न अपेक्षा काही ...न अपेक्षाभंगाचे दुःख
भाग -२
भाग -२
आज एवढ्या बरोबरीच्या दोन दोन पोरी पण त्याही तिला समजून घेत नव्हत्या.पण तक्रार नव्हती तिची.आपलं नशिब म्हणत विचार वाऱ्यावर सोडून द्यायची.
नवरा आणि सासू तर खूप दूरची गोष्ट.
त्यामुळे सरस्वती स्वतःच स्वतःला अडाणी म्हणून घ्यायची. कारण तिची मुलगी, सरस्वतीच्या शब्दात सांगायचे तर ,"बारावीच्या पुढे दोन वर्ग शिकेल आहे."
ती सतत आईला म्हणायची," तू थांब मध्ये बोलू नकोस तुला कळत नाही तू अडाणी आहेस."
सारखा सारखा पाण्याचा थेंब पडून दगडावरही खड्डा पडतो. हा तर हाडामासाचा गोळा.
सरस्वतीला वाटायचं आपल्याला काही कळतच नाही.

सासु तर, पोरगं दारू पिऊन येतो घरातलं सगळं विकटीक करतो म्हणून तिने आपला संसार वेगळा थाटलेला.
नवरा रोज दारू पिऊन येणार, घरात धिंगाणा घालणार, बायकोला मारझोड करणार, तिचे शरीर ओरबाडून घेणार. हा जणू त्याचा जन्मसिद्ध हक्कच. लग्न केले ना तिच्याशी मग तिच्यावर त्याचा हक्कच.
बिचारी अगतिक. कुणाचाच आधार नाही सहन करायची सगळं पण तोंड मात्र कुठेच उघडता येत नव्हतं.

सासरी तर बरंच बरं माहेरी त्याहून बरं .
आगीतून निघाली आणि फुफाट्यात पडली अशी गत होती तिची.
ती दोन वर्षाची होती तेव्हा बाप मरून गेला. एक दिवस खेळता खेळता चुलीपाशी आली. आई चुलीवर भाजी फोडणी घालत होती त्यात पाण्याचा थेंब पडला ते तेल तडतड उडालं ते हिच्या चेहऱ्यावर.
चेहरा विद्रूप करून गेलं. चेहऱ्यावर काळे काळे डाग नेहमीसाठीच ठेवून गेलं.
तिची आजी समजूतदार होती.तिने पाहिलं या एवढ्याशा जीवाला आपण कसेही मोठे करू. पण ही बरोबरीची सून घरात कशी वागवायची? पैशाची जोखीम पुरली पण तरण्या ताठ्या पोरीची नको.

तिने एक दुसरपणाचे स्थळ शोधून सुनेचे लग्न लावून दिले. ही विद्रूप पोरगी स्वीकारायला तो तयार नव्हता म्हणून आजीनेच दोन वर्षाची असतांना पासून सरस्वतीचा सांभाळ केला.
तिच्या आईचा नवीन नवरा हिचे तोंडही पाहायला तयार नाही आईलाही तिला भेटायला येऊ द्यायला तयार नाही.
भिती पोटी आजी तिला घराबाहेर जाऊ द्यायची नाही. आपल्या लेकाची ठेव त्याने आपल्या सुपूर्द केली म्हणून ती जीवापाड जपायची तिला. घरात कुणी पुरुष नाही इतरांच्या वाईट नजरा तिच्यावर पडू नयेत म्हणून ती तिला शाळेत पण पाठवायची नाही. त्यामुळे ती शिक्षणापासून वंचित राहिली.
आजीने तिला काहीही कमी पडू दिले नाही. पण ती अशिक्षित असल्यामुळे लग्नासाठी लवकर मुलगा मिळत नव्हता. अखेर असंच एक गरीबाचे स्थळ सांगून आले. आजीने सरस्वतीचे लग्न उरकून टाकले.

प्रत्येक ठिकाणी तिचा अशिक्षितपणा आडवा येत होता. सासू त्याचेच भांडवल करायची आणि तिला घालून पाडून बोलायची. त्रास द्यायची. नवरा तर नुसताच दारूच्या पेल्यात बुडालेला.
पोटाचा खड्डा तर बुजवावाच लागतो. तो तर दारू पिऊन घरात लोळत पडला राहायचा. सरस्वतीलाच मारझोड करायचा. पैसे मागायचा.
शेवटी ती चार घरी भांडी धुणी करायची. घर चालवायची.

अशातच एक दिवस ही घटना घडली.
क्रमशः
बाकी पुढील भागात
भाग -२ मध्ये
©®शरयू महाजन
क्रमशः
बाकी पुढील भागात
भाग -२ मध्ये
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा