Login

रहस्यमय टेकडी भाग-४

टेकडीवरील खुनांच रहस्य

ठरल्याप्रमाणे दुसरा दिवस उजाडतो गावात सकाळीच टेकडीच्या दिशेने काही दिवस कुणी जाऊ नये अशी दवंडी पिटली जाते..

जय व अमित गावात फेरफटका मारतात व गाववाल्यांकडून आजवर घडलेल्या घटना जाणुन घेतात..गावात सगळीकडे भितीच वातावरण असत.

अमितला आता टेकडीकडे जायचं नाही . जय पाहुणा आहे त्याची काळजी घ्यायची असा सल्ला घरातून मिळतो..
दुसर्या दिवशी पोलिस गावात येतात. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अकास्मित मृत्युची नोंद असलेला रिपोर्ट पोलिस पाटलांकडे सोपवून तपास संपवून निघून जातात..

जंगली श्वापदांमुळे दोघांचा मृत्यु झाला असावा असा निर्वाळा त्या अहवालात असतो पण तो न पटणारा असा असतो..
अमित व जयचा संशय आता जास्त वाढतो काहीतरी वेगळी घटना ह्या खुनांमागे आहे हे पक्क होत.

दोघेही मिञ आता राञ व्हायची वेळ बघतात..
सायंकाळ होताच सगळ गाव शांत होत.मंदिरात व दारासमोर भुतापासून रक्षणासाठी दिवे लावली जातात व देवाला प्रार्थना केली जाते.जयला हे थोड अघोरीच वाटत ..

दोन दिवसांनंतर प्रकरण थोडं शांत झाल्यावर घरातील सर्व झोपलेले बघून दोघेही टेकडीकडे जायला निघतात...काळोख झालेला असतो .अंधारातून वाट काढत ते तेथे त्या ठिकाणी पोहचतात ... काळाकुट अंधार‌ , शांत व सुनसान रस्ता ,..रातकिड्यांची व किटकांची किरकिर..मंद हवेत वार्यामुळे पानांची होणारी सळसळ...सरपटणार्या प्राण्यामुळे गवताची होणारी वळवळ बघून दोघेही घाबरतात .एकमेकांच्या धक्याने दोघेही बिथरतात पण,दोघांच्या साथीने ते एका झाडाखाली घाबरलेल्या आवस्थेत डोळे मिटून बसून घेतात..

आता जयला ही आपला निर्णय चुकला अस वाटू लागत .येथे यायला नको होत हा विचार मनात येऊ लागतो..अमित व जय दोघेही मनातल्या मनात देवाच्या धावाकरू लागतात .काहीवेळानंतर मोठ्या शक्तीनिशी ते डोळे उघडतात ..तोच एक भली मोठी सावली त्यांना झाडावर पडलेली दिसते..अमित तर थरथर कापु लागतो .जयलाही आता भुताची संकल्पना खरी आहे अस‌ वाटू लागतं..दोघेही देवाच्या धावा करत ती सावली निरखु लागतात व पुढे काय?होत ते बघत असतात..

बघता बघता समोर पुन्हा दुसरी सावली दिसू लागते..आता दोघीही सावल्या एकमेकांच्या जवळ येत असतात...जय आणि अमित दोघेही एकमेकांचा हात घट्ट धरत श्वास रोखत सगळ बघत असतात...काही वेळात दोघी सावल्या गडप होतात .तस कोन्हीतरी संभाषन करतय अस जाणवतं..

जय आता मोठ्या हिम्मतीने त्या आवाजाच्या दिशेने चालू लागतो. त्याच्या मागे अमितही निघतो.हळूहळू ते आवाज ऐकू येईल तिथवर जाऊन पोहचतात व झाडामागे लपतात .तेथे पोहचल्यावर समोर काहीतरी विचिञच घटना त्यांच्या समोर दिसते.

अमित व जय समोरच दृश्य बघून आवाक् होतात..
झाडामागे एक साधू व पाठमोरी पांढर्या कपड्यातील व्यक्ती असते ..जय व अमित त्यांच संभाषण ऐकण्याचा प्रर्यत्न करतात.

"महाराज आजही आपला काम असफल झाल हो.."

"वत्सा ह्या पंधरवाड्यात आपल्याला नक्की पावणार बघ झाडं..फक्त पुन्हा एखादं भक्ष्य लागेल त्याची सोय कर बसं".

"पण महाराज आताच एवढ प्रकरण झाल्यावर आपण गोत्यात पडू ,आपण अटकणार तर नाही ना महाराज".

"नाही रे वत्सा..तुझ्या नशिबातल कोणी घेणार नाही व झाड तुला अडकू देणार नाही .ह्यावेळी नेम बरोबर होता फक्त तो तुझा गाववाला मध्ये आला व तुझ्या नशिबातल धन जागेवरून सरकलं बघ .तेथेच माझा संताप झाला..ह्यावेळी तु जरा. सावध रहा .गावात भितीच वातावरण निर्माण कर मग बघ कस घबाड मिळवून देतो तुला".

"होय महाराज मी करतो सोय व आता रोज भेटयला आपण ...आता मी येथे डायरेक पुनवेलाच येतो. व भक्ष्याची सोयही करतो ..".

भगव्या कपड्यातील व्यक्ती हात वर करून अशिर्वाद देते व ती व्यक्ती पाया पडुन पाठीमागे वळते..
तोच अमितच्या पायाला काहीतरी चावत व जय आणि अमितची नजर त्या व्यक्तीवरून हटते...

जय व अमित तेथे थोडा वेळ थांबून तेथून घरी येतात..त्यांचा संशय खरा ठरतो .

"जय तु बोलला ते सार खर होत रे गावातलाच माणुस हे सार घडवतो व गाववाले भुत समजून त्याला बळी ठरतात बघ..आपलं नशिबच खराब रे आपण त्या व्यक्तीला बघू शकलो नाही ..बघितल असत तर सोप पडल असत रे"

"अमित आता आपल्याला कळून चुकल आहे ना की भुत नाही हे काहीतरी वेगळी घटना आहे आपण हे सगळं पोलिसांना सांगायला हवं ते सगळ्या प्रकरणाचा छडा लावतील बघं"

"हो रे जय तु बरोबर बोलतो उद्याच आपण कमिशनरला भेटू व सगळ प्रकरण सांगू लवकरच माझ गाव ह्या रहस्यातून सुटेल बघ...तुझे खुप खुप आभार रे मिञा"

"काय?मिञा अस म्हणतोस तु,आधी तो खुनी सापडु दे तेव्हा कुठे मिशन पुर्ण होईल बघं.."

दोघेही मिञ एकमेकांना मिठी मारतात व सकाळी शहरात जाऊन सर्व घटना कमिशनरला सांगुन खुनी व्यक्ती कोण ते शोधण्याची तयारी करतात...