संकेतच्या घरामध्ये वातावरण नॉर्मल झाले होते.. कुठे तरी आशा होती त्याला काही तरी मार्ग निघेल.... आता त्याच्या वडिलांनी ठरवलेच होते, संकेतच्या ओठांवर स्वराच प्रेम आणायचे...
सकाळी मॉर्निंग walk ला दोघे गेले वडिलांनी त्याच्यासमोर विषय काढला......
वडील:"संकेत बेटा, तुला काही सांगायचे आहे"
संकेत :काय बाबा काय सांगायचे आहे???
वडील:खरं तर ,आता तू छान सेटल झाला आहेस... शिक्षण झाले आहे ..छान नोकरी लागली आहे.. .तर आता लग्नाचं पाहूया म्हणतोय तुझं.....
संकेत: बाबा ,माझ्या लग्नाचं???एवढी काय घाई...??नको नको आता नको...
वडील: का रे काही प्रॉब्लेम आहे का??
संकेत: तसं काही नाही ,पण इतक्यात नकोच लग्न..मी आत्ताशी कामाला लागलो आहे...खूप काही करायचे आहे....
वडील:संकेत ,अरे बाळा लगेच कुठे लावायला म्हणतोय लग्न.... मुलगी बघायला तरी सुरू करूयात... जमे पर्यन्त एक दोन वर्षे जातीलच की ..
संकेत: नको ,बाबा please नको,मुलगी वगैरे बघायला ....
वडील: अच्छा आता समजली गडबड....म्हणजे माझ्या मुलाने ,आधीच मुलगी पसंत केली आहे.......
(संकेत हसला गालातल्या गालात,मान खाली घातली )
संकेत: actully ...
वडील : काय,दोस्ता तू तर मला सांगितलं नाहीस... माझ्यापासून लपवलस????तू नाराज केलं मला....
संकेत: बाबा तसं नाही,actully मला आवडते ती,.खरं तर तिला मी प्रपोस करणार होतो पण ,त्याच दिवशी तिचा अपघात झाला.....आणि राहिलं प्रपोस करायचं.....
वडील: अच्छा ,त्यादिवशी जीचा अपघात झाला होता ती माझी सून होती ,म्हणून तू तिच्या रक्ताने माखलेलं शर्ट न धुताच मस्त कपाटात जपून ठेवले होते...
(संकेत आश्चर्यचकित झाला, हसू लागला ...)
संकेत: तुम्हाला कसं कळलं????.....
वडील: मला तुमच्या मातोश्रीने सांगीतले,त्याविषयी.संकेत खंर प्रेम लपून राहत नाही रे बाळा,मी सुद्धा तुझ्या आईच्या अनेक आठवणी आजपर्यंत जपून ठेवल्या आहेत
..ह्या बाबतीत माझ्या पाउलावर पाऊल ठेवलस तू..हो आणि मला विश्वास आहे तू नक्कीच छान जोडीदार निवडला असशील.....बरं नाव काय माझ्या सुनेचं???
संकेत: स्वरा नाव आहे तिचं...
वडील: व्हा ,माझ्या संकेतची स्वरा.....भारीच की नावही शोभतयं तुला...... मग काय म्हणते आमची सुनबाई..??कशी आहे आता??बरी आहे ना???
संकेत : आहे बरी, पण
वडील: पण,काय????
संकेत: तिचे वडील नाही बोलू देत तिच्याशी.....
वडील: का,पण .??
संकेत: तिच्या वडिलांना नाही आवडत मुलांशी बोललेलं....
वडील:हो का???
संकेत: हो ना...त्यामुळे मी तिला फोन सुद्धा नाही करू शकत..
वडील: बरं, आलं माझ्या लक्षात...मग आता काय करायचं ठरवलं आहेस????
संकेत: त्याच विचारात आहे मी,म्हणून जरा डिप्रेस झालो होतो....काय करू समजत नाही....
वडील: बरं,मग रीतसर मागणी घालूया का????मी बोलतो तिच्या वडिलांशी .....
संकेत: नको नको...
वडील: का नको???
संकेत : भीती वाटते मला...नाही बोलले तर??
वडील: मग तू काय मनाने पळून जाऊन लग्न करणार??
संकेत: नाही बाबा ,असे मी काही करणार नाही..आणि मी जरी तिला बोललो तरी ती तिच्या आई बाबांचा खूप विचार करते.... चक्क ती नको असलेल्या लग्नाला तयार झाली होती...पण मोडले ते ...
वडील: खरंच...... स्वरा फारच गुणी मुलगी आहे ,आई वडिलांची तिला काळजी आहे....आता मला खात्री पटली माझी सून आपलं घर खूप छान पद्धतीने बांधून ठेवेल.. मलाही अशीच मुलगी हवी होती,जी नात्यांना महत्व देत असेल.....आता तर स्वराच माझी सून होणारं....
संकेत: पण बाबा कसं शक्य आहे????
वडील: मनात प्रचंड इच्छाशक्ती असली की अशक्यही शक्य होऊन जाते बाळा..विश्वास ठेवं...तुझं खरं प्रेम आहे ना स्वरावर???
संकेत: हो..
वडील: मग तर झालं..नो टेंशन... आपण उद्याच्या उद्या जाऊन स्वराच्या वडिलांशी ह्या विषयावर बोलूया.....
संकेत:खरं बाबा?? ...उद्याच?
वडील : हो,उद्याच्या उद्या......
संकेतसाठी खूप सुंदर स्वप्न होते.... माहीत न्हवते काय होणार...स्वराचे बाबा तयार होतील??काय प्रतिक्रिया देतील ते???पाहू पुढच्या भागात...
अश्विनी पाखरे ओगले..
लेख आवडल्यास लाईक,कंमेंट आणि नावासहित शेअर करा..
मला नक्की फॉलो करा...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा