रहस्यमय टेकडी भाग-२

टेकडीवरील खुनाच रहस्य
बायकां एकमेकिना धीर देत होत्या.ज्यांचे नवरे समोर दिसले नाहित त्यांचा जीव नको त्या विचारांनी चक्रावर होत.गिता तर पुरती थरथरत होती.

गिताने हळूच मंदाचा हात धरला व घोळक्यातून बाजूला ओढलं..

"मंदे,अगं तुझे भावजी रातच्याला माळरानात गेलीत ग अजूनही परत नाही आली,रानडुकरांनी थैमान लावला पिक राखतो अस सांगून गेलीत गं...मला तर बाई लय भिव वाटत गं मंदे ".

गिताची भिती मंदाच्या लक्ष्यात आली होती पण गिताच शेतही टेकडीच्याच बाजुला होत मंदाच्या अंगावर शहारे आले होते.घाबरलेल्या गिताला तीने आधार देत

"ये माय तु काही बी चिंतु नको गं असतील भावजी ,गाव तिकड गेल तर तेथेच थांबतील ना घरला कसे येतील ,येऊ दे लोकास्नी समजल खर काय ते ...माय तु बी ना काळीज हलवून टाकते बघ...काहीबाही नको चिंतु माय,शुभशुभ बोल,मोठादेवच नाव घे बरं."

"हं.."

म्हणत गिताने मान हलवली..

पण ,आता मंदाही घाबरली होती..

गावातली लोक आता टेकडीजवळ पोहचली होती.पांदीतुन वरती झाडावर लटकलेल ते धड बघून सगळीच घाबरली होती.पोलिसपाटिल व काही मोठी लोक जवळ गेली तर शीर कुठेच नजरेस पडत नव्हतं..दोन फैलावर एका पिपंळाच्या झाडाखाली शीर दगाभाऊला दिसताच तो ओरडला..

"पाटील ,ते पिपळाच्या झाडाखाली बघा हो ,तिथं दिसत शीरासारख काहीतरी.."

सगळे तीकडे धावू लागतात शीर बघतात सगळ्यांना धक्काच बसतो .

"पाटिल काय होतय हो हे,आता आजून हे काय नविन ?आज तर दोन जीव घेतलेत हो ह्याने ".

लोकांची भिती अजूनही वाढली होती शेजारी पडलेला व्यक्तीच्या शीराला हात लावायला गावातील तुकाराम पुढे सरकणार तोच अमितचे वडिल व काका म्हणले.

"तुकाराम थांंब,...पोलिस येऊ दे ,हात नको लावू ,"

"पाटिल फोन केलाय नव्हं पोलिसांना ,"

पाटिल फक्त मान हलवली..

व गावातील लोकांना म्हणले

"पोलिस केव्हा येतिल कोण जाणे .कोण आहे ते तरी बघुन घ्या राव,तुकाराम जवळ जा बाबा बघ बरं कोणाच आहे शीर".

गावचे पाटिल बोलले मग काय?तुकारामला ऐकल्याशिवाय पर्यायच नसतो .सगळी मंडळी शांतच होती .
तुकाराम शीराजवळ गेला तोंडावर पडलेली झाडाची पान बाजूला सारकली तशी सगळ्यांचे डोळे मोठे झाले..

"देवा..."च शीर आहे हे

सगळ्यांच्या तोडांतून एकसाथ हे वाक्य बाहेर पडलं

"अर र्र र्र ..र...देवा काय झाल रे ?काय घोड मारल होत रं यान ह्या भुताच त्यालाच खाल्लं याणं..दोन वर्षाच लेकरू पोरकं केल रे मुडद्या ...वाटोळ व्होवो रे तुझं...किती लोकं गिळशील रे तु .."


तुकाराम शीर बघताच हयमसून रडू लागला..

देवा तुकारामचा चुलत भाऊ पण ,सख्ख्या भावापेक्षा जवळचा . जिवाभावाचा भाउ आज त्याने गमवला होता.त्याचा आकांत हरदवून सोडणारा होता.

आता सगळ्यांच्याच अंगावर शहारे उठले होते .

"परमेश्वरा एक साधासरळ व तुला माणणारा ,सतत तुझ्या पुजेत रमणारा असल्यानेही तु भुतापासून देवाला वाचु शकला नाही तर बाकीच्यांच काय?होणार रे..."
लोक पुटपचटत होती..
तरण्या वयातील लोकांना भिती वाटू लागली होती ,कारण आजवर मरणारे सारे एकाच वयाचे होते समोर पडलेल दुसरं प्रेत बघण्याची कुणाची हिम्मतच होत नव्हती.आजवर एक एक मृत्यू होत होता ,पण आज दोन जणांचा मृत्यु बघून सगळेच घाबरले होते..

तर्क वितर्कांमध्ये गावकरी अडकले असतांनाच .पोलिस गाडीचा आवाज येतो ,सगळे सावध होतात.

पोलिस गाडी घटनास्थळी पोहचतात पोलिस पटपट गाडीतून उतरतात व झाडाला लटकलेल धड आधी जमिनीवर ठेवतात.समोर पडलेल शीर ही उचलून घेतात..
दुसरी पडलेली बाॅडी उलटी करून त्यांची माहिती पटवण्यासाठी एकही जण पुढे धजावत नाही..गाडीतून उतरलेले पोलिस गर्दीकडे बघत प्रश्नांच्या फौरी सुरू करतात..

तुकारामजवळ जात ते म्हणतात,

"तुझा भाऊ आहे का?हा"

तुकाराम मानेनेच होकार देतो ..

"याच कुणाशी वैर होत का?".

तो आता जरा सावरून ,"नाही. साहेब"

"मागिल काही दिवसात कुणाशी भांडण वैगरे"

"नाही हो साहेब त्याच काम व तो ..,कोणाशी काहीच घेणदेण नसायच त्याला ".

त्यात सोबत असलेले दुसरे पोलिस म्हणतात,

"साहेब धारदार शस्ञीने गळा कापला आहे हो ...ठरवून केलेला गेम दिसतो बघा "

"हो ना,?...सगळं प्लाॅन केल्यासारखंच आहे ...,काही हत्यार सापडत का?अजूबाजूला तेही शोधा ..काहितरी पुरावा मिळेलच ...आणि पहिले सर्व घटनास्थळी अगोदर रिंगण करा ..."

दुसरी बाॅडी जवळ आणत ,

"ह्या व्यक्तीला कोणी ओळखत का?"
असे पोलिस विचारताच ..
फक्त प्रश्नार्थक चेहेरे करून सगळे "नाही "म्हणतात..

अर्धवट चिरलेला गळा व त्यामुळे जिवाची तळमळ होत असल्याने त्या व्यक्तीचे डोळे विस्तारलेलेच असतात..
डोळ्यांवर व चेहेर्यावर दगडाने ठेचलेल्याच्या खुना असतात..जणेकरून कोणी ओळखू शकणार नाही ..उजव्या हाताचा आंगठा कापलेला असतो ..."

प्रेताला बघतांना एक पोलिस म्हणतो

"सर आंगठा पण कापला आहे व तो नाही येथे.."

"शोधा असेल अजूबाजूला.."

टिम शोध घेत असते..

दोन्ही खुनच पण दोघांची पध्दत वेगवेगळी असते..

पोलिसही चक्रावलेले असतात..

तुकारामकडे बघत ते विचारतात,"हा तुझा भाऊ आहे मग ही व्यक्ती कोण हे ही तु ओळखत असशील"

"नाही साहेब ..ह्या माणसाला. आजवर मी कधी पाहिलेल नाही "

"मग दोघांचा खुन एकाच ठिकाणी कसा?"

गावातील लोकांनाही प्रश्न पडतो .

पोलिस काय बोलतात तेच सगळेजण ऐकत असतात..पोलिसपाटिल पोलिसांच्या. प्रश्नाची उत्तरे देत असतात..

