Login

माझी बायको

My Wife Is Made For Me

माझी बायको


कॉलेजातली एक मुलगी
मला पसंत पडली
खिशात नव्हता रुपया
तिथेच गाडी अडली

एक मुलगी घरच्यांनी पसंत केली
चहा पोहे कार्यक्रम झाला
संसार सुरू झाला
कुठेही शशिकला कुठे ती मधुबाला

तोंडावर बाईंच्या नसतोच ताबा
माझी घाबरगुंडी तोबा तोबा
सगळा पगार तिच्या हाती
मी कामगार अक्षरशः तिच्या हाती

पहिल्यांदा पाहिले तेव्हा
वाटली मितभाषी कनवाळू
आता म्हणते कानपिळु
सोशिक मी संसाराचा भार वाहु
संसाराच्या त्रिविध तापाने त्रासलो फार
त्राहीमाम, त्राहीमाम

पुन्हा आठवली कॉलेजातली ती तरुणी
सोनचाफ्याची, मृदू करांची
सुमधुर भावनांची मोहक कविता जशी
जाऊदे ती नाही मिळाली हेच बरे
आहे थोडी तोंडाळ पण माझी बायको
बरी आहे जशी आहे तशी


... योगिता मिलिंद आखरे
0