Login

गूढ (भाग-१०)

The story of mysterious house.

गूढ (भाग-१०)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाचा याच्याशी काहीही संबंध नाही. कथेतील सर्व नावे, प्रसंग, ठिकाण पूर्णतः काल्पनिक आहे. कथा कोणत्याही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

देशमुख:- हि जागा बिल्डर्स ना हवी होती... आणि ते चांगला मोबदला सुद्धा देणार होते पण समोरच्या घरातले ते म्हातारा म्हातारी इथून हालायचं नाव पण घेत नव्हते... बाकी कोणाला काही प्रॉब्लेम नव्हता पण त्या दोघांमुळे नुकसान होत होतं! म्हणून मी ठरवलं असे काही प्रकार करायचे कि ते दोघं घाबरून हि जागा बिल्डर ला विकून जातील.... हे घर तर बंदच होतं! हा हरीश इथला केअर टेकर होता... मी याला पण माझा प्लॅन सांगितला! पण, जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा हे सगळं बोलणं एका डॉक्टर ने ऐकलं आणि आम्हाला हि तस्करीची आयडिया दिली.... त्या डॉक्टरनेच त्याचा एक डॉक्टर मित्र आमच्या मदतीला दिला.... पण, त्याची पैश्याची भूक वाढायला लागली म्हणून आम्ही त्याला पण आमच्या वाटेतून दूर केलं! 
        सुशांत:- हा पक्या कसा भेटला तुला? काय रे तू तर फक्त लहान मोठ्या चोऱ्या करायचास ना मग तस्करी पर्यंत मजल कशी गेली? 
पक्या:- मी चोरी करणं सोडून ड्रग्स स्मगल करायला लागलो होतो... मला एकेदिवशी इथे हे अवयव तस्करी च काम चालतं हे समजलं म्हणून मग मी सुद्धा या लोकांशी हात मिळवणी केली आणि जेव्हा जेव्हा ड्रग्सचे consignment पाठवायचे असायचे ते आम्ही याच अवयव काढलेल्या बॉडी मधून पाठवायचो.... यामुळे या दोघांना सुद्धा जास्तीचा फायदा मिळत होता.... आज पण एक ऑर्डर होती ती आम्ही या मुलीच्या बॉडीत भरून पाठवणार होतो..... 
सुशांत:- तुम्ही डॉ. विजय ना या प्रकरणात का अडकवलं? 
देशमुख:- ज्या बॉड्या आम्ही पाण्यात फेकायचो त्या यांच्या लॅब मध्ये जायच्या आणि त्यांच्या रिपोर्ट मुळे आम्ही गोत्यात आलो असतो म्हणून मग त्यांच्या बायकोला आम्ही किडनॅप केलं आणि त्यांच्या कडून दोन ऑपरेशन करून घेतली.... तसही त्या डॉक्टर ला मारल्यावर आमच्याकडे दुसरा डॉक्टर लगेच उपलब्ध सुद्धा नव्हता म्हणून यांना जाळ्यात अडकवायचं ठरवलं!
नियती:- मग पहिल्या वेळेला आरशावर रक्ताने लिहिलेलं आणि दुसऱ्या वेळेला कोणीतरी हसताना दिसणं हे सगळं काय होतं? 
देशमुख:- याच गुप्त दाराने येऊन मी ते लिहिलं होतं! मला इथे येऊन ते लिहायला मिळावं म्हणून हा हरीश बाहेरून किचन ची खिडकी उघडून काहीतरी पडल्याचा रेकॉर्डेड आवाज प्ले करायचा.... त्यामुळे इथे राहणाऱ्या माणसांचं लक्ष वेधलं जायचं आणि ते कसला आवाज झाला बघायला तिथे जायचे..... मी इथे बेडखालीच लपून बसलेलो असल्यामुळे पटकन बाहेर येऊन लिहून जायचो..... ती सावली पण मी होलोग्राफ च्या मदतीने तिथे रिफ्लेक्ट करायचो! आणि आवाज पण सगळे रेकॉर्डेड