नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलिकडे भाग १७

ITs about pure love

संकेतचे डोळे पाणावले,कारण जे पाहिले होते त्याने त्याचा आनंद गगनात मावत न्हवता....आंनदाचे अश्रू होते ते..आज खूप आनंद झाला होता ...कारण जे पाहिले होते त्यांने आज सिद्ध झाले होते त्याचं प्रेम एकतर्फी नसून स्वराकडून आहे....कसं कळलं त्याला ????

ज्या ठिकाणी दोघे नेहमी बसायचे.. सुंदर क्षण घालवायचे त्याठिकाणी त्याने त्याच्या अक्षरात "SANKET LOVE SWARA" लिहिले होते,कॉलेजच्या शेवटच्या दिवशी,ते ही  स्वराला माहीत पडू न देता...कारण तो घाबरत होता...तिने जर नाही बोलले तर??प्रेमही जाईल आणि मैत्री  . आणि एकदा मैत्री मध्ये प्रेम आलं की निखळ मैत्री कुठेतरी हरवते असं त्याला वाटत होतं..म्हणून चोरुनच त्याने तिच्यावर असलेल प्रेम व्यक्त केलं होतं.आज त्याच्या बाजूलाच स्वराने "SWARA ALSO LOVE SANKET" असे लिहिले होते..संकेतला पूर्ण खात्री झाली की ते स्वरानेच लिहिले आहे....तो स्वराच अक्षर ओळखायचा....

मी स्वरावर आणि स्वरा माझ्यावर प्रेम करते .... एकमेकांशी संवाद न साधता त्या दोघांनी जणू प्रेम कबूल  केलं होतं....खरं तर त्याच दिवशी झालं असतं प्रेम व्यक्त पण स्वराचा अपघात झाला होता....त्याच हृदय जोरजोरात धडधड करू लागले.. त्यालाही तेच हवं होतं... किती आतुर झाला होता तो स्वराच्या मनात प्रेम आहे का मैत्री हे जाणून घेण्यासाठी....आज सिद्ध झाले होते..त्याला त्याच्या वडिलांच वाक्य आठवलं खरंच संयम हवा..काही गोष्टी मिळवण्यासाठी संयम ठेवावाच लागतो..... किती दिवसाने त्याला हलकं हलकं वाटलं... किती दडपण आलं होतं.. नाराजच झाला होता पण आज स्वरानेसुद्धा जणू प्रेमाची कबुली दिली , पुन्हा त्याच्यात ऊर्जा संचारली ....त्याला आशा वाटू लागली ..नक्कीच स्वरा त्याच्या आयुष्यात येईल...इतक्या दिवस नकारात्मकतेणे खचलेला संकेत सकारात्मकतेच्या आशेच्या किरणामुळे पुन्हा शक्तीनिशी उभा राहिला.....आपलं खरं प्रेम काहीही करून मिळवायच त्याने मनाशी ठाम निर्धार केला....

त्याने स्वराच्या लिहिलेल्या अक्षरावर अलगद हात ठेवला,त्याला स्वरा जवळ उभी असल्याचा पुन्हा भास झाला... त्याने त्याचा फोटो मोबाईल मध्ये काढला..आणि एकाएकी चक्क डान्स करू लागला..सर्वच त्याला पाहू लागले, हसू लागले ..आज प्रेमामुळे बेभान झाला होता..त्याला कोणी वेडं म्हंटल तरी त्याची पर्वा न्हवती.... बस आज त्याच्या आयुष्यातला खास क्षण होता ...मनमुरादपणे नाचत होता..त्याला खूप बरं वाटलं..रंगीबेरंगी आयुष्य जणू खुणावत होतं त्याला.अक्षरशः झाडाला पकडून लोंबकळु लागला...इथून तिथून उड्या मारू लागला.. खरंच वेडवला तो ..

तसही ते प्रेमाचं अल्लड वय असे असते की ,प्रेमात पडल्यावर माणूस खूप बदलतो.. ज्या गोष्टी आयुष्यात केल्या नाही,किंवा करण्याचा विचार केला नाही त्या तो करून जातो.... तसंच संकेतच झालं होतं.. त्याच्या वहीच्या पाठी सुद्धा स्वराच नाव...मोबाईल मध्येही त्याने स्वराचं  नाव My pure  love म्हणूनच save केलं होतं... खरंच फिल्मी झाला होता संकेत त्यादिवशी...

त्याने  पटकन  हातात फोन घेतला... स्वराला फोन लावणार तोच त्याने फोन बाजूला ठेवला.. कारण तिने  आधीच सांगून ठेवलं होतं मला फोन नको करत जाऊ ,माझ्या बाबांना नाही आवडत मी मुलांशी बोललेलं... त्याला बोलायचं होतं......खूप बोलायचं होतं....त्याने मेसेज केला...."स्वरा कशी आहेस???

वाट पाहू लागला तिच्या reply ची .....ताटकळत पाहत बसला मोबाईल.... पापण्यासुद्धा खाली पडत न्हवत्या त्याच्या..दोन तास फोन घेऊन बसला समोर पण नाही आला काही reply...... पुन्हा  त्याने मेसेज पाठवला वाट पाहू लागला...


तोच स्वराचा रिप्लाय आला...
स्वराचा मेसेज पहिला आणि त्याचे डोळे तृप्त झाले...वेड्यासारखा हसायला लागला आणि रडायला लागला ,कारण तिच्याशी खूप दिवस झाले त्याला बोलताच  नाही आले.....त्याने स्वतःचे डोळे पुसले... आणि स्वराचा  मेसेज वाचला ...

 स्वरा:  "मी बरी आहे, उद्या रात्री डिस्चार्ज देतील,तू कसा आहे???

संकेत: मी छान आहे, स्वरा मला बोलायचं आहे तुझ्याशी काही तरी

स्वरा: संकेत थांब , आता नको काही बोलू ,अरे माझे बाबा आले.. चल bye........

स्वराने तिच्या बाबांना घाबरून पुन्हा काहीच मेसेज केला नाही.....

आजही संकेतला जे प्रेम  व्यक्त कारायचे होते ते राहून गेले..तरीही त्याला स्वराशी बोलल्याचा आनंद झालाच होता.... सतत तोच मेसेज वाचत होता ..स्वतःला रमवत होता.. स्वराने  त्याची विचारपूस केली त्याला खूप बरं वाटलं आज .....गालातल्या गालात हसला ..आणि पुन्हा एकदा  जुन्या  आठवणीत रमला  तो ...जुन्या आठवणी त्याला तृप्त करू लागल्या.... त्याच्या चेहऱ्यावर तेज आले..... समोर त्याला उजेड दिसत होता प्रेमाचा ....काही तरी नक्की चांगला होणार. स्वरा माझ्या आयुष्यात नक्की येणार.. कधी न्हवे तो नशिबावर विश्वास ठेऊ लागला..  आणि त्याने घराचा  रस्ता पकडला ...

कसं करणार होता   प्रेम व्यक्त??
कसा मागणार होता लग्नासाठी स्वराचा हात???इथे तर तिच्या बाबांना  परक्या मुलांशी बोललेही आवडत न्हवते, मग स्वराच प्रेम मान्य करतील.. लग्नाला तयार होतील??
पाहू पुढच्या भागात.....

आश्विनी पाखरे ओगले..
लेख आवडल्यास, लाईक, कंमेंट आणि नावासहित  शेअर करा
मला नक्की फॉलो करा..

🎭 Series Post

View all