गेल्या भागात आपण पाहिले की ,स्वरा आईच्या काळजीने बैचेन होती,पण आईचा फोन आला आणि ती खुश झाली...दोघ बाहेर फिरायला गेले ..
स्वरा आणि संकेत बाहेर पडले, तसा स्वराचा पाय घसरला आणि संकेतने तिला सावरलं...संकेतचा सहवास स्वराला सुखावत होता... मनातून खूप खुश होती ती आणि संकेतही...
एकमेकांचा हात पकडून आज ते चालत होते....स्वरा त्याची नजर चोरून त्याला पाहत होती..... संकेत मात्र तिच्या डोळ्यातच सतत पाहत होता... सुंदर क्षण जगत होते दोघे .
संकेत: स्वरा,असं वाटतंय की,हा क्षण इथेच थांबून जावा...तुझा हात नेहमी असाच हातात राहो..आपला साथ सदैव असाच राहो.....
स्वरा शांतपणे ऐकत होती...तिच्या गालावर पडणारी खळी पाहून संकेतही हसू लागला..डोळ्यात त्याच्या चमक दिसली.....न जाणे का पण स्वराने स्वतःची मान त्याच्या खांद्यावर ठेवली,.पहिल्यांदाच दोघ इतक्या जवळ आले होते..संकेत आजूबाजूला पाहू लागला......
तोच स्वरा बोलली
"अहो, नवरोबा ....इथे तिथे काय बघता आहात. तुमची बायकोच आहे शेजारी...."
त्याच्या हाताला चिमटा काढला....आता संकेत सुखावला... हरवलेली स्वरा सापडली होती....किती दिवसाने मनमोकळेपणाने बोलू लागली..... दोघे एकमेकांकडे बघून हसु लागले......
संकेत: स्वरा हेच हास्य आयुष्यभर तुझ्या ओठी राहू देत....खूप गोड दिसतेस.. i am so lucky स्वरा.......
स्वरा: संकेत मी नशिबवान आहे..तु माझ्या आयुष्यात आला..किती प्रेम करतोस रे.....आई नंतर जर खरं प्रेम केलं ते फक्त तू...किती जीव लावतो.. तुझ्या डोळ्यातपण माझ्यासाठी प्रेम ओसंडून वाहत...तुझ्या कृतीतून सुद्धा माझ्यासाठी प्रेम झळकत.किती काळजी करतो..तू तर माझ्या स्वप्नातल्या राजकुमारपेक्षाही खूप गोड आहेस रे..
बाबांच्या भीतीपोटी कधी व्यक्त नाही केलं प्रेम, पण खरंच मीसुद्धा वेडी झाली होते.. काही सुख असो दुःख फक्त आणि फक्त तुझाच विचार यायचा.. असं वाटायचं कधी येऊन तुला सांगते.. तुझ्याशी बोललं तरी खूप बरं वाटत..किती मन लावून ऐकतो तू माझं बोलणं.....
एका मुलीला काय हवं असते माहित आहे. एक असा जोडीदार जो तिला समजून घेईल..तिच्या सुखदुःखात तटस्थ उभा राहील...तिची काळजी घेईल, प्रेम देईल,सन्मान देईल...आणि तू अगदी तसाच आहे संकेत....आता मला माझ्या आयुष्यात काहीच नको..तू म्हणजे माझं आयुष्य...मला कधी सोडून नको जाऊ.
तिचे डोळे पाणावले,संकेतने खिश्यातून रुमाल काढला आणि लगेच डोळे पुसले....
कंठ दाटून आला त्याचा
संकेत: स्वरा ,please रडु नको....वेडा बाई लग्न झाले आहे आपले.. तुला कसा सोडून जाणार.. लग्न माझ्यासाठी खूप पवित्र बंधन आहे राणी..सात जन्म काय जेव्हा पण जन्म घेईल तेव्हा हा संकेत फक्त स्वराचा असेल...कोणीही नाही वेगळं करू शकत आपल्याला...कारण तू फक्त माझी बायको नाहीस तू माझा प्राण आहे.....शेवटच्या श्वासापर्यंत साथ देण्याचं वचन देतो तुला....
( हसतच )हो पण असं सतत रडत राहिली तर मग.......
स्वरा: मग काय??
संकेत: मग तुझ्या चेहऱ्यावरची खळी बघायची राहून जाते ग,तुझ्यापेक्षा जास्त ती खळी मला खूप आवडते..
हे बोलताच स्वराने डोळे पुसले ,हसू लागली...
संकेत :ये हुई ना बात बायको.....
दोघांनी तिकडचे सर्वच स्पॉट पाहिले.. फोटो काढले... दिवसभर फिरत राहिले.....कैद करत होते सर्व क्षण ....संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही....आज हरवून गेले होते दोघ. येणाऱ्या सुंदर आयुष्याची स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहत होते..
सुर्यास्त होत होता....... पण आज स्वरा आणि संकेतच नातं जे मैत्रीच्या पलीकडे गेले होते सुंदर लग्न बंधनात अडकले होते, ते सुख दोघे अनुभवत होते एकमेकांच्या साथीने....
मैत्रीची गोड सुरवात आज सहजीवनापर्यंत पोहोचली होती.... स्वराने अलगद मान संकेतच्या खांद्यावर ठेवली आणि डोळे बंद करून पुन्हा आठवू लागली संकेतची पहिली भेट आणि आता पर्यंतचा गोड प्रवास... इथे संकेतने सुद्धा तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि स्वरासोबत पुढे आयुष्याची स्वप्न रंगवू लागला...दोघेही स्वप्नात होते आणि मावळनारा सूर्य जणू त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आशीर्वाद देत होता.. त्या रंगात आज दोघे नाहून निघाले नेहमीसाठी.......
क्रमश..
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
अश्विनी पाखरे ओगले.
लेख अवडल्यास लाईक, शेअर आणि कंमेंट करा...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा