Login

स्वप्न माझे

My Dream Is All About You

स्वप्न माझे


स्वप्न माझे फुल झाले
उमलणाऱ्या पाकळ्यांचे गंध ल्याले
गीत ओठी चांदणे झाले
मंतरलेले श्वास न्हाले


मांडली मी आरास स्वप्नांची
बहरली मालिका सुरांची
दिसे लावण्य आगळे
यौवनी नवे उम्हाळे

स्नेहल मूर्त हृदयी वसे
कणाकणात प्रीत दिसे
मन झुले हिंदोळ्या परी
हृदयात अगम्य माधुरी

कुजबूज करी चंचल वारा
प्रीतीचा सागर प्रीतीचा किनारा
क्षणाक्षणावर अंमल प्रीतीचा
ये ना राणी व्याकुळ मी कधीचा


............ योगिता मिलिंद नाखरे