संकेतच्या प्रेमळ सहवासाने स्वरा सावरली होती आता..संकेतशी खुलुन बोलायला लागली होती..
आठ दिवस कसे गेले कळले नाही....दोघेही गोड आठवणी घेऊन परतीच्या वाटेला निघाले..
संकेत आणि स्वराला पाहून घरातले खुश झाले. दोघांनी ,खुप काही वस्तू विकत घेतल्या होत्या घरच्यांसाठी ..संकेतची बहीण स्पृहा तर अगदी पळतच आली ....
स्पृहा: दादा काय आणलं माझ्यासाठी ????दाखव ना....
संकेत:तुला कशाला आता ,मी माझ्या बायकोसाठी घेणार वस्तू ....
स्पृहा:काय,रे आतापासूनच तू सुरू झाला.
स्पृहाने ,स्वराच्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलली "काय ,वहिनी काय जादू केली दादा वर तुम्ही"??
स्वरा गालातल्या गालात हसली...
तोच संकेतची आई बोलली.. अगं , तुुझी किती गंं घाई , आताच आले आहेत जरा श्वास घेऊ दे की त्यांना...
जावा तुम्ही दोघं फ्रेश व्हा...स्वरा आणि संकेत रूमवर निघून गेले.....
स्वरा शांतच बसली होती.... पुन्हा तिला आईची आठवण येते का काय असे संकेतला वाटलं.....
तिच्या बाजूला बसला ....
संकेत: स्वरा ,काय झालं ग ..शांत शांत बसली आहेस......आईची आठवण येते का तुला?????
स्वरा: आईची नाही रे..पण..
संकेत: पण.... डिअर.....कोणाची आठवण येतेय....???
स्वरा: आज स्पृहा आणि तुला बोलताना पाहिलं तर,माझ्या ताईची आठवण आली ....आम्ही दोघीही असेच एकमेकींसोबत थट्टा मस्करी करायचो... लग्न झाल्यापासून पत्ताच नाही ताईचा.. कुठे आहे?कोणासोबत लग्न केलं..काहीच कल्पना नाही.. असं वाटतंय आताच्या आता ती कुठे आहे शोधावं तिला आणि मिठी मारावी....
संकेत:स्वरा, शोधुया आपण ताईला,नक्की ती जेथे असेल खुश असेल......
स्वरा : पण ताईने मलाही कॉन्टॅक्ट नाही केला..गेली ती गेलीच ..भीती वाटते रे..काही तरीच विचार येत आहेत... काही बरं वाईट तर झाले नसेल ना...???
संकेत: स्वरा, काहीही काय विचार करते.. आता तिने मनाने लग्न केले आहे,म्हणून ती तुला कॉन्टॅक्ट करत नसावी बाबांच्या भीतीने... नक्क्की करेल ती कॉन्टॅक्ट..पुन्हा असे काही भलंत सलतं विचार करू नको....
स्वराने मान हलवली..
बॅग मधून ती सामान काढू लागली...कपाटात ठेवू लागली.....तोच कपाटातून संकेतचा डागाळलेला शर्ट बाहेर पडला.....
स्वरा: हे काय संकेत??? ,कसला शर्ट आहे??..किती खराब झाला आहे आणि असा ठेवला आहे कपाटात??
संकेत:मॅडम ,ती माझ्या प्रेमाची निशाणी आहे....
स्वरा:काय??प्रेमाची निशाणी??
संकेत: हो त्या शर्टवर माझ्या मैत्रिणीच्या रक्ताचे डाग आहे..
स्वरा: कोण मैत्रिण??
स्वराची प्रश्नार्थक नजर पाहून संकेतला फार बरं वाटलं...मुद्दामून तो तिला चिडवू लागला.....
संकेत: स्वरा, actully......
असे बोलून गप बसला...
स्वरा: बोल ना पुढे .....
स्वरा एकदम कासावीस झाली..
संकेत: actully ,माझं एका मैत्रिणीवर प्रेम होतं... स्वरा.. मला नाही कळत तुला कसं सांगू पण ..खूप प्रेम करायचो......जीवापाड... पण ...
स्वरा: पण काय..संकेत बोल ...
संकेत: पण तिने ते प्रेम व्यक्तच केलं नाही.....आणि मी सुध्दा... एक दिवस मी तिला प्रपोस करायला जाणार होतो..तोच पाहतो तर काय तिचा अपघात झाला होता,ती रक्तबंभाळ झाली होती, मी तिला उचललं आणी दवाखण्यात नेहले...... तेव्हा तिच्या रक्ताचे डाग माझ्या शर्टला लागले..... हेच ते शर्ट . आमच्या प्रेमाची निशाणी...
एवढ्या वेळ ,चिंतीत असणारी स्वरा खळखळून हसायला लागली.....
संकेतही हसू लागला.....
संकेत: हो पण आता ,माझी मैत्रीण आता माझी बायको झाली आहे हा...
स्वरा: हो का,बरं झालं हा मला सांगितले माहीतच न्हवतं मला.....
संकेत: मी तर ठेवली निशाणी ..तुझ्याकडे आहे का माझी कोणती निशाणी... सांग बरं..
स्वरा: खरंच पहायचं आहे तुला..
संकेत :हो मग.....पहायचं तर आहे..
स्वराने एक वही काढली...त्या वहीत एक गुलाब होते...
स्वरा: ही बघ माझ्या प्रेमाची निशाणी... माझाही एक मित्र होता... तीन वर्षांपूर्वी त्या मित्राने मला rose day ला हे फुल दिलं होतं ते मी ह्या वहीत जपून ठेवलं आहे........
संकेत: स्वरा..... अजूनही तू जपून ठेवलं आहेस हे फुल...so sweet of you dear......म्हणजे तुला मी आवडाचो ....
स्वरा: ......अवडायचा नाही आताही आवडतो..
संकेत: मग एकदाही कधी बोलली नाहीस मला....
स्वरा:.तू तरी कुठे बोललास??
संकेत:.तूच तर सारखी बोलायची, मला लव मेरेज नाही करायचे.आई बाबांच्या पसंतीने लग्न करायचे.म्हणून माझी हिम्मत नाही झाली ग.. आणि तुला बघितल की वेगळीच भीती वाटायची. असं वाटायचे तू नाही बोलली तर मैत्री पण तुटून जाईल...
स्वरा: एवढा विचार करतोस ???
संकेत: करावा लागतो..
स्वरा: हम्म...
बरं चल आवरून घे....आई बोलावते आहे....
दोघांनी मिळून आवरा आवर केली
फ्रेश होऊन स्वरा किचनमध्ये गेली...पाहते तर काय,संकेतचे वडील चहा बनवत असतात.....तिला कुतूहल वाटते.. कारण तिच्या वडिलांनी कधी पाण्याचा ग्लास सुद्धा स्वतःहुन घेतला न्हवता.. चक्क सासरा किचनमध्ये स्वत हुन चहा बनवत असतो....
स्वरा जाते आणि त्यांना मदत करु लागते.....
स्वरा: द्या मामा मी करते ...
सासरा: कोण मामा ??
स्वरा: तुम्ही
सासरा:स्वरा मला बाबा म्हणायचं...पुन्हा मामा म्हणायचं नाही ..जसा संकेत आणि स्पृहा आहे,तशीच तू माझ्यासाठी आहे....
त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला....
स्वराचे डोळे भरून आले.रडूच लागली..... सासर्याने डोळे पुसले...
सासरा:बरं बरं मामाच बोल पण रडु नको स्वरा .. मस्करीतच स्वराला बोलले....
स्वरा हसू लागली.........
मनातल्या मनात स्वतःच्या बाबांचा विचार करू लागली.......
कसे राहत असतील?भेट तरी कशी होणार होती......ते तर शिफ्ट होणार होते.. राहत असतील तिकडेच ??
अनेक प्रश्न डोकं वर काढू लागले.......
क्रमश..
नक्की प्रतिक्रिया द्या...
अश्विनी पाखरे ओगले..