गूढ (भाग-२)
© प्रतिक्षा माजगावकर
(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाचा याच्याशी काहीही संबंध नाही. कथेतील सर्व नावे, प्रसंग, ठिकाण पूर्णतः काल्पनिक आहे. कथा कोणत्याही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
नियती लॅब मधून निघाली तेव्हा ८.३० वाजून गेले होते... ती गडबडीत बस स्टॉप वर आली. नशिबाने अजून तिच्या एरियात जाणारी शेवटची बस अजून गेली नव्हती... ती बस ची वाट पाहत तिथे बसली... संध्याकाळ पर्यंत छान असणाऱ्या वातावरणाने सुद्धा आता रौद्र रूप धारण केले होते.... अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती त्यामुळे रस्त्यावरची रहदारी सुद्धा एकदम कमी झाली होती..... इतक्यात नियती ची बस आली.... नियती बस मध्ये चढली.... पावसामुळे बसची गती बरीच मंदावली होती... जागोजागी खड्डे आणि ट्राफिक मुळे एरवी १५ मिनिटात प्रवास संपायचा पण आज अर्धा तास लागला... नियती तिच्या घराच्या जवळ असणाऱ्या मेन रोड वर उतरली... छत्री असूनही काही उपयोग होत नव्हता... सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ती बऱ्यापैकी भिजलीच होती!
मेन रोड वर स्ट्रीट लाईट मुळे उजेड तरी होता पण आत चालत आल्यावर तो हि नाही! सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता.... पाऊस आणि आमावस्या यामुळे चंद्राचाही उजेड नाही! नियती मोबाईल च्या टॉर्च मध्ये चालत होती... पावसाचा जोर आता थोडा ओसरला होता पण, वारा काही थांबत नव्हता... एकदम थंड, अंगाला बोचणारा वारा वाहत होता... विजा सुद्धा चमकू लागल्या होत्या... ढगांचा गडगडाट सुद्धा एवढा होत होता की असं वाटत होतं आत्ता आभाळ फुटेल कि काय.... ५ मिनिटात चालून संपणारा रस्ता आज खूप मोठा वाटत होता.... एखाद मिनिट चालल्यावर तिच्या मोबाईल ची बॅटरी सुद्धा संपली.... होता नव्हता तो पण उजेड गेला... "शी! या मोबाईलच पण आत्ताच चार्जिंग संपायच होतं!" असं स्वतःशीच म्हणाली.... आता डोळ्यासमोर फक्त मिट्ट अंधार होता... नियती तशीच हळूहळू चाचपडत घरी पोहोचली! साधारण ९.४५ झाले असतील... घरी आल्यावर तिने लाईट च स्विच ऑन केलं तर लक्षात आलं लाईट नाहीये.... "घ्या याला म्हणतात दुष्काळात तेरावा महिना!" असं म्हणून तिने मेणबत्ती शोधून लावली... घरी येता येता ती पूर्णतः भिजली होती.... लगेच ती फ्रेश होऊन कपडे बदलून आली.... आज तर नेहमी पेक्षा जरा जास्तच उशीर झाला होता... त्यात लाईट नव्हती म्हणून आत्ता फक्त सँडविच खाऊन झोपूया असं ठरवून ती खाऊन झोपायला गेली.... नियतीला झोप लागणार इतक्यात कसला तरी आवाज आला... काहीतरी पडल्याचा! ते पाहण्यासाठी ती उठली... अंधारात धड काही दिसत नव्हतं बहुतेक उंदीर असेल असा विचार करून ती माघारी वळली... आणि बेडरूम मध्ये आली...
एवढ्यात लाईट पण आले.... पण, बेडरूम मध्ये पाऊल ठेवताच ती दचकली... कोणीतरी आहे तिथे असं तिला वाटत होतं! तिने लाईट लावली आणि सगळी कडे पाहिलं पण कोणीच नव्हतं! एवढ्यात तिचं लक्ष आरशावर गेलं..... आरशावर "निघून जा इथून" असं लिहिलं होतं! नियतीने थोडावेळ त्याला हात न लावता मोबाईल थोडा चार्ज करून घेतला आणि त्यात त्याचा फोटो काढला... आणि मग पाहिलं तर ते रक्ताने लिहिलं होतं! थोडावेळ काय करावं हेच तिला सुधरत नव्हतं! नियतीला कालचे आजीं चे शब्द आठवू लागले... पण तिचं मन मानायला तयार नव्हतं! तिला सारखं असच वाटत होत की भूत बित काही नाही हे काहीतरी वेगळं आहे! तिने सगळ्या घरात पाहिलं कोणी आहे का... कारण इतक्यात कुठे पळून जाणं तर शक्य नाही त्यात लाईट पण नव्हते.... पण तिला कोणी दिसलं नाही! या सगळ्या धावपळीत रात्रीचे १.३० वाजून गेले होते... तिने आरश्यावरचे ब्लड सॅम्पल सुद्धा घेऊन ठेवले... उद्या घरमालकाला या बाबतीत विचारू आणि लॅब मध्ये गेल्यावर हे रक्त नक्की माणसाचं आहे की कोणत्या जनावरांचं हे पण बघू.... असं ठरवून ती झोपायला गेली.... पण झोप काही लागत नव्हती! कधी एकदा सकाळ होते असं तिला वाटत होतं!
