जलद लेखन कथा स्पर्धा माहे ऑगस्ट 2025
विषय - अपेक्षांचे ओझे
न अपेक्षा काही...न अपेक्षाभंगाचे दुःख
भाग-१
भाग-१
"नाय ओ माय, तीन दिस झाले गमून नाही राहिलं .आखीर कसा बी असू दे कुकवाचा धनी तो.त्याच्याबिगर हे पांढरं कपाय ..." सरसोतीचा भावूक स्वर.
"काय जेवली ग आज सरसोती?"विणा विचारत होती तिच्या कामवालीला तेव्हा तिने दिलेले उत्तर.
"काय जेवली ग आज सरसोती?"विणा विचारत होती तिच्या कामवालीला तेव्हा तिने दिलेले उत्तर.
"एरवी तर रोज त्याच्या नावाने शिमगा करते आज काय पुळका आला एकदम" वीणाने तिच्या मर्मावर बोट ठेवले.
"तो हाय तं लांडग्याच्या नजरा तरी दबून आहेत. तुम्हाले सांगतो चार दिस झाले तो आला नाही त लगेच माह्य तं सोडा पोट्ट्यायच्या मागे मागे फिरून राह्यले .कठीण करतत जिंदगानी.भिती वाटते व माय."
तिने वास्तव बोलून दाखवले.
तिने वास्तव बोलून दाखवले.
'नाव सरस्वती हाती अज्ञानाची पाटी'
अशी अवस्था तिची . स्वतःच नाव सुद्धा ती सरसोती सांगते.शाळेचं तोंडच कधी पाहिलं नाही.
अशी अवस्था तिची . स्वतःच नाव सुद्धा ती सरसोती सांगते.शाळेचं तोंडच कधी पाहिलं नाही.
वीणा आजवर तिला अज्ञानी, बुद्धु ,अडाणी समजत होती. पुस्तकाचं एक पान कधी पलटवून न पाहिलेली सरसोती. तिला पुस्तकी ज्ञान नसेल पण व्यवहार ज्ञानात तरबेज होती.ती खऱ्या अर्थाने जीवनाचं तत्त्वज्ञान आज वीणाला शिकवून गेली.
जे वीणाला शाळेच्या कोणत्याच पुस्तकातून मिळालं नव्हतं.
जे वीणाला शाळेच्या कोणत्याच पुस्तकातून मिळालं नव्हतं.
तिचं बोलणं सरस्वतीच्या हातातील वीणा झंकृत करून गेलं.
स्वाती विणाची सून तिला नेहमी म्हणायची ,"आई, सरस्वतीला तुम्ही साधी समजू नका. ती दिसते तशी. ती डोक्यावर बसेल तुमच्या. मी रोज घरी राहत नाही. शेवटी तुम्हालाच सगळं सांभाळून घ्यावे लागते. तुम्ही तिचे लाड पुरवाल तर ती रोज तसंच पाहिल. आज तुम्ही आपण होऊन देता उद्या ती तुम्हाला ऑर्डर सोडेल मला चहा द्या, मला नास्ता द्या. माझा तिला काही देण्याला विरोध नाही आहे पण तुम्ही रोज रोज द्याल तर तुम्हाला त्रास होईल म्हणून म्हणतेय."
"हो ग बाई कळते मला पण वळत नाही काय करू."वीणा रोज ठरवायची आज नाही देणार नाश्ता सरस्वतीला. पण तिला पाहिले, तिची अगतिकता पाहिली की वीणाच्या पोटात कालवाकालव व्हायची. तिच्या हातातला घास हातातच राहायचा. तिच्या संसाराची चित्तरकथा ऐकली की विणा साखर पाण्यात विरघळावी तशी विरघळून जायची. आणि मनाशीच म्हणायची," जाऊदे आजच्या दिवस देऊन देते."
हे रोजचेच झाले होते वीणा मनाशी विचार करायची ,"काय ऋणानुबंध असेल तिचा माझा पूर्वजन्मीचा माहित नाही. का तिला पाहिले की माझे मन द्रवते?"
कधी ती निश्चयपूर्वक ठरवायची नाही बनवायचा नाश्ता तिच्यासाठी. पण स्वतःची नाश्त्याची प्लेट हातात घेतली की तिला अपराध्यासारखेच वाटायचे आणि परत ती आपल्या घासातले दोन घास तिच्यासाठी काढून ठेवायची.
कधी ती निश्चयपूर्वक ठरवायची नाही बनवायचा नाश्ता तिच्यासाठी. पण स्वतःची नाश्त्याची प्लेट हातात घेतली की तिला अपराध्यासारखेच वाटायचे आणि परत ती आपल्या घासातले दोन घास तिच्यासाठी काढून ठेवायची.
खरे तर सरस्वती त्या नाश्त्याची किंवा चहाची भुकेली नव्हतीच. तिला बोलायला, तिला समजून घ्यायला कुणीतरी तिला हवे असायचे. तिची व्यथा ऐकून घेणारं समजून घेणारं कोणीतरी तिला हवं असायचं .तीच भूक होती तिची. प्रेमाची...वंचितांचे दुःख. आतल्या आत कोंडमारा होत होता तिचा.
ती भूक वीणाकडे पूर्ण होत होती तिची. तिला अपेक्षा नसायचीच आपलं कोणी ऐकावं. ती फक्त बोलत राहायची.वीणा समजून घ्यायची म्हणून सरस्वती तिच्याकडे अगदी आपलेपणाने ,आपलं समजून मन मोकळं करत राहायची. बाकी घरी खाली मान घालून काम करणारी सरस्वती वीणाकडेच मुखरीत व्हायची.
क्रमशः
पुढील भाग -२मधे
©®शरयू महाजन
क्रमशः
पुढील भाग -२मधे
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा