ऍमेझॉन प्राईम वर आवर्जून बघावा असा मराठी चित्रपट- must watch marathi film on Amazon prime

Must Watch Marathi Film On Amazon Prime
नमस्कार वाचकहो !!

आज मी चक्क कोणतीही कथा न लिहिता वेगळ्या विषयी आपल्याशी संवाद साधणार आहे . तर ऍमेझॉन प्राईम हे नाव तर सर्वांनी ऐकलेच असेल .. ऐकलेच काय आपल्या प्रत्येकाच्या घरात ऍमेझॉन प्राईम मोठ्या दिमाखात पोहचले आहे . तर ह्याच ऍमेझॉन प्राईम वर खूप छान सिनेमा ,वेबसेरीज आपण पाहू शकतो . पण कधी कधी ना काय पहायचे आहे हे ठरवायलाच वेळ लागतो आणि आपला रिकामा वेळ फुकट जातो .. असे माझ्या बरोबर तर बऱ्याचदा होते हे तुमच्या बरोबर पण झाले असेल निदान एकदा तरी . तर हे सगळे टाळण्यासाठी ईरा एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे त्याला आपण कंटेंट रायटिंग असे म्हणतो ..
तर मी आपल्या समोर ऍमेझॉन प्राईम वर असलेल्या असंख्य सिनेमातून नेमका चांगला सिनेमा बघण्यासाठी ,निवडण्यासाठी तुमची मदत करणार आहे . याचा फायदा असा होईल कि सिनेमा शोधण्याचा तुमचा वेळ वाचेल आणि तुमचा वेळ तुम्ही फक्त मनोरंजनासाठी वापराल नाकी नक्की कोणता सिनेमा पाहू यात घालवाल .
चला तर मंडळी आपण श्रीगणेशा करू ..
आज मी तुम्हांला मला आवडलेला एक मराठी सुंदर सिनेमा सांगणार आहे .. याचा अर्थ मी सिनेमाची कथा नाही सांगणार .. मी तुम्ही हा सिनेमा का बघावा हे सांगणार आहे
आजचा सिनेमा
नाव : मंगलाष्टक वन्स मोअर
मुळात नावच खूप आकर्षित करणारे आहे. त्यातली स्टार कास्ट ऐकल्यावर तर तुम्ही हा सिनेमा नक्कीच बघाल .हिंदी सिनेमातले शाहरुख आणि काजोल च्या हिट ऑनस्क्रीन जोडीचं त्या मराठी ऑनस्क्रीन जोडीशी तुलना केली जाते तीच जोडी म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका हँडसम नायक स्वप्नील जोशी आणि अत्यंत मेहनती, साधी ,अभिनयाची राणी मुक्ता बर्वे . अभिनयामध्ये मुरलेले हे कलाकार थेट आपल्या हृदयात शिरतात आणि आपल्याला वाटू लागते कि हि किंवा हा म्हणजे मीच आहे .
ह्या सिनेमाची अजून एक प्रभावी बाजू म्हणजे सिनेमातली गाणी .सर्वच गाणी इतकी सुंदर आहेत नक्कीच तुमच्या सॉंग्स कलेशन मध्ये तुम्ही जपून ठेवाल . हि गाणी जेव्हा पण ऐकाल तेव्हा मनाचा ठाव घेतील .. कधी नव्याने प्रेमात पडाल तर कधी डोळ्यातुन अचानकच अश्रू पडेल इतके आपल्या मनावर परिमाण करतात आणि ती गाणी , सिनेमा आपल्याला आपला वाटू लागतो .
या सिनेमातली सगळी गाणी निलेश मोहरीर नावाच्या संगीतकाराने संगीत बद्ध केली आहेत .
तोल माझा सावरू दे ...सर सुखाची श्रावणी नि नाचरा वळीव हा गुंतण्या आस वेडा जीव हा ....
किंवा
उसवले धागे कसे कधी .....
दिवस ओल्या पाकळयांचे जाणिवांना गंध ओले .. ..हे गाणे टायटल पडत असताना आहे .. स्क्रीनभर स्वप्नील आणि मुक्ता यांचे काही आनंदी क्षण टिपले आहेत .आपण तिथूनच त्यांच्या स्टोरीत गुंतत जातो ..

अतिशय सुंदर गाण्यांनी सजलेला हा सिनेमा आहे.
लॉन्ग ड्राईव्हला जाताना आपल्या कार मध्ये हि गाणी ऐकलीत तर तुमचा प्रवास आनंदी तर होईलच पण थोडासा रोमँटिक पण होईल.
सिनेमाची कथा अतिशय साधी आहे तितकीच भावनिक आणि खूप काही शिकवणारी आहे . सगळे एकदम परफेक्ट असताना सुद्धा त्यामध्ये काहीतरी कमी राहते आणि सुख आपल्या पासून लांब पळते आणि हे आपल्या बरोबर का होतंय हे सुद्धा कळत नाही उमगत नाही . लग्न म्हणजे दोघांचा एक प्रवास असतो जो दोघांनी हात धरून एकाच दिशेने केला पाहिजे .. पण जर एक जण तिथेच थांबला असेल किंवा त्याची वाट भरकटली असेल किंवा त्याला वाटच सापडत नसेल तर दोघांची हि घुसमट आणि ओढाताण होऊ शकेल .
सर्व जण नेहमी नक्की स्त्रियांना काय हवंय हे त्यांना कळत नाही म्हणून प्रॉब्लेम होतो असे म्हणतात. पण या सिनेमा मध्ये नक्की पुरुषांना काय हवंय किंवा नवऱ्याची विचार पद्धती काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय . नुसतीच फ्रीडम हवी आहे का ? बायको सोडून दुसरी कोणी हवीय का ? बायकोला कंटाळलाय का ? बायकोचं काय चुकतंय ? त्याची काय अपेक्षा आहे ? ती नक्की कुठे चुकतेय ? फक्त तिचीच चूक आहे का ? त्याची घुसमट तो कशी बाहेर काढतो ? तिची घुसमट ती कशी बाहेर काढते ?
असे अनेक प्रश्न जे त्या दोघांचे आहेत कि आपले पण आहेत असे आपल्याला वाटू लागते .
असे एक प्रेमळ जोडपं मनातून घाबरलेले असतात . नवऱ्याला ते खूप जाणवत असते कि आपण सुखी नाहीये. आणि ती प्रॉब्लेम ला समजून घेत नसून दुर्लक्ष करतेय आणि त्यामुळे एक वेगळीच घुसमट होतेय . असे क्षण खूप सुंदर रित्या सिनेमामध्ये दाखवले आहेत जे कि आपल्याला आपल्या नात्यात सुद्धा असे होऊ शकते अशी धोक्याची घंटा दाखवून देते .कारण उत्कृष्ट बायको असूनही, जिला नाव ठेवायलाही जागा नाहीये अशी असून सुद्धा नवरा सुखी नाहीये हा विचारच मुळात अस्वथ करणारा आहे.
दिग्दर्शक समीर यांनी हा सिनेमा स्वतः लिहिला आहे आणि स्वतः दिग्दर्शन केले आहे . जे कि अतिशय उत्तम आहे .
सिनेमा मध्ये बाकीच्या पात्रांनी पण खूप छान बॅटिंग केली आहे . त्यातच सई ताम्हणकर, हेमंत ढोमे , कादंबरी कदम यांनी त्यांच्या भूमिका उत्कृष्ट आणि दमदार निभावल्या आहेत . प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्या सारखे आहे .
तर मंडळी असे हे गोड जोडपं त्यांच्या आयुष्यात आलेलं न दिसणारं वादळ कसे झेलतात यावर हि कहाणी आहे . ते वेगळे होतात का ? तो दुसरं लग्न करतो ? कि ती दुसरं लग्न करते ? शेवट गोड आहे कि दुःखी आहे ? कारण नावातच वन्स मोअर असा शब्द आहे . लेखकाने वन्स मोअर हा शब्द का जोडला असेल ? असे खूप सारे प्रश्न मी सोडवलेत हा सुंदर सिनेमा पाहून .तर मग जराही वेळ न घालवता हा सिनेमा बघा आणि मला सांगा तुम्हांला हा सिनेमा कसा वाटला ?
सिनेमा : मंगलाष्टक वन्स मोअर
लेखक / दिग्दर्शक : समीर
संगीत : निलेश मोहरीर
कलाकार : स्वप्नील जोशी , मुक्ता बर्वे , सई ताम्हणकर, हेमंत ढोमे आणि कादंबरी कदम
निर्माती : रेणू देसाई
प्रस्तुती : श्री अध्या फ़िल्मस
हा सिनेमा सर्व लग्न झालेल्या जोडप्यांनी नक्की पहावा .नात्यांमध्ये नुसतं खूप प्रेम, काळजी पुरेशी नसते .मग अशी काय गोष्ट आहे जी असली तर सुखाची सर आपल्याला चिंब चिंब भिजवून टाकेल . कोणतेही नातं टिकवण्यासाठी किंवा खुलवण्यासाठी आपलं अस्तित्व , आपले वेगळेपण त्याग करायची गरज नाही . असा काहीसा हिडन मेसेजही त्यात आहे असे मला वाटते .
तर ऍमेझॉन प्राईम वर असलेला हा सिनेमा नक्की पहा आणि मला सांगा कि हा सिनेमा आणि हा लेख तुम्हांला कसा वाटला .
धन्यवाद
सौ. शीतल महामुनी माने