पहाटे पहाटे साधारण ४ च्या सुमारास तिचा डोळा लागतो आणि जाग येते ती ६ चा अलार्म झाल्यावर.... जेमतेम दोन च तास झोप मिळाल्याने डोकं खूप जड झालेलं असतं! तरीही तशीच उठून ती सगळं आवरते! ८ वाजता घरमालकाला फोन करते...
नियती:- हॅलो! देशमुख साहेब मी नियती!
देशमुख:- हा बोला ना काय झालं?
नियती:- माझं जरा तुमच्याकडे अर्जंट काम होतं! आज जरा भेटाल का? म्हणजे तुम्ही म्हणाल तिथे भेटू पण आजच भेटायचं आहे!
देशमुख:- ठीक आहे मी येतो घरी तासाभरात!
नियती:- हो चालेल! या मी वाट बघतेय....
असं म्हणून फोन ठेवते.... तासाभरात देशमुख तिथे येतात....
देशमुख:- बोला नियती मॅडम! काय झालं? एवढं अर्जंट का बोलावलं?
नियती:- काल रात्री इथे काहीतरी वेगळीच घटना घडली त्या बद्दल तुम्हाला सांगायचं होतं!
नियातीचं एवढं बोलून झालं आणि देशमुखांना दरदरून घाम फुटला.....
नियती:- काय झालं सर? तुम्हाला एवढ्या गार हवेत पण इतका घाम का येतोय? मी तर अजून काही सांगितलंच नाहीये......
देशमुख:- सॉरी! सॉरी मॅडम.... मी तुम्हाला हे आधी सांगायला हवं होतं.... मला कल्पना आहे काल काय झालं असेल... इथून निघून जा असं लिहिलेला मेसेज तुम्ही वाचला असेल ना...
नियती:- म्हणजे! हे तुम्हाला माहित होत तर?
देशमुख:- हो! तुमच्या आधी इथे चार पाच लोक राहून गेलेत... त्यांना सुद्धा असाच अनुभव आला.... म्हणूनच इथे मला लगेच भाडोत्री मिळत नाही... आणि म्हणून मी तुम्हाला या बद्दल काही सांगितलं नाही!
नियती:- म्हणजे परवा ते आजी आजोबा बरोबर बोलत होते! पण मला ही भुताटकी वैगरे वाटत नाहीये.... मी तुम्हाला इथे एवढ्यासाठी बोलावलं होतं की मला जाणून घ्यायचं होत या बद्दल तुम्हाला कल्पना आहे का ते! मला फसवलत ते फसवलंत! दुसऱ्या कोणाला असं फसवू नका! मी इथेच राहणार आहे.... बघू कोण आहे ते भूत...
देशमुख:- हो! सॉरी मॅडम नाही करणार अशी चूक परत! काही मदत लागली तर नक्की सांगा... चला येतो मी....
असं म्हणून देशमुख जातात.... नियती लॅब ला जायला निघते तेव्हा आजी तिला हाक मारतात...
आजी:- नियती! ए पोरी इकडे ये जरा...
नियती:- हा बोला आजी... काही हवं होतं का?
आजी:- नाही! काल तुला यायला उशीर झाला का? आणि ते देशमुख का आले होते? मी म्हणलं तसंच घडलं ना काल?
नियती:- हो खरंतर मला काल घरी यायला नेहमी पेक्षा जरा जास्तच उशीर झाला होता! पाऊस यायला लागला त्यात लाईट नव्हते म्हणून! आणि देशमुखांचं म्हणाल तर हो! तुम्ही म्हणलं होतं तसंच काहीसं झालं काल... पण मला नाही वाटत ते भूत बित काही आहे.... तुम्ही नका काळजी करू... मी छडा लावते या प्रकरणाचा! बघूया असं कोणतं भूत आहे ज्याला मी तिथे राहिलेली नकोय...
आजी:- अगं पोरी! आता तरी गांभीर्याने बघ याकडे... थोडे दिवस पाहिजे तर माझ्याकडे राहा पण तिथे राहून जीव धोक्यात नको घालुस..
नियती:- थँक्यू आजी तुम्ही एवढी काळजी करताय... पण असुदे! काही नाही होणार मला... अगदीच काही वाटलं तर येईन तुमच्याकडे मदतीसाठी! चला मी येते मला लॅब ला जायला उशीर होतोय....
असं म्हणून लॅब ला जायला निघते....
क्रमशः.....
आता पुढे काय होईल.... नियतीने जे रक्ताचं सॅम्पल घेतलं आहे त्यावरून काही उलगडू शकेल? यात तिची कोणी मदत करेल का? कि खरंच हा भुताचा काही प्रकार आहे.... पाहूया पुढच्या भागांमध्ये..... कंमेन्ट करून नक्की अभिप्राय कळवा....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा