Login

नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलिकडे भाग १८

Its about Pure love

संकेत घरी गेला.बहीण अभ्यास करत बसली होती ,त्याला बघून तिने न बघितल्या सारखे केले...बहिणीवर  त्याने त्या दिवशी रागाच्या भरात तिच्यावर हात उचलला होता...तेव्हा तो भरपूर दुःखी होता.... म्हणून त्याला काही सुचलं नाही ,त्याच्या बहिणीला फार वाईट वाटलं होतं.. पण आता संकेतला जाणीव झाली होती ,की आपण स्वतःच दुःख लपवण्यासाठी भावनांवरून ताबा सोडला होता.असंच होतं ना कधी कधी आपलं कधी कधी रागात, दुःखात असल्यावर आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला दुखावतो,तेव्हाच नात्यांमध्ये पोकळी निर्माण होतं ,चूक कबूल केली तर ठीक नाही तर चांगले चांगले रक्ताचे संबंध सुद्धा सहज तुटतात हे सत्य आहे.....पश्चाताप झाला होता संकेतला स्वतःच्या अविचारी वागण्याचा ,जो व्यवहार त्याने केला होता सतत आठवून आठवून रडत होता...

ती नाराजच होती... तिने त्याला पाहिले आणि पुन्हा अभ्यास करत बसली..संकेतला माहीत होतं..त्याला अपेक्षित होते.. बहिणीच्या नाकावरचा राग काही सहजा सहजी नाही जाणार म्हणून त्याने येतानाच तिला मनवायसाठी मोठा चॉकलेटचा डबा आणला होता तिला आवडतो तो आणि छानसा ड्रेस .....   

त्याने तिला आवाज दिला पण तिने न ऐकल्यासारखे केले....मग जाऊन तिच्या समोर उभा राहिला आणि तिच्यासाठी आणलेले चॉकलेट आणि ड्रेस तिच्या पुढ्यात ठेवले आणि कान पकडून सॉरी बोलला.....

ते पाहून तिच्या बहिणीला भरून आले ,तिने संकेतला घट्ट मिठी मारली..दोघे बहीण भाऊ रडायला लागले.... किती सुंदर नातं असते ना,बहीण भावाचे..एकमेकांविषयी किती काळजी असते... बहिणीची माया दिसून येते,भावाचं प्रेम तो बोलून नाही व्यक्त करत पण त्यालाही बहीण प्रिय असते......

तोच त्याच्या बहिणीने ,त्यांच्यासाठीही काही तरी आणलं होतं.... तिने कपाटातून काही तरी बॉक्स काढला आणि त्याच्या हातात दिला ....सोन्याची वस्तू होती.. संकेतने उघडून पाहिलं तर तिने त्याच्यासाठी येणाऱ्या रक्षाबंधन साठी सोन्याची राखी बनवली होती....संकेतला ती राखी पाहून डोळे भरून आले......किती जीव आहे बहिणीचा.... त्याने तिला विचारलं असता एवढे पैसे कुठून आले तर तिने दोन वर्षांपासून स्वतःचे पॉकेटमनी साठी दिलेले पैसे साठवले होते ,त्याच पैशाची राखी घेतली होती तिने सोन्यासारख्या भावाला.....
संकेत  बहिणीचे प्रेम पाहून  भारवून गेला होता.. किती जीव लावते आपल्याला, आपला किती विचार करते आणि आपण तिच्यावर,तिची काही चूक नसताना अश्या पद्धतीने तिच्याशी वागलो, ह्याचा पश्चाताप झाला....


असेच असतात काही क्षण..त्यक्षणात जाणीव होते ..आपल्यावर कोण किती प्रेम करत हे कळून येते..आणि जी व्यक्ती आपल्यावर खरं प्रेम करते,तिला आपण दुखावलं तरी ती तीच प्रेम करणं सोडत नाही.. आणि बहीण भाऊ असे सुंदर नातं असते जे आपल्या जीवनात नेहमी मायेचे, प्रेमाचे,आपुलकीचे, काळजीचे सुंदर रंग भरतात....आई वडिलांनंतर सर्वात जवळ ,आपलं म्हणणारे तेच तर असतात...फक्त ते नात जपलं गेलं पाहिजे, कोणी काहीही बोलले तरी आपल्या बहीण भावावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे.....कानात गेलेलं विष अनेक भक्कम नाती तोडून टाकतात...

आज संकेतला फार छान वाटलं..किचनमध्ये गेला.. आई जेवण बनवत होती त्याने आईचा हात पकडून तिला बाहेर आणले, आणि आजच जेवन मास्टर संकेत बनवणार असल्याचे सांगितले... तो  you tube वर पाहून मस्त पिज्जा बनवू लागला तोच त्याचे वडील आले.. पाहतात तर काय संकेत किचनमध्ये ...मग संकेत आणि त्याच्या वडिलांनी दोघांनी मिळून पिज्जा मिशन पूर्ण केले......

थोड्या वेळातच पिज्जा डायनींग टेबलवर आणला ,आज त्याचा स्वाद वाढला होता...  आईचा जीव भांड्यात पडला होता...हरवलेला  संकेत आज पुन्हा सापडला होता..निराश झालेला संकेत आशावादी झाला होता..केवळ आणि केवळ त्याच्या वडिलांनी त्याला प्रोत्साहन दिल्यामुळे....

आईच्या डोक्यावरच ओझं नाहीसे झालं होतं...तिला भीती वाटत होती ,की संकेत प्रेमासाठी स्वतःच्या जिवाचं काही बरं वाईट करून घेईल... ती सुद्धा चिंतीत होती...पण आता ती भीती नाहीशी झाली होती... 


प्रत्येक आईला तेच हवं असते ना,आपल्या मुलाचे सुखी समृद्ध आयुष्य....तसही आईवडिल आपल्या मुलांसाठी नेहमी काळजी करतातच ...मुलांच्या केसाला जरी धक्का लागला तरी हवालदिल होतात.... मुलांचं सुद्धा कर्तव्य आहे,की आई वडिलांची सुद्धा काळजी करणे.. त्यांना त्रास होणार नाही असे वागणे.... आता संकेत रुळावर तर आला होता...पण आता त्याने स्वराविषयीच प्रेम  स्वतःहुन मोकळ्या मनाने व्यक्त करावे...स्वतःहुन तो व्यक्त होणार नाही ,हे त्यांना माहीत होतं..त्याची भावना त्यांना कळत होती... कारण ते सुदधा त्या वयातून गेले होते.. ते दडपण त्यांना माहीत होतं... त्यासाठी आता वडीलांनी डोक्यात मस्त प्लॅन आखला होता....


तसे संकेतचे वडील फार हुशार माणूस ....मन कसं वळवायचं हे त्यांना छानच जमायचं...


पुढच्या भागात पाहूया, कसे संकेतचे वडील त्याचं मनातलं प्रेम ओठावर आणतात.... 

नक्की मला फॉलो करा....

अश्विनी पाखरे ओगले..
लेख आवडल्यास लाईक, कंमेंट आणि नावासहितच शेअर करा...