Login

मुरांबा भाग 11

मैत्रीचा शोध आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला. काय घडेल पुढे?
मागील भागात आपण पाहिले की कमल पत्ता सापडून सुद्धा तिची भेट होऊ शकली नाही. दिनूने हे सांगताच माधव आणि सदा निराश झाले. मालतीबाईंच्या मैत्रिणी दोन दिवस आधी रहायला येणार हे ऐकूनच गौरी आणि माधवराव नाराज झाले. आता पाहूया पुढे.


मालतीबाईंच्या कोण मैत्रिणी येणार,त्या इथे तिथे फिरणार. गौरी आणि माधवराव आता फुल टेन्शध्ये आले.

गौरी हळूच माधवरावांच्या खोलीत गेली. आजी किचनमध्ये असलेली पाहून ती म्हणाली,"काय यार आजोबा! आता कोण येणार काय माहित."

माधवराव म्हणाले,"हो ना! मागच्या वेळी ती कोकणातील विमल आलेली."

गौरी वैतागली,"हो ना! आणि तिच्या नातवाशी मी लग्न करावं असाच हट्ट धरला."

माधवराव म्हणाले,"आणि मला काढे काय पाजले,पोथी काय ऐकवली."
एवढ्यात मालतीबाई आत आल्या,"काय खलबत चालली आहेत? थालिपीठ खाऊन घ्या. सोबत चहा पण आहे."

तसे दोघे सावध झाले. गौरी आजीकडे पहात म्हणाली,"आज्जी? काय काम आहे?"


तसे मालतीबाई हसत म्हणाल्या,"फार नाही,फक्त तुम्ही दोघांनी खोली आवरायला मदत करा.परवा येतील त्या दोघी."

सूचना देऊन मालतीबाई निघून गेल्या.

इकडे गौरी म्हणाली,"आजोबा दोन तीन दिवस आपण बाहेरच भटकू,फक्त झोपायला यायचं घरी."


माधवराव म्हणाले,"हो! असच करूया."

एवढ्यात मालतीबाईंनी जेवायला हाक मारली. गौरीचे आईबाबा सुद्धा आले होते.

गौरी धावत आली,"आई बाबा तुम्ही? अचानक कसे आलात."

ते बोलणार एवढ्यात मालतीबाई बोलल्या,"माझ्या काही वस्तू घेऊन आलेत ते. काही सूचना सुद्धा आहेत हो."


तसे गौरी आणि माधवराव गप्प झाले. तेवढ्यात गौरीची आई म्हणाली,"गौराई, आजीच्या मैत्रिणी येतील तेव्हा सर्वांनी घरी असायचं आहे."


गौरीचे बाबा मधवरावांकडे पहात म्हणाले,"सर्वांनी बरं का गौरी."


मग पुढच जेवण दोघांनी कसबस उरकलं आणि आईस्क्रीम आणायचं सांगून बाहेर पडले.



गौरी चिडली,"आजोबा,नॉट फेअर ह! आता आई बाबा पण इथं थांबणार."


तस माधवराव म्हणाले," नाहीतर काय? तुझा बाप आता माझ्यावर हुकूम गाजवतो. पहिल्यापासून आईच्या बाजूचा तो."


हे ऐकून गौरी म्हणाली,"आजोबा द्या टाळी! आपल्या एका टीम मेम्बर ला विसरलो आपण."

माधवराव म्हणाले,"कोण? सदा? छे! तो नाही कामी येणार."


गौरी म्हणाली,"अहो,सदा आजोबा नाही. मानसी आत्या."

येस असे म्हणून दोघांनी टाळी दिली. आता आपण दोघे दोन दिवस मानसी आत्याकडे जायचं हे दोघांनी ठरवलं. दोघे छान आईस्क्रीम घेऊन आले. गौरीने बेल वाजवली.


बेल उघडताच ती ओरडली,"आत्या तू?????"


माधवराव मागुन ओरडले,"मानसी तू??"


तशा मालतीबाई म्हणाल्या ,"मघाशी गौरीचे बाबा काय म्हणाले?"



सगळे घरी असायला हवेत. तशी मानसी म्हणाली,"मानससुद्धा येणार होता पण त्याची परीक्षा आहे आणि हे टूरवर गेलेत.मग आले मी."

गौरी आणि माधवरावांना आता काहीच करता येईना. एवढ्यात दिनूचा फोन आला.

माधवने फोन उचलला,"बोल दिन्या? काय म्हणतोय? काही समजलं का? तिकडून दिनूने काही माहिती सांगितली. तसे माधवराव आनंदी झाले.

ते गौरीला म्हणाले,"गौरे! कमलच्या मुलाचा नंबर मिळाला. दिनूने तिथे सोसायटी ऑफिसात सांगून ठेवलं होतं."


तशी गौरी म्हणाली,"वॉव! मग भेटा जाऊन."

माधवराव म्हणाले,"तो सध्या बाहेरगावी गेला आहे. त्याचा मुलगा कमलजवळ असतो."


गौरी म्हणाली,"मग मुलाचा नंबर घ्या,आपण कॉन्टॅक्ट करू."


माधवराव म्हणाले,"पाठवला आहे,पण या दिन्याचा प्रॉब्लेम त्याला आता रात्रीच दिसत नाही. नंबर सकाळी मिळेल."


गौरी म्हणाली,"आजोबा पण उद्याचा दिवस बाहेर पडणे अशक्य आहे."

तसे आजोबा म्हणाले,"गौरे,मी नाही पण तू कॉलेजला जातेस ना." तसे दोघे गूढ हसले.

एवढ्यात दरवाजा नॉक करत गौरीची आई आत आली.

गौरीने आईकडे पाहिलं,"आई म्हणाली,"गौरी,ऐक ना! उद्या सुट्टी घेशील."

तस गौरी म्हणाली,"आई! उद्या एक महत्वाचे लेक्चर आहे. नाही जमणार."

तशी गौरीची आई म्हणाली,"तुझी गाईड माझी मैत्रीण आहे,माहीत आहे ना. थांब आता फोन लावते."


आईने फोन लावला पण फोन लागलाच नाही. गौरीने हुश्श केलं.

तेवढ्यात गौरीची आई माधवरावांना म्हणाली,"बाबा! उद्या दिवसभर घरी थांबा. तुमची मदत लागेल. आईंनी मला खास सांगायला पाठवलं आहे."
गौरीची आई बाहेर गेली.


माधवराव म्हणाले,"गौरी,उद्या काहीही करून कमलच्या नातवाला भेटायचं तू."

गौरी हसली,"कूल आजोबा,मै हु ना।" फक्त तुम्ही फार सभ्य वागू नका. नाहीतर आई बाबा आणि आजीला संशय येईल. मी आत्याला सांगू का?"

तसे माधवराव म्हणाले,"नको! मानसीला यांनी आधीच त्यांनी त्यांच्यात घेतलं आहे." त्यात माझी मैत्रीण वगैरे म्हणजे परत ....नकोच ते. असे म्हणून दोघे झोपायला आपापल्या खोलीत गेले.


दुसऱ्या दिवशी माधवराव उठले तर किचनमध्ये जय्यत तयारी दिसत होती. माधवरावांनी आवाज दिला. मी वॉकला जातोय. ते बाहेर पडले एवढ्यात सदाचा फोन आला. माधव मी आज येत नाही वॉकला.


तसे माधवराव चिडून परत घरी आले. सद्याला काय झालं ? काय म्हणणार याला? तसे मालतीबाई हसल्या,"आज मी बोलावलं आहे भाऊजीना.

आज मस्त डोसे आणि सांबर आहे." तशी गौरी म्हणाली,"आजी...." तेवढ्यात गौरीची आई म्हणाली,"गौरी! तुला आणि आजोबांना डोसे आवडत नाहीत पण तुझ्या बाबांना फार आवडतात बरं!"



गौरी म्हणाली,"मी लवकर जाणार आहे आज." गौरीने हळूच आजोबांना खुणावल. त्यांनी नंतर नंबर पाठवतो असे असे सांगितले.


तेवढ्यात मालतीबाई म्हणाल्या,"आज कुलकर्णी आणि जाधव येतील बरं."


तसे माधवराव उठणार एवढ्यात गौरीचे बाबा म्हणाले,"बाबा, आपण दोघे जातोय हा स्टेशनवर."

तसे माधवराव चरफडत आत गेले. आज कमलचा नातू गौरीला भेटला की सगळं छानच होईल. असा विचार करत ते देवपूजेला लागले. अर्ध्या तासाने सदा आला.


माधवरावाना त्याने आवाज दिला,"माधव! माधव! लवकर ये." सदा मस्त दोसे हादडत होता." तेवढ्यात मालतीबाईंनी मस्त तांदळाचे घावन वाढले. तशी माधवरावांची कळी खुलली.


त्यांनी सदाला म्हंटल,"सदा,चल जरा बागेत बसू." तसे सदा म्हणाला,"चार फोन येऊन गेले,लवकर घरी पळतो."


सदा गेला. तेवढ्यात व्हाट्स अँप नोटिफिकेशन आल. दिनूने नंबर पाठवला होता. माधवरावांनी तो धडधडत्या हृदयाने गौरीला सेंड केला.


कोण असेल कमलचा नातू? मालतीबाईंच्या मैत्रिणी आल्यावर काय धमाल येईल? मैत्रीचा हा मुरांबा गोड कसा होईल?
वाचत रहा मुरांबा.
0

🎭 Series Post

View all