Login

नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलिकडे भाग २५

Its about true love

मागच्या भागात आपण पाहिले की स्वराची आई ,स्वराला घेऊन घराच्या बाहेर पडते.. आता पाहू पुढे...

स्वराची आई स्वराला घेऊन बाहेर पडते.... स्वरा आईला थांबवते ,आणि विचारते आई ,आपण बरोबर करतोय का???
आई ,बाबा एकटे पडतील..... खरंच हे योग्य आहे???

आई:स्वरा,बाळा मीसुद्धा हाच विचार करत राहिले, एवढ्या वर्ष आणि फक्त आणि फक्त बंधनात राहिली,त्रासच सहन करत राहिले ..तू नको करू त्या माणसाचा विचार ,ज्याच्यासाठी तू जड झाली होती..कधी तरी त्याने जवळ केलं का आपल्याला .नेहमीच त्रासच दिला...मी सहन करत राहिले म्हणून त्याने त्रास दिला. मी समाजाच्या भितीपोटी  माझ्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात कधीच आवाज उठवला नाही...खरंच आज मला मोकळं झाल्यासारखं वाटते आहे...हे बळ मला  माझ्यातल्या आईने दिले... माझ्यावर होणारा अन्याय मी सहन केला....पण माझ्या मुलीवर अन्याय होत आहे हे माझ्यातल्या आईला नाही पटलं... जे काही केलं फक्त तुझ्याबप्रेमापोटी .एक स्त्री बायको म्हणून सर्व सहन करते पण, जेव्हा ती आई होते तेव्हा ,ती मुलावर अन्याय होत असेल तर तिच्यात साऱ्या जगाशी लढण्याच बळ हे येतेच  येते....खरंच ते बळ आज आलं .

मी जे अनुभवले ते तुझ्या वाट्याला नको....म्हणून हेच पाऊल योग्य आहे ..आता मी योग्य मार्गावर आहे..हे मी आधीच करायला हवं होतं...असो ..आता पुन्हा नाही मी माघारी जाणार...तुलाही जाऊ देणार नाही...

चल आता आपल्याला संकेतच्या घरी जायचं आहे......

दोघी संकेतच्या घरी आल्या....संकेतच्या  आई वडीलांनी दोघींना पाहिलं.. त्यांना विश्वासच बसत न्हवता..संकेतचे आई बाबा दोघेही खुश झाले..

दोघींची विचारपूस केली...स्वराच्या आईने घडलेला प्रकार सांगितला...संकेतच्या आई बाबांसाठीही धक्काच होता....संकेतचे वडील बोलू लागले...

वडील: ताई,तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्यच घेतला.. माझ्या अवघ्या आयुष्यात मी असा माणूस नाही बघितला जो स्वतःच्या बायकोला आणि मुलीला इतका तुच्छ लेखतो... मलाही मुलगी आहे पण ,मला ती कधीच ओझं नाही वाटत...मुलगी तर  घराचे चैतन्य असते.... तिच्याशी इतक्या क्रूरपणे वागणारा वडील मी पहिल्यांदाच पाहिला......बायको म्हणजे  अर्धांगिनी..तुमच्याशीही त्या माणसाचं वागणं पाहून खरं तर प्रचंड चीड आली... पण तुम्ही जे केलं ते  बरोबर केलं.....
एकदा बंधनात राहायची सवय लागली, की ती साखळी तोडू नाही वाटत....बंधनातून मुक्त झाल्यावरच सुंदर आयुष्य जगता येतं.... एकच आयुष्य असते, मनाप्रमाणे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे...

स्वराची आई : हो,भाउ म्हणूनच हा निर्णय घेतला..मला नाही पण माझ्या मुलीला तिच्या मर्जीने आयुष्य जगता यावे हीच ईच्छा आहे...माझ्या मुलीला सून म्हणून स्वीकार करा....तिने हात जोडले ..

संकेतचे वडील: अहो ताई,ह्या दिवसाची तर  आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो... तुमच्या मुलीला सून नाही तर मुलगी म्हणून तिची नेहमी काळजी घेऊ... बरं मी संकेतला फोन लावतो... तो फार खुश होईल..

त्याचे बाबा संकेतला फोन लावतात.. संकेत : हॅलो बाबा

वडील:-हॅलो संकेत घरी ये लवकर...
तुझ्यासाठी सरप्राईस आहे...

संकेत: बाबा,प्लीज मी  कामात आहे... नाही जमणार ..उशीर होणार मला....

वडील:: एक तर मी काय म्हणतोय..

संकेत: बाय बाबा...

संकेत फोन ठेवून देतो...

संकेतची आई: बरं तुंम्ही बसा सर्व मी छान काही तरी खायला आणते...

स्वराची आईसुद्धा किचनमध्ये जाते... दोघींच्या गप्पा सुरू होतात...

संकेतची आई: ताई,तुम्ही हा निर्णय घेऊन खूप मोठे उपकार केले माझ्यावर..संकेत खूप दुखावला होता.. आम्ही खूप आशेने आलो होतो पण निराशा झाली...स्वराच्या वडिलांच वागणं पाहून असं वाटलं की सर्व संपल....पण खरंच स्वरा माझी सून होणार आता ते फक्त तुमच्यामुळे शक्य झालं.....धन्यवाद ताई...

स्वराची आई: संकेतची आई,उलट मी तुम्हाला धन्यवाद दयायला हवा,संकेत सारख्या मुलाला तुम्ही जन्म दिला,त्याच्यासारखा  गुणी मुलगा माझा जावई होतो आहे...जो तिच्यावर मनापासून प्रेम करतोय... माझ्या स्वराचं नशीब खरंच चांगलं आहे की ,संकेतसारखा मुलगा जोडीदाराच्या रुपात लाभनार आहे.....


रात्र झाली...स्वरा आतुरतेणे वाट पाहत होती संकेतची ...बेल वाजली... संकेत आला होता...

स्वरा त्याच्या वाटेकडेच डोळे लावून बसली होती... संकेतने स्वराला पाहिले... त्याला विश्वास न्हवता बसत..एकटक पाहू लागला ....तोच बाबांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला.. आणि विचारलं आवडलं का सरप्राईज?????

संकेत आणि स्वरा फक्त रडत होते .संकेतने वडिलांना घट्ट मिठी मारली.... तोच वडील कानात बोलले तुला बोललो होतो ना"मनापासून जी गोष्ट आवडते ती गोष्ट मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा,नियती ती गोष्ट आपल्यासमोर  उभी आणून ठेवते..बघ तुझं खरं प्रेम जिंकलं ...आज स्वरा तुझ्या आयुष्यात आली संकेत......

संकेटच्या तोंडातून एक शब्दही फुटत न्हवता......दोघ एकमेकांना डोळे भरून पाहत होते..संकेत आणि स्वराच स्वप्न पूर्ण होणार होते.....

संकेत पळत गेला  आणि स्वराच्या आईच्या पाया पडला.....तिचे हात जोडून आभार मानले..

आज प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते..... खरं प्रेम जिंकलं होतं ..संकेतच, स्वराचं आणि आई वडिलांचं ..

संकेतची  आई बोलली उद्याच जाऊन आपण छान लग्न लावूया...

संकेतचे बाबा मुद्दामून स्वराला बोलले .." काय स्वरा पसंत आहे ना मुलगा?????

स्वरा लाजली आणि खाली पाहू लागली....पण आज ती सुखावली ..डोळ्यामध्ये संकेतबरोबर संसारच स्वप्न पाहू लागली...जे स्वप्न केवळ आई मुळे सत्यात उतरणार होतं त्या आईला घट्ट बिलगली....

क्रमश...

अश्विनी पाखरे ओगले.
लेख आवडल्यास, लाईक, कंमेंट आणि नावासहित शेअर करा...
मला नक्की फॉलो करा..