न अपेक्षा काही... न अपेक्षाभंगाचे दुःख
भाग-३अंतिम
त्यादिवशी सरस्वती कामालाच आली नाही. ती न सांगता सुट्ट्या घेत नव्हती. आजारी वगैरे पडली असेल म्हणून वीणाने दुर्लक्ष केले.
दुसऱ्या दिवशी आली तेव्हा सांगत होती," नवरा बीमार झाला त्याले सरकारी दवाखान्यात घेऊन गेलती."
दुसऱ्या दिवशी आली तेव्हा सांगत होती," नवरा बीमार झाला त्याले सरकारी दवाखान्यात घेऊन गेलती."
तिथं तपासलं सलाईन लावलं अन् त्यायच्याच ॲम्बुलन्सनं त्याले शहरात पाठवला. त्याची माय अन् शेजारचा एक माणूस गेला संगत.
मी कशी जाऊ इथं तं पोट हातावर. एक दिवस काम नाही केलं तर फाकेच पडायचे. मी बरी झोपेन उपाशी पण पोट्ट्यायचं काय?
म्हणून मी काय गेलो नाय.
"मर म्हणाव तिकडंच नाय तरी आहे तरी बी कोणतं सुख हाय म्हणून गेला तं दुख करू."
म्हणत ती कामाला लागली.
म्हणून मी काय गेलो नाय.
"मर म्हणाव तिकडंच नाय तरी आहे तरी बी कोणतं सुख हाय म्हणून गेला तं दुख करू."
म्हणत ती कामाला लागली.
तिला अपेक्षाच नव्हत्या त्याच्याकडून काय कुणाकडूनच.
म्हणून अपेक्षा भंगाचं दुःखही नव्हतं.
म्हणून अपेक्षा भंगाचं दुःखही नव्हतं.
रोज मार खाऊन यायची पण चेहऱ्यावर जराही दिसायचं नाही असं. आपली कामं हसत करायची.
वीणाने तिला रोजच्यासारखा नाश्ता दिला चहा दिला.
वीणाने तिला रोजच्यासारखा नाश्ता दिला चहा दिला.
ती रोज कामाला यायची. वीणा रोज तिच्या नवऱ्याची विचारपूस करायची. शहरातल्या सरकारी दवाखान्यात उपाय चालू होते. डॉक्टर म्हणाले होते," आठ दिवस लागतील."
चार दिवस गेले. सरस्वती सांगू लागली,
" काल रात्री दवाखान्यात धिंगाणा करून राहिला होता. बुढीले धाक दपटशा दाखवून तिच्या जवळून शंभर रुपये घेतले. तिले वाटलं दवाखान्यातून कुठी जाते दारू प्यायले. काढून दिले तिनं पैसे काहून की बाकीच्यायले तरास होऊन राहिला होता ना.
पैसे घेतले खिशांदी ठेवले अन् झोपला. झोपला कायचा नाटक केलं झोप्याचं. बुढी भी झोपली. त्यांनं पायलं बुढी झोपली तसा रात्रीतून गायब झाला.

कुठे पयाला काय मालूम.
सारा दवाखाना धुंडला पण सापडला नाय.
सारा दवाखाना धुंडला पण सापडला नाय.
झाकट होयेतो थांबले. पायटी बुढीनं नात्यायच्या लोकायले फोन लावले. सारे म्हणत इथंसा नाही आला. दिवे लागेतो वाट पाहिली. मंग पोलिसात रिपोर्ट दिला."
आता त्याही गोष्टीला पाच दिवस उलटून गेलेले. वीणाने सरस्वतीला विचारले," लागला का काही पत्ता?"
आता मात्र सरस्वती आतून खचली होती. "नाय ओ माय काल पंडित च्या घरी गेली होती. थ्याले विचारलं.तं म्हणे येईन वापस जीता का मेला ते नाही सांगू शकत."
आता मात्र सरस्वती आतून खचली होती. "नाय ओ माय काल पंडित च्या घरी गेली होती. थ्याले विचारलं.तं म्हणे येईन वापस जीता का मेला ते नाही सांगू शकत."
"असं काय ले करा लागत होतं बरं त्यांनं? आता जीव नाही लागून राहिला. कुठे असंल बरं ? कसा असंन ?आहे का गेला?तेच तेच विचार येऊन राहिले ना मनात."
वीणा विचारात पडली एवढा रोज मारतो झोडतो तरी त्याचीच काळजी.
हे मातृ हृदय आहे. तिच्या मनात शत्रू विषयीही वाईट भाव येणार नाहीत .हा तर नवराच.
आणि दुसरे घरात माणूस असला की कुणी वाकड्या नजरेने पहात नाही.आता दोन दोन पोरी कशा सांभाळू?हा विचार.
हे मातृ हृदय आहे. तिच्या मनात शत्रू विषयीही वाईट भाव येणार नाहीत .हा तर नवराच.
आणि दुसरे घरात माणूस असला की कुणी वाकड्या नजरेने पहात नाही.आता दोन दोन पोरी कशा सांभाळू?हा विचार.
वीणा स्वतःकडे बघत होती. एवढं सगळं सुख समोर वाढलं असताना आपण अपेक्षा करतो अन् दुःखी होतो.नवऱ्याने फक्त भाजीत मीठ कमी झाले म्हटले तर किती वाईट वाटते. त्याने नेहमी चांगलेच म्हणावे ही अपेक्षा.
सून नोकरीला जाते म्हणून काय झालं तिनेही लवकर उठून एखादं काम करावं आल्यावर एखादं काम करावं.मग अपेक्षा भंगाचे दुःख.
आता तिनेही ठरवलेलं कुणाकडून अपेक्षाच करायची नाही. आपल्याकडून होते तेवढं करायचं.
सून नोकरीला जाते म्हणून काय झालं तिनेही लवकर उठून एखादं काम करावं आल्यावर एखादं काम करावं.मग अपेक्षा भंगाचे दुःख.
आता तिनेही ठरवलेलं कुणाकडून अपेक्षाच करायची नाही. आपल्याकडून होते तेवढं करायचं.
तेवढ्यात सरस्वती आली वीणाने तिलाही नास्त्याची प्लेट दिली आणि स्वतःची घेतली.
तिने परत सरस्वतीला विचारले, "लागला का काही पत्ता?"
सरस्वती अगदी सहज उत्तरली, "नाही व माय. आपुण तर विचार सोडला वं बाई. जो तो आपल्या मताने करते. आपणच कुठपावतर कायजी करा.आपल्याले तं घर चालवा लागते.कुठी डोक्यात राख घाला."
समाप्त
©®शरयू महाजन

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा