Login

गूढ (भाग-१)

The mestry of house.

गूढ (भाग-१)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाचा याच्याशी काहीही संबंध नाही. कथेतील सर्व नावे, प्रसंग, ठिकाण पूर्णतः काल्पनिक आहे. कथा कोणत्याही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

नियती! साधारण २७ ते २८  वर्षाची मुलगी!मुंबईत एकटी राहत होती! लहानपणीच आई - बाबा अपघातात गेलेले... चुलत काका ने सांभाळ केला कालांतराने ते सुद्धा गेले! आता नियती च्या पुढे मागे कोणी नव्हतं! मुंबईत आली तेव्हा स्वतःची स्वप्न घेऊनच! फॉरेन्सिक डॉक्टर होती ती! अनुभव मिळावा म्हणून डॉ. विजय यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम करत होती... जवळ जवळ एक दीड वर्ष झालं असेल तिला मुंबईत येऊन!  मुंबई सारख्या शहरात इतक्यात स्वतःचं घर घेणं म्हणजे फार कठीण होतं, म्हणून ती भाड्याने राहत होती! आठवडाभरापूर्वी तिने घर बदलल होतं! हे घर आधीच्या घराच्या तुलनेत लॅब पासून जवळ होतं, पाच मिनिटं चालत मेन रोड वर आलं की लगेच बस मिळायची जी सरळ तिच्या लॅब समोर थांबायची. आधी ती जिथे राहत होती तिथून दोन बस बदलून तिला प्रवास करावा लागायचा म्हणून खरतर तिने घर बदलण्याचा निर्णय घेतला होता. पेपरात जाहिरात वाचून ती तिथे पोहोचली होती. 
          मुंबई सारखं ठिकाण असून पण हे घर रहदारी पेक्षा जरा लांब होतं, शांतता, आजू बाजूला छान झाडं, तिच्या घराच्या बाजूला मोजून चार ते पाच घरं अगदी नियतीला हवं तसं होत हे घर आणि म्हणूनच तिने लगेच शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला होता. इथे शिफ्ट झाल्यावर तिला समजलं होतं चार घरांपैकी दोन घरं तर बंद आहेत! तिसऱ्या घरात एक वयस्कर जोडपं राहत पण चौथ्या घरात कोण राहतं हे काही तिला समजलेलं नसतं! आठवडाभरात नियती समोरच्या घरातल्या निंबाळकर आजी, आजोबांना दोन ते तीन वेळा ओझरती भेटली होती. ती कामाला जाताना किंवा परत येताना तोंड ओळख झाली होती तेवढीच! रविवारी नियती ने विचार केला थोडावेळ आजी आजोबांशी जाऊन बोलून येऊया... तसही आपल्याला आज सुट्टी आहे आणि तेवढीच ओळख पण होईल.... म्हणून ती निंबाळकर आजी, आजोबांच्या घरी गेली. 
          नियतीने दारावरची बेल वाजवली.... टिंग टॉंग! आतून आवाज आला... दार उघड आहे या आत... नियती आत गेली.... 
नियती:- नमस्कार! मी नियती आठवडा भरापूर्वी तुमच्या समोरच्या घरात राहायला आली आहे. मी फॉरेन्सिक डॉक्टर आहे. आज सुट्टी होती म्हणून म्हणलं जरा शेजारी जाऊन यावं! 
आजी:- काय? तू त्या समोरच्या घरात राहायला आली आहेस? 
नियती:- हो! पण तुम्ही असं का विचारलं?
आजोबा:- अगं पोरी ते घर काही बरोबर नाही बघ! 
नियती:- म्हणजे? पाणी, लाईट सगळं नीट आहे... छान उजेड येतो, हवेशीर आहे अजून काय पाहिजे... 
आजी:- तसं नाही गं! तिथे जे कोणी राहायला आलंय त्याचा परत कधी पत्ताच लागला नाही. असं म्हणतात तिथे भुताटकी आहे! तू घर घेताना नीट चौकशी तरी करायची होतीस. 
आजोबा:- हो ना! तिथे जे कोणी राहतं त्याचं महिनाभरात काहीतरी होतंच तो व्यक्ती गायब होतो तिथून.... 
नियती:- काय आजी! मुद्दाम गोष्ट सांगताय ना! मी नाही घाबरणार तुमच्या या गोष्टींना! आणि मुळात माझा विश्वास नाहीये या सगळ्यावर.... 
आजी:- नाही ग नियती! जरी आपली हि पहिली ओळख असली तरी तू माझ्या नाती सारखी आहेस असं का करेन मी? 
नियती:- नका काळजी करू आजी! असं काही नसतं.... चला मी निघते अजून घरात बरचसं काम बाकी आहे. 
असं म्हणून नियती निघू लागते... तेवढ्यात आजी तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहून बोलतात; "पस्तावशील पोरी तू! तीन दिवसात आमावस्या आहे तेव्हा तुझं तुलाच कळेल!" 
         नियती घरी आली. तिला आजी, आजोबांचं वागणं जरा विचित्रच वाटलं! पण त्या कडे दुर्लक्ष करून ती घरातली कामं करू लागली. रविवार एकच सुट्टीचा वार मिळत असल्याने बरचसं घर लावणं पण बाकी होतं... ती तिच्या कामात व्यस्त झाली आणि आजी आजोबा काय म्हणाले हे सुद्धा तिच्या डोक्यातून निघून गेलं! फायनली सगळं काम झाल्यावर तिने पाठ टेकली. संध्याकाळचे चार वाजले होते.... थोड्यावेळाने उठून चहा घेते असा विचार करून ती पहुडली. आता मात्र तिला आजीचं बोलणं आठवू लागलं! ती स्वतःशीच विचार करू लागली; किती अंधश्रद्धा आहे ना.... त्या आजी असं का बोलत असतील... नक्कीच इथे भूत बित काही नाहीये पण जर त्या माणसं गायब झाली असं म्हणत असतील तर ती कशी गायब झाली? की असं काही घडलंच नसेल? वयामुळे आजी आजोबांना असं वाटत असेल का? काय माहित नक्की काय भानगड आहे! इतकं छान घर आहे..... मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात, छान प्रकाश येतो, हवेशीर आहे आणि या घराची अशी बदनामी? मला तर वाटतंय कोणीतरी हि अफवा पसरवली असणार आणि म्हणूनच या घराला लवकर भाडोत्री पण मिळत नाही. जाऊदे म्हणा आपल्याला काय! चला नियती मॅडम उठा आपण विचार करायला लागलात कि तासन् तास कसे निघून जातात कळत नाही! घड्याळ बघा... ५.३० झालेत! चहा घेऊन परत रात्रीच्या जेवणाची तयारी करायची आहे! असं स्वतःशीच पुटपुटत ती उठते! सगळं काम आवरे पर्यंत ८.३० होतात! नियती जेवून घेते आणि थोडा वेळ पुस्तक वाचत बसते..... रात्री ११ च्या सुमारास झोपायला जाते.... 
         पण काही केल्या तिला झोप येत नसते! आजी चे शब्द तिच्या कानात घुमत असतात... "तीन दिवसात आमावस्या आहे तेव्हा तुलाच सगळं समजेल!" तिला भीती वाटत नसते तर नक्की असं काय घडतं त्या घरात हे जाणून घ्यायची उत्सुकताच जास्त वाटत असते! विचारा विचारा मधेच तिला कधी झोप लागते समजत नाही! सकाळी जाग येते ती थेट अलार्म च्या आवाजानेच! सगळं पटापट आवरून ती कामाला जायला निघते.... लॅब ला गेल्यावर डॉ. विजय ना ती काल आजी जे बोलत होत्या ते सगळं सांगते! ती म्हणते; "सर! माझा काही या गोष्टींवर विश्वास नाहीये! पण मला सारखा एक प्रश्न सतावतोय... त्या आजी आजोबांना का सारखं असं वाटत असेल? तिथे राहणारे खरंच गायब झाले असतील का?" या वर डॉ. विजय म्हणतात; "नसेल! वयामुळे त्यांना असं वाटू शकतं! एकटेपणाच्या भावनेने कधी कधी मेंदू नसलेल्या व्यक्ती बनवतो! तू काळजी करू नकोस! कामावर लक्ष दे..." असं म्हणून ते सुद्धा कामाला लागतात. नियतीला सुद्धा त्यांच्याशी बोलून जरा हलकं वाटत असतं! संध्याकाळी तिला घरी यायला जरा उशीरच होतो! आजी आजोबांच्या घराच्या लाईट्स बंद असतात.... झोपले असतील बहुतेक असा विचार करून नियती तिच्या घरी जाते.... फ्रेश होऊन सगळं आवरून ती सुद्धा झोपायला जाते... असेच दोन दिवस निघून जातात... शेवटी आमावस्येचा दिवस उजाडतो! नियती नेहमीप्रमाणे आवरून कामाला जाते! आज आजी आजोबा तिला दिसत नाहीत. कदाचित अजून झोप लागली असेल असा विचार करून ती लॅब ला जाते..... आज सुद्धा लॅब वरून यायला तिला उशीर होतो..... 
क्रमशः.....

आता आमावस्येची रात्र आली आहे... आजींनी सांगितलं त्या प्रमाणे काही अघटित घडेल कि हे सगळे आजींच्या मनाचे खेळ आहेत पाहूया पुढच्या भागात.... 

🎭 Series Post

View all