Login

रहस्यमय हवेली (भाग -१५)

Finding the mystery of the mansion.

रहस्यमय हवेली (भाग -१५)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
आदल्या दिवशी सुशांत हवेलीत च थांबल्यामुळे नियती ला तिने जो डेटा पेन ड्राईव्ह मध्ये घेतला होता तो सी.आय.डी. टीम पर्यंत पोहोचवता आला नव्हता! म्हणून आज सकाळी ती नेहमी पेक्षा जरा लवकरच घरातून निघाली आणि सी.आय.डी. ब्यूरो मध्ये आली! 

"अरे नियती! तू इथे?" निनाद ने विचारलं.

"हो! काल मला तिथे बरीच माहिती मिळाली आहे! या पेन ड्राईव्ह मध्ये सगळी माहिती आहे.... त्या रवींद्र सोबत रॉबिन आणि यशवंत ही नवीन नावं समोर आली आहेत!" नियतीने सांगितलं.

"बरं! तुला तिकडून काही माहिती मिळाली का? म्हणजे, हे दोघं कोणत्या पोस्ट वर काम करत होते वैगरे..." विक्रम ने विचारलं.

"नाही! म्हणजे, तिथे केतकी म्हणून एक मुलगी काम करते तीनेच मला रवींद्र बद्दल माहिती दिली होती, तिलाच मी याविषयी विचारलं पण, तिच्या म्हणण्या प्रमाणे तिथे असं कोणी काम करत नव्हतं!" नियती ने सांगितलं.

"ओके! तू जा रिसर्च सेंटर मध्ये परत! काही समजलं तर कळव... आम्ही हा पेन ड्राईव्ह बघतो...." सुयश सर म्हणाले.

"ओके सर!" नियती म्हणाली आणि रिसर्च सेंटर मध्ये जायला निघाली. 

आता सी.आय.डी. टीम कडे नियती ने आणून दिलेला पेन ड्राईव्ह, रवींद्र च्या घरून मिळाले काही पुरावे, फॉरेन्सिक रिपोर्ट्स, गणेश आणि निनाद ने रवींद्र चे गोळा केलेले सगळे डिटेल्स होते! यावरून आता नक्की काहीतरी हाती लागेल असा विश्वास सगळ्यांना होता... सगळे सेंटर टेबल जवळ जमले! 

"सर! हे रवींद्र चे कॉल डिटेल्स... त्याचा जो नंबर आपल्याला मिळाला होता तो मागचे सहा ते सात महिने बंद आहे... शेवटचा फोन त्याला ज्या नंबर वरून आला आहे त्याचे डिटेल्स मागवले आहेत! त्याच नंबर वरून त्याला सतत फोन यायचा!" निनाद म्हणाला. 

"सर, हे रवींद्र चे बँक डिटेल्स! त्याच्या गायब होण्याच्या आधी जवळ जवळ पन्नास लाख रुपये त्याच्या खात्यात जमा झाले होते... ते दुसऱ्या देशाच्या बँकेतून ट्रान्सफर केलेत! आता अजून जास्त डिटेल समजले नाहीयेत..." गणेश म्हणाला. 

"बरं! आता फॉरेन बँक काही एवढ्या सहज आपल्याला डिटेल्स देणार नाही.... मला वाटतंय रवींद्र ला जे कोणी सतत फोन करत होतं त्याने दिले असावेत हे पैसे! नक्की रवींद्र कडून काहीतरी काम करून घेतलं असणार..." सुयश सर म्हणाले. 

"सर! आम्ही दोघं काल गोपाळ काकांच्या मागावर होतो... मोनिका ची औषधं आणायला त्या लोकांनी गोपाळ काकांच्या हाती तिची फाईल मागवली होती... त्या माणसाचा आम्ही पाठलाग केला! त्या माणसाने ती औषधं आड रस्त्याला जी बंद पडलेली चहा ची टपरी होती तिथे ठेवली आणि तो गेला! आम्ही थोडं अंतर ठेवूनच लक्ष ठेवत होतो! पण, ती औषधं घ्यायला कोणी माणूस आलं नाही तर ड्रोन च्या मदतीने ती नेली! म्हणून आम्ही पुढे जाऊ शकलो नाही..." विक्रम ने सांगितलं. 

"हम्म! हा जो कोणी आहे तो खूप सावधतेने पावलं टाकतोय.... ठीक आहे! बघूया आता आपण करता येईल ते... ईशा! आत्ता नियती ने पेन ड्राईव्ह दिलं आहे त्यात काय माहिती आहे बघ जरा..." सुयश सर म्हणाले. 

एवढ्यात तिथे अभिषेक आला! 

"सर! अभिज्ञा मॅडम त्यांच्या घरी पोहोचल्या! जाता जाता त्यांनी जी माहिती दिली आहे त्यावरून या केस ला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे..." अभिषेक म्हणाला आणि त्याने सगळ्यांना हवेलीत घडलेलं सगळं सांगितलं. 
**************************
इथे हवेलीत सोनिया खूप उदास होती! इतके दिवस मुली पासून दूर राहून तिला आता सतत तिची काळजी वाटत होती! तिचा संयम आता संपत आला होता! 

"मला आता काहीही झालं तरी मोनिका माझ्या डोळ्यासमोर हवी आहे... जे होईल ते होईल... मी आता इथे काम करणार नाही... माझ्या जिवाचं काहीही झालं तरी चालेल पण मला मोनिका सुखरूप इथे हवी आहे..." ती रडत रडत म्हणाली. 

"मॅडम! प्लीज तुम्ही शांत व्हा! तुम्हाला काय वाटतंय हे मी समजू शकतो पण, असं करून कसं चालेल... पुढच्या २४ तासात मोनिका तुमच्या समोर असेल... प्लीज आता धीर सोडू नका... त्या लोकांना जराही संशय येता कामा नये सी.आय.डी. तुमची मदत करतेय..." सुशांत ने तिला समजावलं. 

"मला कळतंय सगळं! पण, यात मोनिकाची काय चूक आहे... रवींद्र सरांना मी सागितलं होतं यापुढे रिसर्च मध्ये मदत करणार नाही... ही हवेली पण मला नको होती म्हणून मी नकार दिला होता! यासाठी मोनिका ला हत्यार बनवून माझ्याकडून काम करून घेतायत... एवढं काय साध्य करायचं आहे त्या लोकांना मला कळत नाहीये..." सोनिया संतापून म्हणाली. 

"हो मॅडम! मला तुमची तळमळ समजतेय... पण, आता अजून थोडाच वेळ... हे जे कोणी करतंय ते लवकरच आमच्या तावडीत असेल..." सुशांत ने तिला पुन्हा समजावलं. 

"मला सांगा, तुम्ही जेव्हा रवींद्र सोबत काम करत होतात तेव्हा असा कोणता रिसर्च सुरू होता? कोण कोण होतं तुमच्या सोबत?" सुशांत ने विचारलं. 

"त्यांना पुरातन वास्तूंना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांची संपूर्ण रचना च बदलायची होती.... पण, हे असं करताना त्या वास्तूची ऐतिहासिक किंमत आणि त्यांचा वारसा यांना धक्का लागणार होता... म्हणून मी या सगळ्याला नकार दिला! हे असं सगळं करणं म्हणजे बेकायदेशीर सुद्धा होतं! त्यांनी खूप प्रयत्न केले मला या कामासाठी तयार करायला पण, मी नकारच देत असले तेव्हा मला त्यांनी धमकी दिली होती, तुला मी नक्की हे काम करायला लावणार!" सोनिया ने सगळं आठवून सांगितलं.
**************************
इथे सी.आय.डी. ब्यूरो मध्ये आता मोनिका ला शोधण्यासाठी बऱ्याच हालचाली वाढल्या होत्या! खूपशी माहिती त्यांना मिळाली होती... रवींद्र च्या घरातून मिळालेल्या जर्नल्स आणि नियती ने पेन ड्राईव्ह मधून दिलेली माहिती यात बरंच साम्य होतं! पुरातन आणि आधुनिक यांचा संगम करता करता तो नक्की कोणता तरी वेगळाच रिसर्च करत होता हे स्पष्ट झालं होतं! 

"ईशा ने जे बोटांचे ठसे रवींद्र च्या घरातून उचलले आहेत ते मी आपल्या क्रिमिनल डेटाबेेस मध्ये बघितले! साधारण चार वर्षांपूर्वी एका माथेफिरू संशोधकाला अटक करण्यात आली होती त्याच्या फिंगर प्रिंट शी ते मॅच झाले आहेत!" डॉ. विजयंनि ब्यूरो मध्ये येऊन सांगितलं. 

"ओके... ईशा! जरा सगळी कुडंली काढ त्याची..." सुयश सर म्हणाले. 

ईशा ने लगेच डेटाबेेस मध्ये त्याच्या विषयी सर्च केलं! 

"सर! आपल्या डेटा प्रमाणे, त्याचं नाव रॉबिन आहे! तो डायरेक्ट माणसांवर प्रयोग करायला लागला होता यामुळे लोकं मरणाच्या दारातून परत आली आहेत! त्याच्या या सगळ्या कामामुळे त्याला ट्रीटमेंट साठी दुसऱ्या राज्यात पाठवलं होतं! काही महिन्यात तो बरा झाला तेव्हा त्याची शिक्षा सुरू झाली... पण, त्याचं चांगलं वर्तन बघून कोर्टाने त्याला साधारण दोन महिन्यांपूर्वी सोडून दिलं!" ईशा ने सगळं सांगितलं. 

"सर, नियती ने जे पेन ड्राईव्ह दिलं आहे त्यात सुद्धा रॉबिन नाव आहे... हा तोच रॉबिन असेल असं वाटतंय! त्याने मुद्दाम चांगलं वागण्याचं नाटक केलेलं असणार..." विक्रम म्हणाला. 

एवढ्यात निनाद चा फोन वाजला... 

"सर! नियती चा फोन आहे.." तो म्हणाला आणि फोन उचलला.

"हॅलो! हा बोल नियती..." तो म्हणाला.

"मला आज इथे जुने काही फोटो मिळाले आहेत! स्टाफ रजिस्टर मध्ये आहेत फार वर्षांपूर्वीचे! मी मेल केले आहेत एकदा चेक करून घे..." नियती म्हणाली. आणि तिने लगेच फोन ठेवला. 

"सर! नियती ने जुन्या स्टाफ रजिस्टर मधून काही फोटो मेल केले आहेत!" निनाद ने सांगितलं.

ईशा ने लगेच मेल चेक केला आणि सगळेजण फोटो पाहू लागले! 

"ईशा! एक काम कर, हे फोटो थोडे एडिट कर.. साधारण दहा ते बारा वर्ष आधीचे हे फोटो आहेत तर, आज ही सगळी माणसं कशी दिसत असतील हे कळेल आपल्याला...." विक्रम म्हणाला.

"येस सर!" ईशा म्हणाली. 

तिने फोटो एडिट करून घेतले! आता त्यातला एक फोटो ओळखू येऊ लागला होता! 

"सर, हा तर... हा यशवंत कसा असेल?" सोनाली एक फोटो पाहून म्हणाली. 

"या स्टाफ डिटेल्स मध्ये तरी तेच लिहिलं आहे...  बाकी स्टाफ सुद्धा बघूया कोण आहे..." सुयश सर म्हणाले. 

ईशा ने बाकी स्टाफ चे फोटो दाखवायला सुरुवात केली! 

"एक मिनिट! हा फोटो साधारण तीन ते चार वर्ष जुना वाटतोय... ही मुलगी आज कशी दिसत असेल जरा एडिट कर..." सुयश सरांनी सांगितलं. 

ईशा ने लगेचच फोटो एडीट केला! 

"आत्ता सगळं क्लिअर झालं... विक्रम! तो ड्रोन कुठे गेला असेल हे समजलंय मला! आज रात्री मोनिका सुखरूप आपल्या सोबत असेल..." सुयश सर म्हणाले. 

"म्हणजे? सर नक्की काय करायचंय?" विक्रम ने विचारलं. 

"सांगतो! सगळं सांगतो... एक मिनिट..." सुयश सर म्हणाले. 

त्यांनी लगेच नियती ला फोन केला... 

"नियती! तू रिसर्च सेंटर मध्ये काहीही न बोलता सरळ ब्यूरो मध्ये ये... आपलं आता तिथलं काम झालं आहे... कोणालाही काहीही सांगू नकोस.. मला केतकी वर संशय आहे..." सुयश सर म्हणाले. 

त्यांचा निरोप मिळाल्यावर ती तडक ब्यूरो मध्ये आली.

"सर.. तुम्हाला केतकी वर का संशय आहे?" नियती ने विचारलं. 

"तिने तुला रॉबिन आणि यशवंत च नाव सुद्धा ऐकलं नाही असं सांगितलं होतं बरोबर? पण, ती जॉईन झाल्यानंतर एक वर्षाने त्या दोघांनी राजीनामा दिला होता! म्हणजे ती खोटं बोलत होती... मला वाटतंय की रवींद्र पर्यंत सगळ्या बातम्या ही केतकी च पोहोचवत असणार..." सुयश सर म्हणाले. 

"मग आता? तिला आपल्यावर जर संशय आला असेल तर?" नियती ने विचारलं. 

"नाही... माझ्याकडे एक प्लॅन आहे... त्याने नक्की ही केतकी च रवींद्र ला मिळालेली आहे का समजेल.... यात नियती तुझी महत्वाची भूमिका असेल... आपण जे आता करणार आहोत ते अत्यंत सावधपणे करायचं आहे..." सुयश सर म्हणाले. 

सगळे एकदम येस सर म्हणाले! 

क्रमशः.....
****************************
सुयश सरांनी काय प्लॅन केला असेल? अभिषेक ला अभिज्ञा ने काय सांगितलं होतं? कुठे असेल मोनिका? काय घडत असेल त्या हवेलीच्या बंद खोलीत? कसले आवाज आले असतील तिकडून? पाहूया पुढच्या भागात! तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. केतकी असेल का या सगळ्या मागे? तुमचं काय मत आहे हे सुद्धा सांगायला विसरू नका... 

🎭 Series Post

View all