Login

रहस्यमय टेकडी भाग-३

टेकडीवरील खुनांच रहस्य
बघता बघता दुफारही टळून जाते.सगळ्यांची नजर फक्त देवाची बाॅडी कधी येते त्याकडे असते..

गावात पारावर भुताच्या शांतीसाठी पुजा आयोजित केलेली असते .देवाच प्रेत हे भुताने पछाडल आहे ते घरात न नेता पुजा करून बाहेरच आंतविधी करायचा असा गावचा ठराव होतो तशी तयारी सुरू होते.जपनाद सुरू असतो .तोच
सायरण वाजवत आॅंब्युलस येते.

देवाच धड व शीर वेगळ असल्याने पोस्टमाॅर्टमनंतर ते एका गाठोड्यात बांधुन‌आणलेल असत .मरणानंतर काहीच न करता सरळ आंतविधी करायचा अस ठरलेल असतं..

प्रेत आल्याबरोबर प्रेताची पुजा सुरू होते.मोठमोठ्याने मंञजप सुरू होतो.भुताला शांत करण्यासाठी नवनव्या अमिशांची व बळीची घोषणा होते...

"ए भुतात्मा तुला दर आमावश्या पुनमेला पाच पाच बोकडबळी देवू पण तु गावातील नरांना खाऊ नकोस,त्यांना जीवदान दे....तुझा राग शांत ठेव ..."

बाबा जोरजोरात बोलत असतो सोबत लोखंडी चिमट्याचा आवाज करत प्रेताला फेर्या मारतो .सर्व प्रकार काहीतरी अघोरीच दिसतो हे जयला जाणवत ...सगळच संशयास्पद वाटत.
पोलिसपाटिल सगळं पटकण उरकवून घ्या म्हणुन पुन्हा पुन्हा बजावत असतो..

देवाचा अंतविधी झाल्यावर पारावर पुन्हा पाटलांची सभा भरते .

"ऐका गाववाल्यांनों आता आपण भुताला शांत करायला भगताला बोलावलच ,पण पंधरा दिवस व आमावश्या पौर्णिमेला टेकडीकडे कोणी जायच नाही बरं का?राञी अंधार होताच तिकडे फिरकू नका ...भुत आता चवताळल आहे आज दोन जीव घेतले उद्या किती घेईल सांगता येत नाही .आपल्या जीवाला जपा ,स्वत:ला सांभाळा "

अशी सुचना पाटिलांनी केली सगळ्या गावकर्यांनी ती मान्य केली .

जयला आता ह्याचा शोध त्याच्या पध्दतीने लावायचा असतो .कारण लहानपणापासून नास्तिक परिवारात‌ वाढलेला जय भुत प्रेत मानत नसतो..

राञी झोपतांना तो अमितला त्याचा विचार सांगायच ठरवतो..

झोपतांना तो अमितला म्हणतो,"अमित मला जरा वेगळाच संशय येतो रे ,असं भूत वैगरे काही नसत काहीतरी घोळ नक्कीच आहे तुझ्या गावात".

"नाही रे जय हे सत्य आहे मी लहानपणापासून ऐकतो आहे व हे खरही आहे बघ . आज आपण आपल्या डोळ्यांनी अनुभवलं ना रे सार ..त्या पिंपळाच्या झाडावर मुंज्या रहातो तो चिडला कि मग अस होतं अशी मोठी माणसं म्हणतात रे"

जय संतापतो..

"काय?हे अमित जग कुठे चालल व तु अजूनही येथेच आहेस...ह्या आंधश्र्देत अडकलेला.अरे हा काहीतरी विचिञ प्रकार आहे ह्यात खुप लोकांचा हात असू शकतो .याचा शोध लावायला हवा रे ,ऐक ना आपण शोधू ना ?काय आहे ते".

"नाही रे बाबा..मी नाही करणार हे काम.आपण दोन दिवसात परत जाऊ ,नको ह्या प्रकरणात पडायला पोलिस शोध लावतील रे....उद्या पोस्टमार्टम रिपोर्ट आला की तुलाही कळेल बघ ..काहीच नाही हाती येत अकास्मित मृत्यु असाच आजवर अहवाल येतो व उद्याही तसाच येईल बघं".

जयला आता जास्तच शंका येते.तो अमितला म्हणतो,

"अमित तु शिकलेला आहेस व हे गाव तुझ आहे ह्या प्रकरणाचा छडा लागला व काहीतरी चांगल घडल तर सगळ्यांनाच फायदा होईल रे..आपण पंधरा दिवस थांबून काहीतरी करू ना. मला विश्वास आहे ह्यातून काहीतरी चांगल नक्कीच होईल, मला फक्त तुझी साथ हवी कारण मी ह्या गावचा रहिवाशी नाही ना".

जयच बोलण अमितला पटत व ह्या गोष्टी समजून घ्यायच्या व उद्यापासूनच तपासाला सुरवात करायची अस ते दोघेही ठरवतात..