Login

नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलिकडे भाग २६

Its about true love

मागच्या भागात आपण पाहिले की,स्वराच्या आईने स्वतःच तिच्या नवऱ्याच्या विरोधात जाऊन, होणाऱ्या त्रासाला कंटाळून घर सोडले होते.संकेत आणि स्वराच लग्न आटपायचा निर्णय सर्वांनी घेतला.

स्वरा आज सजली होती, संकेतच्या नावाची मेहेंदी होती तिच्या हातावर,त्याच्या नावाचा हिरवा चुडा हात भरून घातला होता...तिच्या चेहऱ्यावर संकेतच्या प्रेमाची लाली चढली होती....संकेत तिला एकटक पाहत होता..त्याला विश्वास न्हवता बसत स्वरा आज प्रत्यक्ष त्याची नवरी म्हणून त्याच्या समोर उभी आहे...स्वराच्या आईच्या डोळ्यात आंनद अश्रू होते.... भरभरून लेकीला ती आशीर्वाद देत होती.लेकीचा संसार सुरु होईल..संकेतच स्वरावर असलेलं प्रेम पाहून भारावून गेली होती...

संकेतचे आई वडील बहीण सर्वच खुश होते.... संकेतचा आनंद गगनात मावत न्हवता..त्याच्या डोळ्यातसुद्धा पाणी तरळत होते.. साक्षात लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसत होता..

साखरपुडा होताना संकेतने त्याच्या खिशातून तीच अंगठी काढली आणि स्वराला घातली,तिला बोलला स्वरा "खूप महिने झाले ,स्वरा ही अंगठी तुझ्यासाठी बनवून ठेवली होती आज हा योग आला,खूप वाट पाहायला लावलिस राणी......i love you  स्वरा... मी खूप खुश आहे आज,तू माझ्या आयुष्यात आली....थँक्स स्वरा....... थँक्स माय लव......

तोच पाठून बहीण बोलली, "दादा,आम्हाला पण सांग काय वहिनीच्या कानात सांगितले ते???"

हे सर्व ऐकून सर्वच हसू लागले......

स्वराला आताही स्वप्न वाटत होते... ती खूप खुश होती.....आज संकेत आयुष्यात आला होता...

संकेत स्वरा एकरूप झाले होते, सात जन्माचे वचन मनोभावे घेतले... एकमेकांचा हात घट्ट पकडून सात फेरे घेतले,  वरमाला  घालताना संकेतच्या मित्रांनी त्याला उचलून घेतले ,तर स्वराला तिच्या सासूने आणि आईने उचलून घेतले....खूप नेत्र सुखावणारा तो क्षण होता...सगळंच जुळून आले होते.. सर्वत्र आंनद होता...... जेवणाची पंगत बसली...स्वराला तिच्या सासूने ,आईने,नंदेणे घास भरवला...स्वरानेसुद्धा संकेतला घास भरवला.....


जेवताना स्वराला अचानक  ठसका लागला तोच ,संकेत कावरा बावरा झाला..लगेच उठून उभा राहिला,तिला पटकन पाणी पाजलं, तिच्या  पाठीवरुन हात फिरवला,तिला हवा देऊ लागला ....ते दृश्य पाहून स्वराची आई खूप सुखावली..देवाला मनोमन आभार मानले, संकेत सारखा जावई मिळाला....

संकेत होताच असा,जणूकाही त्याने स्वरासाठी जन्म घेतला होता..तिच्या आईला ते पाहून स्वतःचा किस्सा आठवला.... जेव्हा तिला ठसका लागे तेव्हा स्वराचा बाबा ओरडत राहायचा,खेकसून बोलायचा  ,"नीट खाता येत नाही का,माझ्याबरोबर जेवायला नको बसत जाऊ".......अनेक असे दुःखद  क्षण होते, जे स्वराच्या आईने सांसार मोडू नये म्हणून प्रत्येकवेळी नमतं घेतेले होते.... आज तिला स्वतःचाच अभिमान वाटत होता...नवऱ्याला सोडून आल्याचा निर्णय तिची तिला समाधान देऊन गेला......


लग्न छान पार पडले.. स्वरा आज खऱ्या अर्थाने संकेतची झाली होती...दुसऱ्या दिवशी सत्य नारायणाची पूजा होती..... लग्नामुळे थकवा आल्यामुळे  सर्व झोपी गेले.....

पूजा झाली सर्व पाहुणे गेले ..स्वरा रूममध्ये होती, तिची आई आली..स्वराला बोलली"स्वरा,मी गावी जायची तिकीट काढले  आहे  ,आता मी उद्या गावाला जाते,तू आता सुखाचा संसार कर,मागच सगळं विसरून जा,कधी आठवण आली की ,मला फोन कर..मला भेटायला ये,मीपण येईल तुला भेटायला,जावयी बापू खूप काळजी घेतात तुझी,तुपण काळजी घे त्यांची ,खूप छान सासर भेटेले ग तुला, सुखाचा संसार कर..."हे ऐकताच ती आईला घट्ट बिलगली.. रडु लागली.. आई तू नको जाऊ गावी,आपण इथेच घर पाहूया ....

आई: स्वरा,तिथे माझ्या वडिलांचं घर आहे,त्यांच्या जिवंतपणी नाही जाऊ शकले पण आता जाऊन त्या असंख्य आठवणी गोळा करायच्या आहेत ग,...मला तुझी आता अजिबात चिंता नाही...संकेतसारखा गुणी मुलगा तुझ्या आयुष्यात आला ,भरून पावले बघ मी.......आता आयुष्यभर तुझ्या वडिलांच्या भीतीपोटी जगत  आले..आता मला मुक्तछंदपणे  जगायचं आहे बाळा.....नको थांबवू मला,जाऊ दे...तू सुखाचा संसार कर.......

माया लेकीनी हंबरडा फोडला....

तोच संकेत आला,दोघींना रडताना पाहताना त्याला सुद्धा रडु आले.....त्याने स्वराच्या आईला विनंती केली की तुम्ही नका जाऊ ,तुम्ही इथेच राहा.. तुम्ही माझ्या आईसारख्याच आहे.....


स्वराची आई : जावई बापू ,तुमचा मोठेपणा आहे हा....पण आता मला जरा एकटीला राहावं वाटत आहे..जे राहून गेलं जगायचं ते जगायचं आहे....फक्त तुम्ही माझ्या स्वराला सांभाळा हीच विनंती.......
संकेत आणि स्वराने तिच्या आईच्या पाया पडल्या, दोघांना तिने भरभरून आशीर्वाद दिला...


स्वराच्या आईचा निर्णय झाला होता...स्वराने आणि संकेतने खूप समजावले पण शेवटी आई दुसऱ्या दिवशी निघून गेली.......


ती गेली पण तिने नेहमीसाठी मुलीचे आयुष्य सुखद करून गेली.....स्वरा आता संसाराला लागली........

क्रमश
अश्विनी पाखरे ओगले..

🎭 Series Post

View all