मातीत रोज जिझतो
विचार सारा करुन
पेरतो आता सोयाबीन
लक्ष आभाळी असुनी
पावसाची आस नयनी
कर्ज थोड़े आज काढूनी
मशागत मातीची करुनी
पावसाची आस नयनी
कर्ज थोड़े आज काढूनी
मशागत मातीची करुनी
पावसाने थोड़ा उशीर केला
कसर मात्र राहु दिली नाही
जुना धाक मनी आला
विचार मातीत येउ दिला नाही
कसर मात्र राहु दिली नाही
जुना धाक मनी आला
विचार मातीत येउ दिला नाही
भाग्य यावेळी उजळले
सोयाबीन शेतात फुलले
करू सनवार जोमात सारे
मुलांना कपड़े घेऊ न्यारे
सोयाबीन शेतात फुलले
करू सनवार जोमात सारे
मुलांना कपड़े घेऊ न्यारे
नजाऱ्याला नजर लागली
माझी खुशी मातीत विरली
पावसाने रात्रीत केला घात
सोयाबीन गेली पाण्यात
माझी खुशी मातीत विरली
पावसाने रात्रीत केला घात
सोयाबीन गेली पाण्यात
तोंडशी घास आज आलेला
एका रात्रीत हिरावुन गेला
आनंदाचा वारा गेला
कर्जात मला बुडवून गेला
एका रात्रीत हिरावुन गेला
आनंदाचा वारा गेला
कर्जात मला बुडवून गेला
सरकारची फक्त कागदिच सत्ता
आश्वासने फक्त आमची थट्टा
मदत तर सोडाच आता राव
सोयाबिन ला नाही दिला भाव
आश्वासने फक्त आमची थट्टा
मदत तर सोडाच आता राव
सोयाबिन ला नाही दिला भाव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा