माझी आई म्हणजे हेमलता खेडकर .आपल्या समाजात बेबीताई म्हणून प्रसिद्ध .जवळपास समाजातल्या प्रत्येकाशी, कुठून ना कुठून काही ना काही नातं शोधून काढणारच .आणि ते फारसं लांबच नाही हा तिचा ठाम विश्वास .आपल्या समाजात तिला भेटलेल्या पैकी क्वचितच एखादी व्यक्ती कशी सापडेल, की जिला तिने, एखाद्या रोगावर काहीतरी घरगुती औषधाचा, किंवा होमिओपॅथिक औषधाचा, किंवा इतर काही पदार्थांविषयी टीप दिलेली नसेल. स्वतः भलेही त्यातले औषध घेणार नाही.
तर अशा ही माझी आई म्हणजे समाजातल्या बेबीताई. तसं म्हणाल तर, सासरी माहेरी दोन्हीकडे संपन्नता पण कुठल्याही प्रकारचा उधळेपणा आईला कधी खपायचं नाही.थोडे भाताचे कण ताटात राहिले तर ,"यात एखाद्या चिमणीचा पोट भरलं असतं "असं सुनवायला मागेपुढे बघायची नाही.
तिच्या हातचे पेढे आणि विविध बिघडलेल्या पदार्थांचे फ्युजन, मीच काय समाजातल्या बऱ्याच लोकांनी चाखलेले आहेत. घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याने काही ना काही खाल्लं पाहिजे, हा आईचा आणि दादांचा सुद्धा नेहमीचा आग्रह आणि घरीच बनवलेल्या विविध पदार्थांनी घरातले डबे नेहमी भरलेले . आम्ही विकत आणून काही खात बसलो की की हे घरी किती चांगले, शुद्ध ,आणि स्वस्तात बनले असते, असं आम्हाला सांगणारच. त्यावेळेला तिचा राग यायचा पण आता या लाॅकडिडान काळामध्ये, या घरातल्या शुद्ध पदार्थांचा महत्त्व पटलंय खरं आणि बर्यापैकी घरातच पदार्थ बनवण्याकडे कल झालाय हे खरं.
सर्वांना मदत करण्याचीही तिला फारच आवड .आमच्या घरातल्या कितीतरी नातेवाईकांच्या आजारपणा मध्ये तिने वेगवेगळ्या प्रकारे कशी सेवा केली आहे, हे मी स्वतः पाहिलेले आहे, कोणाला शिक्षणासाठी अडचण असेल, तर दादांना सांगून ती नक्कीच मदत करायला लावणार.त्यांच्या या दानपुण्याविषयी लिहिन तेवढे थोडे.पण त्यामुळेच आम्हा मुलांवर आपोआप ते संस्कार झाले.
इतरांना मदत करणं हा तिचा आवडता छंद. बऱ्याचदा तर आम्ही खाजगीमध्ये तिला "हिला अंगावर कामं अंगावर घेऊन पडण्याची सवयच आहे" असं म्हणत असू.
दुसरा म्हणजे आपल्या समाजातल्या काही घटकांकडून अकरा अकरा रुपये गोळा करून त्यातून धार्मिक 11 पुस्तकांचा संच तिने प्रकाशित केला होता. त्या सन्मार्ग प्रकाशनासाठी तिने केलेली धडपड आता या ग्रुप मधल्या ही बऱ्याच जणांना आठवत असेल. आत्ता त्या छोट्या-छोट्या पुस्तकांचं कोणाला विशेष वाटणार नाही, पण साधारण पंचावन्न-साठ वर्षापूर्वी ती धडपड म्हणजे सर्वांपर्यंत धार्मिक ज्ञान पोचवण्याची आस होती.
सर्व बाबतीमध्ये सकारात्मक विचार कसा करायचा, हे बऱ्याच अंशी मी आईकडून शिकले. मी कितीही वाईट गोष्ट घडली, तरी त्यात ,"अगं बरंच झालं" असं म्हणून काही ना काही चांगलं शोधणारं. मग आलेलं काही संकट असो नाहीतर आजारपण.
आजारपणा वरूनच आठवलं तिला शेवटच्या काही महिन्यांमध्ये हृदयविकाराचा झटका आला होता, आणि ती क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये ऍडमिट होती. अर्थातच दुर्दम्य इच्छाशक्ती आणि रोगाला दूर सारण्याची ताकद याने दोन दिवसातच ती नॉर्मल झाली. आयसीयूमध्ये डॉक्टरांना, तिने थोडं चालून दाखवलं आणि डॉक्टरांनी छान प्रगती आहे, म्हटल्याबरोबर ,"मग आता द्या डिस्चार्ज आणि सोडा घरी "असं म्हटलं.
"अहो आजी असा हार्ट अटॅक आल्यावर आणि आयसीयूतून बाहेर आल्यावर, किमान आठ दिवस आम्ही पेशंटला देखरेखीखाली ठेवतो, तुम्ही किमान दोन दिवस तरी रहा" अशी विनवणी केली.
आईने, ठीक आहे .म्हटलं पण दोन दिवसांनी रविवार आहे, हे तिच्या बरोबर लक्षात होतं .त्यामुळे" रविवारी तुम्ही मला डिस्चार्ज द्यायला येणार नाही मग कसं "असं डॉक्टरांना बिनदिक्कत विचारलं.
डॉक्टरांनीही मी तुमच्यासाठी, खास रविवारी येईन आणि तुम्हाला डिस्चार्ज देईन, असं कबूल केलं आणि खरोखरच डॉक्टर आले आणि त्यांनी आईला डिस्चार्ज दिला.
चांगल्या गोष्टीचं कौतुक आणि काही थोडीशी चूक झाली तरी सुद्धा भरपूर ओरडा आणि रागवणे यात हयगय नसे.
घरातली कामे करायला लावायचीच.अभ्यास,लिखाण सगळ्यात खूप प्रोत्साहनही होतेच.
आजही कधीतरी एखादा पदार्थ बनवल्यावर आईसारखी चव जमली असेल तर मी स्वतःवरच फार खूश होते.आईच्या हातची चव उतरते म्हणतात लेकीच्या हातात.
आणि मी कोणाला काही सल्ला द्यायला लागले, की अरेच्या मीही आईसारखीच वागते की ,असा विचार करायला लागते.
मायलेकींचं नातं असतं असं अनोखं जिव्हाळ्याचं
एकीमध्ये दुसरीच प्रतिबिंब बघत राहायचं
लहानपणी असायची जशी हौस
आई सारखी साडी नेसून बघण्याची
भातुकली खेळताना आवड
असते तिच्यासारखं संसारात रमण्याची
स्वतः आई झाल्यावरच होते जाणीव
कशी असते कथा आपल्या आईची
भाग्यश्री मुधोळकर

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा