Login

रहस्यमय टेकडी भाग -१

टेकडीवरील खुनांच रहस्य
सकाळची वेळ,सुर्याची कोवळी किरणेपलिकडील डोगरांमागून डोकावू लागली होती . ..अमित दोन दिवसांपुर्वीच आपला मिञ जयसोबत गावी आला होता.जवळच्या डोंगरावर ट्रेकिंग ते दोघे पहाटेच गेलेले होते व आता घराकडे परतत होती..

आंगावरचा घाम आपल्या दंडांवर टिपत टिपत दोघेही पळत होती .गावाच्या वेशीवर घुसणार तोच अमित ..

"जय..जय.."

अस ओरडत ,डोळे मोठे करतच जमिनीवर कोसळला.

दोन सेकंदापुर्वी दोघेही एकमेकांसोबत गप्पा मारणारा अमित अचानक जमिनीवर कोसळल्याने जयही भांबावून गेला होता..

एकतर सकाळची वेळ अजून चांगल उजाडल ही नव्हतं..गावची पांदी ह्या पांदीतुन लवकर कोणी फिरकतही नसायल्याने भयानक शांतता होती.अजूबाजूला भरपुर झाली व खोल दरी असा तो भाग होता .
अमितला सावरू की कोणाला बोलवू अस जयला झाल होत .पण,त्याला गावची ओळखही नव्हती .स्वत:ला सावरत मनात हिम्मत बांधत जयने हातातल्या पाण्याच्या बाटलीतील थोडंस पाणी अमितवर शिंपडल व दोन घोट पाणी पाजल ...

पाण्याचे थेंब अंगावर पडतात अमित थोडासा सावरला पण पुरता घाबरला होता.. त्याने जयचा हात धरला व विस्तारलेल्या डोळ्यांनी समोरील झाडांच्या गर्दीत बोट दाखवला...

जयने तिकडे बघितल तसा तोही ..

"ओ...ओ...काय आहे हे....बाब्बो ...मेलो आपण ."

म्हणत ओरडू लागला...

दोघांचाही थरकाप उडाला होता ,कारण समोरच दृश्य तस भयानकच होत ...

गर्द अशी झाडी त्यामुळे अजूनही तेथे अंधार होता.झाडांच्या गर्दीत एका झाडावर एक शिर नसलेल धड लोबकळत होत.त्यातून पडणार्या रक्ताने झाडांखालील गवतही लालेलाल झालेल होत...

अमित व जयचा घाबरल्याने ओरडण्याचा आवाज फक्त स्वत:लाच जाणवत होता...दोघेही कशुबशी एकमेकांना सावरत उभे राहिले..अमित तर पुरता घाबरला होता .जय थोडा सावरत पुढे जाण्याची हिम्मत करू लागला तसा अमितने त्याचा हात ओढला.

"जय चल येथून मला खुप भिती वाटते रे आपण गावात जाऊ ...गाववाले बघतील बाकीच ".

"अरे अमित कोणीतरी खुन केला आहे रे.."

"नाही ..नाही जय काल आमावश्या होती ना ...तु चल ईकडून लवकर ...हे प्रकरण थोड वेगळ आहे घरी सर्व सांगतो मी तुला.."

अस म्हणत तो जयचा हात धरत गावाच्या दिशेने पळत सुटला..

अमितला तशी ह्या प्रकाराची थोडी कल्पना होती .कारण लहानपणी अजोबांकडून ह्या टेकडीवर व पांदीमध्ये एक खतरनाक भुत आहे व ते आमावश्या पौर्णिमेला एक जीव घेत ह्याची गोष्ट तो ऐकून होता ..पण ही सगळी अंधश्रध्दा आहे असच त्याला वाटत होतं.आज जेव्हा प्रत्यक्ष पाहिल तर तो गांगरून गेला होता..

आता थोडा थोडा उजेड पडू. लागला होता ..गाव बर्यापैकी जाग झाल होत ..अमित व जय धापा टाकत जीव घेऊन पळत होती .

घराजवळ येताच शमाकाकाने दोघांना घाबरलेल पाहिलं..

"अरे अमित काय?रे इतका घाबरलास .."

शमाकाकाला जरा संशयच आला होता .दोघही मुल पुरती घाबरली होती..

काकांनी अमितला जवळ घेतल तोच अमित म्हणाला

"काका खून ..खून..ते भुत...खून ...".

इतकेच शब्द अमित पुन्हा पुन्हा बोलत होता.

त्याच्या जोरजोरच्या बोलण्याने आजूबाजूचे सारेच गोळा झाले..घरातून काकी, आई व सगळीच मंडळी बाहेर आली..
अमितच्या ह्या गोधळाचा कुणाला अर्थ लागेना पण,काहीतरी नक्कीच झालय हे सगळ्यांच्या लक्ष्यात आल होत...भांबावलेल्या अवस्थेतील जय व अमित दोघेही फक्त
टेकडीकडे बोट दाखवत ...

"खून खून"

असे बडबड होते ..ते भगवान बाबांच्या लक्ष्यात आलं होत..

दोघा मुलांच्या आजुबाजूला भरपुर गर्दी झाली होती..

भगवानबाबा जरा सरसावले व म्हणाले..

"शामरावा अरे कोणीचा तरी जीव घेतला रे त्या हलकट ने...बघा रे तिकडे जावून कोण बळी पडल रे...गावाला संपवायला निघाल रे ते भुत ."

"पाटिल ओ ...पाटिल पोलिसांना खबर द्या हो...!
आजही घात झाला आपल्या गावात "
म्हणुन पाटलांच्या घराबाहेर सखाराम ओरडत होता..

भगवान बाबांचा मुलगाही काहीच महिन्यांपुर्वी बळी गेला होता .थरथरत्या हाताने ते आहे त्याच जागी बसले सारा गतकाळ सरकण त्यांच्या डोळ्यासमोरून गेला..आजवर गावातील डझनभर कर्ती लोक अशीच संपली होती एवढस गाव बातमी सरसर सगळीकडे पसरली.गावची सगळी जाणती लोक मुलांनी सांगितलेल्या दिशेकडे धावत सुटली .

घरातील बायकां अमित व जयला सावरत होती..

"अवघडच आहे भुत ..कुस्तीत ते कोणालाही जिंकू देणार नाही माय..दोषच लागलाय गावाला,"

"आपल कर्म चुकत असलं माय, म्हणुन घडतय सार गावच बंधण करून घ्याव माय"

"चांगला भगत बी सापडत नाय माय ,माझा आर्ज्या गेला घराची वाताहत झाली ,पोर उघड्यावर आली दुश्मनालाही ही येळ येऊ नये ओ आक्का"..

सरूबाईने तर जुन्या दु:खाला मोकळ करत रडण सुरू केल.

"सर सलामत तो पगडी पचास ...गाव सोडून जाव बाई ,काय ठेवल ह्या गावात ,सोन्यासारखी माणस गेली तर आधार काय उरल माय".


गर्दीतील बायकांचे संवाद सुरू होते.

जय फक्त ऐकत होता.एकतर त्याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी नविन होत्या .

अमित जयला ,"तु घरात ये बाबा व उद्याच परत जा" म्हणुन ,परत परत बोलत होता..

आई व काकींने अमित व जयला शांत करत सावरलं.
पण सगळ्यांच लक्ष टेकडीकडे गेलेल्या लोकांकडेच होत..बायकांचा घोळका अजूनही अमितच्या घरासमोरच होता .सगळ्यांचा जीव टांगणीला लागला होता.

'कोण?"
असेल ती बिनाशिराची व्यक्ती हे एक कोडच होत.