Login

रहस्यमय गुहा

एका शहरात राहणारी मुले.गावात फिरायला येतात अचानक एक मित्र हरवतो .गुहेत मित्रांचा प्रवेश . रहस्यमय गुहा भीतीदायक वाटत आणि सापडला प्रश्न गुहेतून बाहेर.

रहस्यमय गुहा

भाग.1

पुणे शहरात एक वसतीगृहात पाच मुले मुली मित्र मैत्रिणी जोडी होती.दुसऱ्या शहरातून शिक्षण घेण्यासाठी आले होते.
उन्हाळ्याची सुट्टी पडणार ह्या विचाराने सगळे एकत्र येऊन बोलत होते आता आपण घरी जाणार आणि परत सुट्टी संपली की येणार.पाच मित्र मैत्रिणी जीवाभावाची जोडी.सुधा,राम, गणेश, शिल्पा, किशोर,सुधा ही अत्यंत महत्वाकांक्षी होती.राम हुशार पण परिस्थिती गरिबीची होती.गणेश आईवडिलांचा एकुलता एक दत्तक मुलगा. शिल्पा ही हुशार आणि निर्भिड.
किशोर गावात राहणारा आजी आजोबा सांभाळाचे.
अशाच गप्पा मारत असताना अचानक सुधा सगळ्या मित्रांना म्हणाली ह्या वेळी आपण घरी उन्हाळ्याची सुट्टी न जाता किशोर च्या गावी जाऊया.
आजी आजोबांनी छान स्वागत केले.सगळे किशोरचे मित्र मैत्रिणी खूपच आनंदात होते.

भाग 2
छान जेवणाचा अस्वाद घेतला.छान गप्पा मारल्या.
दुसऱ्या दिवशी फिरायला जाऊया असे राम म्हणाला.किशोर ने सांगितले इकडे खूप बघायची सुंदर रम्य ठिकाणे आहेत. सगळ्यांनी विनशिटर बरोबर घेतले सोबत थोडा खाऊ घेतला.गणेश ने कॅमेरा घेतला.सगळे निसर्ग रम्य ठिकाणी पोहचले.एक छान जागा पाहून निसर्गाच्या सान्निध्यात छान फोटो काढले.अचानक गणेश गायब झाला.सगळे आपापसात गप्पा मारत रमले होते.सुधा सगळ्यांना म्हणाली गणेश कुठे गेला?राम म्हणाला,अरे ,काळजी करू नका तो फोटो काढायला पुढे गेला असणार .आपण इथेच थांबून वाट पाहू.
खूप वेळ झाला गणेश परतला नाही.सगळयांना खूप टेन्शन आलं.सगळयांनी शोधायला सुरुवात केली.किशोर परत आला नाही.म्हणून ससगळेजण परत शोधायला बाहेर पडले.सुधाला अचानक वाघाची डरकाळी ऐकू आली .

भाग 3
धावता धावता तिचा पाय घसरला आणि ती आपल्या मित्रांना घेऊन एका गुहेत जाऊन पडली.मित्र गुहेत सापडले पडल्यामुळे त्यांच्याकडे कंदील, बॅटरी,काठी नव्हते.सगळे एकमेकांना विचारू लागले तु ठीक आहेस ना.किशोर त्यांना म्हणाला मित्रांनो आपण गणेशला शोधायला बाहेर पडलो होतो.जिथे चेन मिळाली त्या रस्त्याने जात होतो आणि सुधाचा पाय घसरला आणि आपण सगळे पडलो म्हणजे गणेश सुध्दा फोटो काढायला इथे आला असणार आणि त्याचाही पाय घसरला आणि तो पडला असणार.राम म्हणाला हा फक्त आपला अंदाज आहे तेवढ्यात शिल्पाला गणेशाचा कॅमेरा हाती लागला.राम म्हणाला मित्रांनो चला पुढे न घाबरता न डगमगता आपण आपल्या मित्राला शोधून काढू.आपल्या मित्राला शोधून काढू.हळूहळू गुहेतून पायवाट काढत निघाले .

भाग 4
गुहा खूप इतिहास काळातील दिसत होती.गुहेत आजुबाजुला पाणी वाहत होतं ‌.गुहेत भिंतीवर चित्रे रेखाटली होती.अचानक सुधाला वाघांचे पिल्लू दिसले ते पिल्लू त्या जवळ येणार इतक्यात त्यांनी जोरात पळ काढला.
सुटकेचा निःश्वास घेतला नाही तर लगेच एक दरवाजा दिसला त्यांना वाटलं आता आपल्याला मित्र भेटेल आणि आपण बाहेर पडू.राम, किशोर, सुधा शिल्पा दरवाजा उघडला आणि आत गेले अचानक दरवाजा बंद झाला.पुढे नुसता अंधार होता आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो उघडला जातो नव्हता.पुढे पुढे जात शिल्पाच्या पाय कशावर तरी पडला.तर तिथे गणेश त्याचा मित्र भेटला सगळे खूप आनंद झाला.सुधा, शिल्पा,किशोर,राम, गणेश रस्ता बाहेरचा शोधू लागले.गणेश म्हणाला, मी फोटो काढायला आलो.

भाग 5
आणि पाय घसरला आणि गुहेत पडलो .दोन दिवस रस्ता शोधत आहे मला रस्ता सापडला.मग मित्रांनी विचारले मग तु बाहेर का आला नाही? तेव्हा गणेश म्हणाला मी बाहेर पडताना मला परीक्षा द्यावी लागली मला उत्तर आले नाही म्हणून मला बाहेर येऊ शकलो नाही.मित्रांनी विचारले कोणता प्रश्न आणि कोणी विचारला?गणेश म्हणाला ह्या माझ्याबरोबर सगळे तो बघा बाहेरचा रस्ता आणि तिथे एक माणूस साधू बसला आहे.राम म्हणाला साधू इकडे काय करतोय?सुधा म्हणाली अरे तोही आपल्यासारखा अडकून पडला असणार चला विचारू या‌.सगळे साधू कडे गेले आणि बाहेरचा दरवाजा उघडा विनंती करू लागले. साधू म्हणाला मी तो दरवाजा बंद केला नाही तो आपोआपच बंद झाला.

भाग 6
मलाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि अडकून पडलो मलाही बाहेर पडायचे आहे.मित्र म्हणाले कोणता प्रश्न आहे तेव्हा त्याने एक कागद दाखवला आणि त्या कागदावर प्रश्न लिहिला होता. जो कोणी ह्या प्रश्नाचे उत्तर अचूक देईल? त्यांच्यासाठी दरवाजा उघडेल.मित्रांनी प्रश्न वाचला प्रश्न होता असं काय आहे नाती आणि मित्र टिकून राहतात?खूप विचार केला राम, गणेश,साधू, किशोर, शिल्पा, सुधा.शेवटी सुधा म्हणाली प्रेम, आणि विश्वास .सुधा म्हणाली नात्यात प्रेम आणि विश्वास असेल कोणतंही नातं टिकू शकत आणि आनंदाने राहू शकते.अचानक दरवाजा गुहेचा उघडला आणि सगळे आनंदाने बाहेर आले.नंतर सगळ्यांनी पोलिसांना सांगून गुहा कायमची बंद केली.
सगळे गणेश, किशोर, राम,सुधा, शिल्पा पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले.