Login

गूढ (भाग-९)

The story of mysterious house.

गूढ (भाग-९)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाचा याच्याशी काहीही संबंध नाही. कथेतील सर्व नावे, प्रसंग, ठिकाण पूर्णतः काल्पनिक आहे. कथा कोणत्याही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

          नियती दुसऱ्या दिवशी लॅब ला जायला निघते तेव्हा वाटेत सुशांत ला मेसेज करते; "काल आपलं ठरल्याप्रमाणे मी जाऊन बघून आले! मॅडम तिथेच आहेत...." यावर सुशांत चा रिप्लाय येतो; "ठीक आहे! मी आज सरांना याबद्दल कल्पना देतो. काळजी करू नकोस!"
नियती लॅब मध्ये पोहोचते.... आज अजूनही डॉ. विजय तिथे आलेले नसतात.... नियती तोवर एक रिपोर्ट फाईल तयार करते ज्यात लिहिलेलं असतं; "सर! मॅडम माझ्या बाजूच्या घरात आहेत..... उद्या ते लोक मला किडनॅप करायला येतील तेव्हा सुशांत तिथे पोहोचेल आणि आम्ही वाचवू त्यांना! अजूनही त्या लोकांसाठी सुशांत बाहेर गावी च आहे... असचं भासवलं आहे आम्ही! त्यामुळे आम्ही त्यांना वाचवू...." नियती ही तयारी करून ठेवते एवढ्यात डॉ. विजय तिथे येतात.....
नियती:- सर हे कालच्या टेस्ट चे रिपोर्ट्स एकदा प्लिझ चेक करून घ्या ना...
डॉ. विजय:- आण! बघतो...
नियती त्यांना फाईल देते.... ते वाचू लागतात... आणि त्यावर काहीतरी करेक्शन्स करतायत असं दाखवत लिहितात आणि नियती ला देतात..
डॉ. विजय:- हे मी करेकशन्स सांगितलेत ते कर आणि हे बघ हा हॉस्पिटल चा पत्ता आहे इथे नेऊन दे! असं म्हणत एक कार्ड तिच्या हातात देतात.
        नियती ती फाईल घेते त्यावर लिहिलेलं असतं; "आज मला त्या लोकांनी परवा जिथे भेटलो होतो त्याच देवळापाशी रात्री ९.३० वाजता बोलावलं आहे.... हि बातमी सुशांतला द्यायची आहे! पण, तू आज तिथे येऊ नको... आज आणि उद्या ते लोक तुझ्यावर पण नजर ठेवणार आहेत! हे मला सुशांतने मगाशी सांगितलं! या हॉस्पिटल मध्ये त्याचा खबरी वॉर्डबॉय च्या वेशात असेल त्याला नेऊन दे! कार्ड वर त्याचा फोटो आहे त्यावरून तुला त्याला ओळखायला मदत होईल."
नियती:- हो सर करते करेक्शन मग सही करून द्या!
असं म्हणून त्यावर लिहिते; "सुशांत तुम्हाला कसा भेटला?" आणि सरांना देऊन म्हणते सर सही करून द्या!
डॉ. विजय हे वाचतात आणि लिहितात; "नंतर कळेल!" आणि म्हणतात; "हे घे एवढं नेऊन दे!"
नियती:- ओके सर!
नियती सरांनी दिलेल्या पत्त्यावर जाते.... तिला सतत वाटत असतं आपला कोणीतरी पाठलाग करतंय पण, आपल्याला काही माहित नाही असं दाखवून ती तिथे पोहोचते.... नियती हॉस्पिटल मध्ये आत जाते आणि हळूच बघते तर पाठलाग करणारा माणूस बाहेरच थांबलेला असतो.... ती आत जाऊन सुशांतच्या खबऱ्याला ती फाईल देते आणि बाहेर येते... पुन्हा लॅब पर्यंत तो माणूस तिचा पाठलाग करत येतो....
         लॅब मध्ये आल्यावर रोजची रुटीन कामं होतात.... संध्याकाळी नियती नेहमीप्रमाणे घरी जाते.... तो पाठलाग करणारा माणूस नियतीच्या घरावर पाळत ठेऊन असतो..... इथे डॉ. विजय ना त्या माणसाने बोलावलेलं असतं म्हणून सुशांत स्वतः एका म्हाताऱ्याचा वेष घेऊन देवळात बसलेला असतो! थोड्याच वेळात तिथे डॉ. विजय येतात आणि दोनच मिनिटात तो परवा चा माणूस सुद्धा! सुशांतने आधी नियतीने व्हिडिओ पाठवलेला असतो त्यावरून त्याची थोडीफार माहिती काढून ठेवलेली असते! पक्या नावाचा हा गुंड दोन तीन वेळा जेल मध्ये छोट्या मोठ्या चोरीच्या आरोपाखाली जाऊन आलेला असतो पण, आता स्मगलिंग पर्यंत त्याची मजल पोहोचलेली असते!
पक्या:- ए डॉक्टर उद्या त्या पोरीचं ऑपरेशन करायचं आहे तुला! तिला यातलं काही कळता कामा नये... तिचा तो हिरो तो आलाय का परत म्हणजे त्याचा पण बंदोबस्त करायला....
डॉ. विजय:- नाही तो आला नाहीये.... कामानिमित्त तिथेच अडकलाय....
पक्या:- खरं बोल हा! जर तू खोटं बोलतोयस असं समजलं तर तुझ्या बायकोचं काही खरं नाही...
डॉ. विजय:- नाही हो! मी का खोटं बोलेन.... माझ्या बायकोला काही करू नका प्लिझ!
पक्या:- चल चल ठीक आहे! ठेवतो तुझ्यावर विश्वास... उद्याच्या ऑपरेशन ची तयारी झाली आहे... उद्या रात्री ११.३० ला तूच नियतीच्या घरी जाऊन तिला बेशुद्ध करायचं तोवर आम्ही येतोच मग लगेच ऑपरेशन ला सुरुवात करायची....
डॉ. विजय:- काय मी? पण माझं काम फक्त ऑपरेशन करणं आहे... मी नाही करणार हे...
पक्या:- ए काय बोलला रे! थांब आत्ता फोन करून सांगतो तुझ्या बायकोला मुक्ती द्यायला..
डॉ. विजय:- नको! करतो मी... पण, नियती च ऑपरेशन झाल्यावर माझ्या बायकोला सोडाल ना!
पक्या:- आधी कर तरी... आत्ता निघ इथून...
         डॉ. विजय तिथून गेल्यावर तो माणूस पण जातो.... सुशांत च काम तर झालेलं असतं! त्याला उद्याची वेळ कळलेली असते... तो सुद्धा तिथून जातो... आता सुशांत आणि नियती ला भेटता आणि बोलता येणार नव्हतं! दुसरा दिवस उजाडतो! नेहमीप्रमाणे सगळं काही होतं... संध्याकाळी नियती घरी येते सगळं रोजच्या सारखं आवरून ११ वाजता झोपायला जाते... झोप लागणार एवढ्यात बरोबर ११.३० वाजता दारावरची बेल वाजते..... नियती सावध होते.... तिला समजतं हा त्या तस्करीच्या लोकांचा काहीतरी प्लॅन आहे आणि दार उघडते... समोर डॉ. विजय असतात!
नियती:- सर! तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करताय?
असं म्हणत ती हळूच दारामागून घराची चावी काढते आणि बाजूलाच ठेवलेल्या कुंडीत टाकते जेणेकरून नंतर सुशांत आत येऊ शकेल....
डॉ. विजय:- जरा आत चल ना काम होतं!
नियती जशी पाठमोरी वळते तसे डॉ. विजय तिच्या नाकाला क्लोरोफॉर्म लावलेला रुमाल लावतात..... नियती मुद्दाम ओरडण्याचा प्रयत्न करू लागते.... ते हळूच तिच्या कानात बोलतात; "जास्त क्लोरोफॉर्म नाहीये... तू फक्त अर्धा तास बेशुद्ध होशील." ती बेशुद्ध होऊन खाली पडल्यावर लपून बसलेले दोन गुंड येतात दाराला आतून लॅच लावतात आणि नियतीच्या घरात असणाऱ्या गुप्त दाराने बाजूच्या घरात घेऊन जातात....
        हे सगळं लपून बघत असलेला सुशांत सुद्धा आता बाहेर येतो.... त्याने नियतीला कुंडीत चावी टाकलेली बघितलेलं असतं! तो चावीने दार उघडतो... दोन दिवासाआधी नियतीने स्वतःच आतली कडी तोडून ठेवलेली असते... म्हणून खरंतर हे शक्य होतं! या सगळ्यात जवळपास १० मिनिटं झालेली असतात.... सुशांत सुद्धा त्याच दाराने दबक्या पावलाने आत जातो.... तिथे डॉ. विजय आणि दोन गुंड असतात... नियतीला ऑपरेशन करायला ऑपरेशन टेबल वर झोपवलेलं असतं! आजूबाजूला बरेच बॉक्स सुद्धा पडलेले असतात त्याचा आडोसा घेऊन सुशांत डॉ. विजय च्या बायकोला जाऊन सोडवतो.... त्या बेशुद्धीच्या अवस्थेतच असतात... तो बाजूलाच असलेल्या पाण्याच्या तांब्यातून त्यांच्या तोंडावर पाणी मारून त्यांना शुद्धीवर आणतो आणि खुणेनेच काहीही बोलू नका म्हणून सांगतो.... मग त्यांना पाणी प्यायला देऊन तो बोलतो; "मी सुशांत! तुम्हाला इथून सोडवायला आलो आहे... कसलाही आवाज न करता माझ्या बरोबर या.." तोवर इथे गुंडांना संशय येऊ नये म्हणून डॉ. विजय जरा कमी गुंगी येईल असे इंजेक्शन नियतीला देतात आणि हिला पूर्णपणे गुंगी चढत नाहीये आपल्याला थोडावेळ वाट पाहावी लागेल असं सांगून वेळ मारून नेतात...
         सुशांत पुन्हा बॉक्स च्या आडोशाने बाहेर येतो आणि मॅडम ना तिथेच बाजूला लपून बसायला सांगतो.... आणि त्याची बंदूक काढून एकदम गुंडांसमोर येऊन बोलतो; "कोणीही जागचं हलू नका..." ते दोघं गुंड हात वर करून उभे राहतात आणि डॉ. विजय सुशांतच्या बाजूला येतात....
पक्या:- एवढी मोठी गद्दारी! ए डॉक्टर तुला तुझी बायको नकोय वाटतं! तुला माहित नसेल तर शेवटचं सांगतोय; याची बायको आमच्या तावडीत आहे ती सुखरूप हवी असेल तर गपगुमान निघ इथून.... यावर सुशांत हसतो आणि म्हणतो; "आधी दाखव तरी त्या आहेत कुठे?" पक्या त्या दुसऱ्या गुंडाला त्यांना आणायला सांगतो आणि तो गुंड आत गेला की लगेच सुशांत पक्या च्या पायावर गोळी मारतो!
सुशांत:- सर.... तिकडे आहेत मॅडम पटकन त्यांना घेऊन इथून पळा! असं बोलता बोलता दुसरा गुंड ज्या खोलीत आहे तिथल्या दाराला बाहेरून कडी लावतो.....
डॉ. विजय तिथून त्यांच्या पत्नी ला घेऊन पळतात.... बाहेरून कोणीतरी येत असतं हे ते पाहतात आणि लपत लपत जाऊन ते त्यांच्या पत्नी ला निंबाळकर आजी आजोबांच्या घरी ठेवतात.... आणि सुशांतला सावध करायला परत येत असतात.... पण, ते परत येई पर्यंत बराच वेळ गेलेला असतो!
तो जो कोणी माणूस आलेला असतो तो सुशांतच्या न कळत नियती जवळ जाऊन बेशुद्ध नियतीच्या गळ्याला सुरा लावतो आणि आम्हाला इथून जाऊदे! पाठलाग करायचा प्रयत्न केलास तर मेली ही तुझी हिरॉईन असं म्हणत दाराची कडी उघडून त्या दुसऱ्या गुंडाला घेऊन आणि सोबत नियतीला घेऊन निघत असतात.... सुशांत सुद्धा हातातली बंदूक खाली टाकून हात वर करून उभा असतो... जसे ते लोकं बाहेर पडतात प्रत्येकाला आपल्या डोक्यामागे काहीतरी आहे असं जाणवतं! मागे वळून पाहिल्यावर त्यांच्या लक्षात येतं; पोलीस आहेत! सुशांतने च पोलिसांना बोलावलेलं असतं! तो पटकन पुढे होतो आणि नियती ला त्यांच्या तावडीतून सोडवतो! एव्हाना नियतीला सुद्धा शुद्ध आलेली असते.... नियती जेव्हा त्या माणसांकडे बघते तेव्हा अचानक ओरडते; "देशमुख तुम्ही?"
डॉ. विजय:- काय? म्हणजे हेच का ते तुझे घरमालक?
नियती:- हो! मला वाटलं नव्हतं तुम्हीच या सगळ्यात इन्व्हॉल्व असाल!
पोलीस एकेकाच्या कानशिलात वाजून विचारतात हे का केलं....

देशमुखांनी हे का केलं असेल? त्यांच्या सोबत अजून कोण कोण सामील असेल कि नसेल? डॉ. विजय ना वेळोवेळी सुशांतने कश्या बातम्या पुरवल्या असतील? पाहूया पुढच्या भागात....

🎭 Series Post

View all