होते.... आमची हि कामं सोपी व्हावीत म्हणून तर मी किचन च्या खिडकीची कडी दुरुस्त करून घेतलेली नव्हती... या सगळ्या धक्क्यातून सावरून घरात कोणी आहे का हे बघेपर्यंत मी या गुप्त दाराने कधीच गेलेला असायचो त्यामुळे पकडला गेलो नाही...... आज पण पकडलो गेलो नसतो आम्ही पण, या नियातीमुळे झालं! पहिल्यांदा जेव्हा हिने मला घरी बोलावलं तेव्हाच एकतर मी हिला मारायला हवं होतं किंवा इथून पिटाळून लावायला हवं होतं! इथेच चुकलं माझं! 
सुशांत:- ए गप! केल्या कर्माचा पश्चाताप तर होत नाहीये.... चाललाय अजून बळी घ्यायला... 
          देशमुख आणि पक्याने दिलेल्या कबुली जबाबामुळे पोलीस त्यांना घेऊन जातात! त्यांनी सांगितल्या प्रमाणे त्या हॉस्पिटल च्या डॉक्टर ना सुद्धा ताब्यात घेण्यात येतं.... कारण, सुशांतनेच त्यांच्या विरुद्ध पुरावे गोळा केलेले असतात...  सुशांत, नियती आणि डॉ. विजय निंबाळकर आजी - आजोबांच्या घरी येतात.... एव्हाना डॉ. विजय च्या पत्नी (अनुजा) यांना शुद्ध आलेली असते.... 
डॉ. विजय:- अनु! तू बरी आहेस ना आता... त्या लोकांनी जास्त त्रास नाही ना दिला... 
अनुजा:- मी बरी आहे! नका काळजी करू.... मला वाटलेलं त्यांनी तुम्हाला यात अडकवलं आहे आता आपली यातून सुटका नाही!
डॉ. विजय:- अगं, असं कसं झालं असतं! हि आहे ना आपली लेक नियती.... हिच्या मुळेच हे शक्य झालं! नियतीने जर हिंमत दाखवली नसती तर आपण या दलदलीत रुततच गेलो असतो! कदाचित जगलो पण नसतो.... 
नियती:- नाही! हे सगळं सुशांतच्या मदतीशिवाय शक्य नव्हतं! अरे हो एक राहिलंच; सुशांत तू सरांच्या कसा संपर्कात राहत होतास? 
सुशांत:- पहिल्यांदा जेव्हा मला खबऱ्याकडून कळलं होतं कि, अनुजा मॅडम ना किडनॅप केलंय आणि म्हणून सरांना असं वागावं लागतंय तेव्हा मी एका जाहिरात पत्रकं वाटणाऱ्या मुलाचा वेष घेऊन सरांच्या नेहमीच्या रस्त्यावर उभा होतो.... सर तिथे आल्यावर मी त्यांना जाहिराती च्या त्या पत्रकावर लिहून दिलं; "सर मला माहितेय तुम्ही तस्करीच्या प्रकरणात गोवले गेले आहात हे नियतीला सुद्धा सांगा... जे काही आहे ते खरं खरं सांगा... आम्ही नक्की मॅडम ना वाचवू...." सुरुवात तर अशी झाली पण, त्यांच्याशी फोन वरून किंवा प्रत्यक्ष भेटून हे सगळं बोलणं शक्य नव्हतं.... नंतर च तुला माहित आहेच! तू आणि सर रिपोर्ट्स च्या फाईल थ्रू बोलायचात.... नंतर काल जेव्हा सरांना त्या पक्या ने भेटायला बोलावलं होतं ते मी आपण कॉल टॅप केलेला त्यावरून ऐकलं पण नेमकी वेळ काही मला समजली नाही... काहीतरी टेक्निकल एरर आलं! म्हणून मग मी एका अंध व्यक्तीच्या रुपात जाऊन सरांना धडकलो.... ते मला उठवायला जसे खाली वाकले तेव्हा मी हळूच त्यांच्या खिशात तो हॉस्पिटल चा पत्ता ज्या वर खबऱ्याचा फोटो होतो ते कार्ड त्यांच्या खिशात टाकलं आणि म्हणालो; "नियती, कालचे डिटेल्स, माझा खबरी,नियातीवर पाळत आज" सरांना मला काय म्हणायचं होतं हे समजलं.... आणि त्यांनी मी सांगितल्या प्रमाणे तुला फाईल घेऊन तिथे पाठवलं!