"बहुतेक दोघांमध्ये हातापायी झाली असेल व तिसर्यानेच यांचा काटा काढला असेल.अशी शंका घेतली तर एकाच‌ शीर‌ व एकाचा आगठा का?कापला ,शिर सापड मग दुसर्याचा आंगठा कुठे आहे ..."

पोलिसांच्याही तपासाला लिंक लागत नाही..

"संपत्तीविषयी काही वाद होते का?..किंवा अनैतिक संबध ..नाहितर पैश्यांची देवाणघेवाण.."

इकडे पोलिसांची चौकशी सुरू असते.

गर्दीत लोकांच्या नवनविन चर्चा रंगत असतात.

"आता हा जीव लय पिसाळला भो...दोन दोन जीव घेऊ लागला ..व आता तर गळाच कापु लागला भो..."

"हाव ना..पहिले एका आगठ्यान भागत होत ..आता तर मुंडक बी व काय ठेचला आहे भाउ ओळख बी पटू देत नाही "..

गर्दीतली ती हळूहळू चाललेली कूजबुज एक पोलिस ऐकतो व दुर्लक्ष करतो..

पोलिसांचे एकावर एक प्रश्नांची बरसात सुरू असते.
पोलिस पाटलाच्या बोलण्यातून भुतासोबत कुस्ती झाल्याने हे दोघं मेले असतील अस पोलिसांना समजत. पंचनामा होतो व दोन्ही प्रेत पोस्टमार्टमसाठी शहरात पाठवली जातात...

इकडे पोलिस आल्यावर गावात एकच धांदल उडते.
देवाचा खुन झाला हे कळतात गिता बेशुध्द पडते..
आईवडीलांविना वाढलेला देवाचा असा अंत बघून सार गाव हळहळून जात ..गावात कुठेच चुलही पेटत नाही .कमी वयातच जोडीदाराला गमालेली गिता बोलण्याच्या व शुध्दीच्याही मनस्थितीत नसते..फक्त प्रश्न उरतो तो दुसरा मेलेला व्यक्ती कोण?ह्याचा...

पोलिस खुन झालेल्या ठिकाणी बारकाईने शोध घेत असतात पण,मारेकर्याने कोणताच पुरावा सोडलेला नसतो‌.दुसर्या व्यक्तीची ओळख पटवण आवघड होऊन बसलेल असतं .

सार गाव शहरातून प्रेत कधी येत व काय?कारण समोर येत ह्याचा विचार करत असतात..
जयलाही काय?,झाल असेल याची उत्सुकता असते..
अमितच्या बोलण्यातून त्या टेकडीच्या रस्त्यावर पुर्वीपासून एक भुत आहे व त्याची भुक भागवायला गावातील व्यक्तीचा जीव घेत ..नाहितर रस्त्यावरचा त्यावेळी जाणारा वाटसरू त्याच भक्ष होतो हे जयला समजत..
पण हे ,कारण जयला पटणार नसतं ,आपण शहरात परत जाण्यापेक्षा येथे राहून ह्या गोष्टीचा छडा लावायचा हे तो मनोमन ठरवतो ..

"अमित आता मी अलोच आहे तर दोन दिवस थांबतो"

अस तो अमितला म्हणतो..

"तु घाबरला नाहीस ना ?"इती अमित

"नाही नाही ..तुला सोबत करतो ना मी ,काय काका मावशी चालेल ना?".

जयच बोलण ऐकून तेही म्हणतात,"

"थाब रे बाबा, हे प्रकरण आता खुप दिवस चालेल दोन दिवस आला आहात तर थांबा जरा सावरा व मग जा शहरात आम्हालाही आता तुम्हाला लगेच पाठवायची भिती वाटते.."

अमितलाही ते पटत ..

देवाची बाॅडी गावात येण्याची वाट सगळे बघत असतात तो दुसरा व्यक्ती कोण असेल,... हा झालेला प्रकार काय? असेल, हे जय जाणुन घ्यायचं असतं.

क्रमश:..