गेटकडे धावत निघाली. गेटवर सदासाठी माधवने लिहिलेली चिठ्ठी फळ्यावर लावली होती. कमल तडक घरी निघून गेली. मुलांचा गोंधळ ऐकून शिक्षक धावले. जोशीबाईंनी पटकन चिठ्ठी काढली. सगळे विद्यार्थी वर्गात पळाले. इकडे जोशीबाई प्रचंड संतापल्या. दिवसभर शाळेत फक्त तीच चर्चा चालू होती.
इकडे कमलच्या काकांपर्यंत ही गोष्ट पोहोचली. छोट्याशा गावात अशा गोष्टी काय लपून राहतात का? जोशीबाई घरी आल्या. सुमती अजून आली नव्हती. कमलची झालेली फजिती पाहून सुमती प्रचंड आनंदात गाणं गात ,उड्या मारत घरात शिरली.
तेवढ्यात बाईंचा धारदार आवाज घुमला,
"सुमती इकडे ये!"
सुमती समोर उभी राहताच काही कळायच्या आत तिच्या गालावर सनकन कानफटात बसली. ती काही बोलणार एवढ्यात बाई फक्त एकच वाक्य म्हणाल्या,
"खरं बोल!"
सुमती रडायला लागली. तिने चिठ्ठी सापडल्यापासून ते ती दिगंबरला देईपर्यंत सगळं सांगितलं. बाई आणखी चिडल्या,
"दिग्या? तो टवाळखोर! चल आताच्या आता कमलच्या घरी.तिचे पाय धरून माफी माग."
सुमती थरथर कापत आईबरोबर निघाली.
सुमती आणि आई कमलच्या घरी पोहोचल्याच तेवढ्यात आतून आवाज येऊ लागला.
बघा ! बहिणीच्या पोरीची थेर. आईविना पोर म्हणाला होतात ना. असे म्हणून मारल्याचे रडल्याचे आवाज येत होते. जोशीबाई आत गेल्या.कमलच्या काकांचा तिला मारणारा हात थांबला. एखाद्या जनावराला माराव तस कमलला मारल होत. बाई चिडल्या,"माणसं आहात की कोण? बिचाऱ्या मुलीवर प्रसंग काय आलाय? त्यानंतर तिथे काय झालं कोणालाच माहीत नव्हतं.
बघा ! बहिणीच्या पोरीची थेर. आईविना पोर म्हणाला होतात ना. असे म्हणून मारल्याचे रडल्याचे आवाज येत होते. जोशीबाई आत गेल्या.कमलच्या काकांचा तिला मारणारा हात थांबला. एखाद्या जनावराला माराव तस कमलला मारल होत. बाई चिडल्या,"माणसं आहात की कोण? बिचाऱ्या मुलीवर प्रसंग काय आलाय? त्यानंतर तिथे काय झालं कोणालाच माहीत नव्हतं.
पण सुमती मात्र आरपार बदलून गेली.सतत बडबड करणारी,उत्साही सुमती हरवली. त्या घटनेनंतर कमल अभ्यास सोडून काहीच करत नसे. कोणाशी बोलतसुद्धा नसे. हा हा म्हणता दहावीचे वर्ष संपले आणि आज इतक्या वर्षांनी माधव आणि सदा सुमतीला भेटणार होते.
भोरजवळ गाडी पोहोचली. गावातच जुना पण आधुनिक वाडा होता. सुमती आपल्याला ओळखेल का? दिनकरने शंका काढली. आता काहीही होवो माघार नाहीच. सदाने कडी वाजवली. आतून एक बाई बाहेर आली.
सदाने विचारलं,
"सुमती जोशी इथंच राहतात का?"
"सुमती जोशी इथंच राहतात का?"
तशी ती बाई मांजरीसारखी फिस्करली,
"हिथ कुलकर्णी राहत्यात,वाचता येत ना आजोबा."
"हिथ कुलकर्णी राहत्यात,वाचता येत ना आजोबा."
तेवढ्यात आतून आवाज आला,
"गोदा!कोण आहे?"
"गोदा!कोण आहे?"
आव कोणीतरी सुमती जोशी पायजे यांना. पाठव बर आत. सदा,माधव आणि दिनकर आत आले. चौसोपी वाडा,आधुनिक सोयी आणि सुंदर सजावट. एवढ्यात कॉटनची चोपून नेसलेली साडी,नाकावर बारीक काडी असलेला चष्मा आणि चेहऱ्यावर हुशारीचे तेज असलेल्या एक आजीबाई आल्या.
हे तिघे नमस्कार करत असताना त्या चष्म्यातून हसत म्हणाल्या,
"सदा,माधव आणि दिन्या तुम्ही इथे?"
एवढ्यात सदा ओरडला,
"चष्मा घातला तरी आपरं नाक लपत नसत सुमे!"
"चष्मा घातला तरी आपरं नाक लपत नसत सुमे!"
सुमती म्हणाली,
"गोदा चहा टाक ग."
"गोदा चहा टाक ग."
आता सुमती या तिघांचा ताबा घेणार एवढ्यात एक आजोबा आत आले. तसा माधव ताडकन उभा राहिला,
"श्रीनिवास?"
"श्रीनिवास?"
मग सदकडे पाहून तो म्हणाला,
"सद्या अरे हा श्री.माझ्याबरोबर फर्ग्युसनला होता."
एवढ्यात सुमती म्हणाली,
"आणि हो!हाच तुमचा श्री या सुमती उर्फ इरावतीच कुंकू बरं का!"
या दोन मित्रांची भेट कमलपर्यंत घेऊन जाईल का?? वाचत रहा मुरांबा आंबट गोड.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा