Login

नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलिकडे भाग २२

Its about true love

स्वराच्या बाबांना कसं सांगायचं हा एक मोठा प्रश्न होता.. पण आता सांगावे लागणारच होते,त्याशिवाय पर्याय न्हवता......

स्वराचे बाबा आल्यापासून सतत फोनवर कोनाशी तरी बोलत होते..फोन आला की,अजून चिडचिड करत होते.. कोणाचा फोन होता माहीत नाही.फोन आला की सरळ बाहेर निघून जायचे,हल्ली प्रॉपर्टी वैगेरे ह्याबाबत चर्चा करत होते फोनवर.. नीट कळत न्हवते.. नक्की कोणाशी बोलत आहे..स्वराच्या वडिलांची संपत्ती बऱ्यापैकी होती,गावी शेती, बंगला सर्व काही..मग नक्की काय चालू आहे हे काही कळेनासे झाले होते....


स्वराच्या आईने आज ठरवलं होतं की स्वराच्या लग्नाचं बोलावं....स्वराचे बाबा पेपर वाचत बसले होते स्वराची आई येताच त्यांनी भारदास्त आवाजात विचारले काय काम आहे????काय बोलायचं आहे बोल आणि निघ.....

आई:स्वराच्या लग्नाविषयी बोलायचं आहे.....

बाबा: तिच्या लग्नाचं मी बघेल ,बाप आहे तिचा मी ,तू नाही बोलायचं काही...

आई: अहो, पण.....ऐका तरी..

मध्येच स्वराच्या आईचं बोलणं कापलं आणि बोलले...

एकदा सांगितले ना ??मी बाप आहे तिचा पुढे बोलायचं नाही तू ..निघ आता .........

हे ऐकताच स्वराच्या आईला काही सुचलं नाही..स्वरासुद्धा लपून ऐकत होती बोलणं, पण काय तिचे वडील ह्यांना काही एकूणच न्हवते घ्यायचे...ते बोलतील तेच करायचे.. 
स्वराला रडूच येऊ लागले...

स्वराच्या आईला माहीतच होतं ,की तिचे बाबा काही ऐकून घेणार नाही...
तिने संकेतच्या आईला फोन लावला..आणि  संगीतले..स्वराचे बाबा काही माझं ऐकत नाही..तुम्ही उद्या या....कदाचित तुमचं ऐकतील..
संकेतचे आई वडील आणि संकेतही दुसऱ्या दिवशी तिच्या बाबाशी बोलायला आले.....

स्वराचे बाबा फोनवरच होते कोणाशी तरी बोलत.. संकेत आला आणि त्याच्या पाठोपाठ त्याचे आई बाबा..

संकेतला त्यांनी प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.. त्यांनी त्याला ओळखलं... त्याच पाठोपाठ त्याचे आई बाबा आले...
स्वराच्या वडिलांनी फोन ठेवला...

स्वराचे वडील:तू तोच ना ज्याने  स्वराला दवाखान्यात आणले होते????


संकेत: हो काका,तो मीच,आणि हे माझे आई वडील....

स्वराचे  वडील:काय काम आहे..कशासाठी आला आहेस????

तोच स्वराची आई किचनमधून बाहेर आली आणि तिने त्या लोकांना बसायला सांगितले..  स्वराच्या वडिलांनी तिला रागातच पाहिले ,ती पुन्हा आता निघून गेली..

एव्हाना संकेतच्या आई वडिलांना ,स्वराच्या वडिलांची वागण्याची पद्धत कळली होती..

संकेतच्या वडिलांनी विषय काढला... मी संकेतचा वडील...
खरं तर आज मी तुमच्या मुलीचा हात माझ्या मुलासाठी मागायला आलो आहे.....

हे ऐकताच स्वराचे वडील भडकले..
काय ???कोण कुठले तुम्ही ..ओळखीच्या ना पाळखीचे आणि सरळ सरळ माझ्या मुलीला लग्नाची मागणी  घालण्यासाठी आले..काही लाज बीज आहे की नाही तुम्हा लोकांना......

संकेतचे वडील: अहो भाउ जरा शांत व्हा ...आम्ही चांगल्या घरातले आहोत... माझ्या मुलाला तुमची मुलगी पसंत आहे.म्हणून आम्ही फार आशेने आलो आहोत..

स्वराच्या वडिलांनी स्वराला आवाज दिला....

स्वराचे वडील: काय ग पोरे ??काय बोलत आहेत हे ..खरं आहे का????

स्वरा घाबरली.. वडिलांचा पारा चढला .ती त त प प करू लागली...

तोच संकेत बोलला नाही काका मला आवडते स्वरा, तिला नाही माहीत काही ....

तोच स्वराचे वडील बोलले तू तोंड बंद ठेव..तुमच्यासारखी मुलं आमच्या पोरींना नादाला लावता... कॉलेजमध्ये तिला मी प्रेम करायला नाही पाठवलं .अभ्यास करायला पाठवलं होतं.... आणि वरून तुझे आई वडील खुशाल आले आहेत..बरच स्वातंत्र्य दिलं आहे तुला दिसतय.

संकेतच्या   वडिलांना बघून ते बोलले ..
तुम्ही तुमच्या पोराला समज द्यायची सोडून इथे मागणी घालायला आला आहात..तुम्हीच लाडावलं आहे पोराला.. म्हणून इथं पर्यन्त मजल गेली....मला तुम्ही आणि तुमचा मुलगा पसंत नाही...माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाशी अशक्य......त्यामुळे निघा तुम्ही आता ..कृपा करून पुन्हा नका येऊ दारात......

संकेतचे वडील: थोडं शांत डोक्याने विचार करा..तुम्ही असा निर्णय नका घेऊ.आम्ही तुमच्या मुलीला राणीसारखी ठवू ....बघा विचार करा....


स्वराची आई  समजावण्याचा सुरात तिच्या बाबांना बोलू लागली.अहो विचार करा..संकेत चांगला मुलगा आहे.आपली मुलगी खुश राहील...

स्वराची आई मध्ये बोलली  ह्याचा राग तिच्या बाबांना आला ..तीला बोलले तू तोंड बंद ठेव आता एकही शब्द बोलू नको,नाहीतर माझ्या इतकं कोणी वाईट नाही

संकेतचे वडील बोलले अहो भाउ ही काय पद्धत झाली ताईंशी असे बोलायची???

स्वराचे बाबा:  माझ्या घरी येऊन ,मला नका शिकवू पद्धत.. स्वतःच्या मुलाला संस्कार दिले असते तर असे दुसऱ्यांच्या  मुलीवर डोळा नसता ठेवला...

संकेतचे बाबा: माझ्या मुलाला उत्तम संस्कार दिले आहेत..आणि स्वरावर खरं प्रेम करतो तो..म्हणून त्याने आम्हाला सांगितले...आणि म्हणून आम्ही लग्नाची मागणी घालायला आलो होतो...

स्वरा फक्त रडत होती, तिला काहीच सुचत न्हवतं.. संकेत सुद्धा हतबल झाला..आई वडिलांचा अपमान त्याला सहन होत न्हवता....

शेवटी संकेत बोलला काका तुम्ही मला काय बोलायचे ते बोला माझ्या आई वडिलांना काही बोलू नका...

स्वराचे वडील: खाण तशी माती..मी तुला पहिल्यांदाच पाहिले तेव्हाच ओळखले होते तुला तू कसा आहे...चला चालते व्हा घरातून... पुन्हा तोंड नका दाखवू.....


संकेत स्वराकडे पाहू लागला ,तोच स्वराचे वडील ओरडले. स्वरा रूममध्ये जा......स्वरा रडत रडत आत निघून गेली.....


संकेतसाठी सर्व संपले होते, स्वराची आई हात जोडून माफी मागत होती.. संकेत ,संकेतचे आई वडील निघून गेले....

सगळं काही विचित्र झाले होते....
स्वरा आईला बिलगून रडु लागली..आज तिने संकेतला नेहमीसाठी गमावले होते.संकेतच्या आई वडिलांचा खूप अपमान केला..
स्वराची आई सुद्धा रडत होती.संकेतसारखा मुलगा निघून गेला.....काय उरल होतं?काळोख दिसतं होता.....

इथे संकेतसुद्धा रडु लागला..आईला बाबांना माफी मागू लागला.."माफ करा बाबा,मझ्यामुळे तुमचा अपमान झाला"सॉरी बाबा.....

त्याचे बाबा त्याला धीर देत होते... संकेत काही तरी मार्ग निघेल बाळा शांत हो..

संकेत: नाही बाबा,आता काही मार्ग नाही..नका मला खोटी आशा दाखवू...सर्व संपलं आहे..आज मी मान्य केले आहे स्वरा माझ्या आयुष्यात नाही येणार बाबा ,नाही येणार...पण बाबा ती आयुष्यात नाही आली तरी तिच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम असणार बाबा .तिच्याबरोबर जगू नाही शकत पण मी तिच्या आठवणीत जगणार... बाबा मी आता तिच्या आठवणीत जगणार.. मी आशा करणं आता चुकीचं आहे जी कधी मला भेटणार नाही..त्याने मला आयुष्यभर  त्रासच होईल...मला लग्न करायचं होतं पण माझ्या नशिबी माझ्या प्रेमासोबत आयुष्य काढणं नाही ..खूप कमनशिबी आहे मी ह्याबाबतीत......

संकेत आतून कोसळला होता,तो स्वतःला सावरण्याचा खोटा प्रयत्न करत होता..आई बाबांना लेकाला होणारा त्रास बघवत नव्हता.. पण ते हतबल झाले होते... स्वराचे वडील अडून बसले होते.. त्यांनी जर परवानगी दिली असती तर सर्वच जुळून आले असते... पण त्यांनी तर अपमानास्पद वागणूक दिली.....

स्वराच्या वडिलांचा हेकेखोर स्वभाव कोणालाही आवडला नाही.....

इथे स्वराच्या वडिलांनी तर अजूनच कहर केला,काय केलं स्वराच्या वडिलांनी पाहू पुढच्या भागात..

अश्विनी पाखरे ओगले
लेख आवडल्यास, लाईक, कंमेंट आणि नवासहित शेअर करा.
मला नक्की फॉलो करा....

🎭 Series Post

View all