         नियती:- आजी तुम्हाला या बाबतीत कधी समजलं? नाही म्हणजे अनुजा मॅडम तुमच्याकडे होत्या...... 
आजी:- सुशांत जेव्हा इथे पेस्ट कंट्रोल करणाऱ्याच्या वेशात आला होता तेव्हाच आम्हाला दोघांना त्याने विश्वासात घेऊन सगळं सांगून ठेवलं होतं! कारण अनुजा वहिनींना जरी सोडवलं तरी एवढ्या लगेच कुठे लपवता येणार म्हणून..... 
नियती:- सॉलिड आहेस यार तू! 
डॉ. विजय:- हो खरंच! जर त्यावेळी सुशांतने मला सांगितलं नसत ना कि त्याला समजलंय मी यात गोवलो गेलो आहे तर कदाचित आज मी तुझ्या मृत्यूला सुद्धा कारणीभूत ठरलो असतो आणि स्वतःला माफ सुद्धा करू शकलो नसतो! लॅब मध्ये पण त्यांनी चीप लावून ठेवली होती त्यामुळे मला तुझ्याशी काही बोलता येत नव्हतं! 
नियती:- हो! मला सुशांतने हे सांगितलं... एक दोन वेळा आपण लॅब मधेच सगळं बोललो होतो त्यामुळे या गँग ला आपला प्लॅन समजत होता... पण सुशांत च्या हे लक्षात आल्यावर त्याने अगदी शिताफीने सगळी चक्र फिरवली आणि कामानिमित्त बाहेर जातो म्हणून सांगितलं! 
        हे एवढे सगळे प्लॅन्स आणि सगळ्यांची धाडसी वृत्ती बघून आजी आजोबा थक्क झाले होते.... अनुजा ला सुद्धा सगळं नीट पार पडलं आणि या जाळ्यातून सगळे वाचले म्हणून आनंद झाला होता.... एव्हाना हे सगळं निस्तरता निस्तरता पहाट झाली होती..... सगळेच खूप थकलेले होते..... अनुजा ला अजून म्हणावी तशी ताकद नव्हती.... सगळ्यांचा थकलेला चेहरा पाहून आजींनी सगळ्यांसाठी छान चहा टाकला.... चहामुळे सगळ्यांना तरतरी आली.... 
डॉ. विजय:- पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार! नियती, सुशांत तुमच्या मुळेच आज माझी अनु सुखरूप आहे.... मी तुमचे हे उपकार कधी विसरणार नाही.... 
नियती:- सर हे काय? मुलगी म्हणता ना मला मग ही उपकाराची भाषा का करता? मॅडम आता तुम्हीच सांगा यांना! 
अनुजा:- मी त्यांना काय सांगणार! तू पण आम्हाला सर आणि मॅडम बोलून परकं च तर करतेयस! आज पासून आम्ही दोघं तुझे आई - बाबा! यांना तुला सर म्हणायचं असेल तर म्हण पण फक्त कामाच्या ठिकाणी! 
डॉ. विजय:- आज पासून तू आमच्या बरोबर राहायचं! आणि हो, पुन्हा स्वतःला अनाथ समजायचं नाही! आम्ही आहोत तुला!
       नियती सुद्धा थोडी इमोशनल होते...... 
सुशांत:- सर मला काहीतरी बोलायचं आहे..... नियती ला तुम्ही मुलगी मानली आणि मला? 
अनुजा:- तू आमचा होणारा जावई! 
नियती लाजते.... तिच्याही मनात तेच असतं जे अनुजा नी ओळखलेलं असतं!....... 
शेवटी आता सगळं काही नीट होतं! घरात असणाऱ्या खोट्या भूतांचं गूढ सुद्धा उकलेलं असतं आणि सोबत शेवट सुद्धा गोड होतो.... 

समाप्त.... 

(कथा कशी वाटली हे कमेंट्स मधून नक्की सांगा.... लाईक, शेअर करायला सुद्धा विसरू नका....) 

🎭 Series Post

View all