स्वरा रमली होती संसारात. संकेतचं प्रेम तिला मजबूत बनवत होतं, पण कुठेतरी माहेरची ओढ तिला अजून होतीच. तिचं मन तिला खात होतं, आपल्यामुळे आई-बाबांचं विभक्त होन तिला सतत त्रास देत होतं. स्वरा संकेतला बोलायची "मी सुखी आहे पण माझी आई एकटीच राहते आणि बाबाही"
संकेत: स्वरा तू स्वतःला दोष नको देऊ ,जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हे नेहमी लक्षात ठेव..
स्वरा: कदाचित बरोबर बोलत आहेस, पण तरीही माझं मन सतत खात राहते मला,कसं व्ह्यायचं माझ्या आई-बाबांचं??
संकेत:होईल सर्व ठीक,स्वरा ,आपण चांगला विचार करायचा सर्व चांगलंच होईल.
स्वरा:खरं होईल ना संकेत सर्व व्यवस्थित??
संकेत: हो सर्व व्यवस्थित होईल..
स्वरा आपल्या त्याच विचारात पुन्हा रमून जायची..तसा काही तिला त्रास न्हवता.. सगळे तिला खुश ठेवत होते, पण तिला अपराधी पणाची भावना त्रास देत होती.....
एक दिवस तिच्या आईचा फोन आला... तिची आई फार खुश होती..
आई: अगं स्वरा सारिका ताईचा फोन आला होता, येणार आहे उद्या मला भेटायला....
स्वरा: काय खरंच आई???
ताईचा फोन आला होता?? कशी आहे?? कुठे आहे?? ती बरी आहे ना ???
आई :हो ती बरी आहे उद्या येणार आहे मला भेटायला, म्हणून तुला फोन करून सांगितलं ...ती तिथेच आहे मुंबईत...
तू बरी आहेस ना बाळ ??कसे आहेत सर्व घरी ??
स्वरा: येथे सर्व व्यवस्थित आहे... खूप जीव लावतात मला .हसून खेळून राहतात सर्व.. खूप खुश आहे मी ..पण आई सारिका ताईने मला का नाही फोन केला ?मला किती तिची आठवण येते.. कशी आहे ग ती... तिला तर माझे काही पडलेच नाही . आता मी खरच रागावली आहे ताईवर ,जा मी तिच्याशी नाही बोलणार ..
तोच पाठुन आवाज आला , नक्की नाही बोलणार का स्वरा माझ्याशी???
स्वराने पाठी वळून पाहिले तर दुसरललरं तिसरं कोणी नसून तिची सारिका ताई आली होती.... स्वरा जाऊन ताईला बिलगली..
दोघी बहिणी रडू लागल्या .. किती महिन्याने भेटल्या होत्या.
स्वरा: ताई कुठे होतीस तू ?किती शोधलं तुला.... सतत वाईट विचार येत होते... कशी आहेस तू ताई?कुठे होती??
सारिका: मी बरी आहे ग... तू कशी आहे ??तुला भेटायचं होतं, पण मी पळून जाऊन लग्न केलं ह्याचा बाबांना नक्कीच राग आला, म्हणून थोडे दिवस मी बाहेर कोल्हापूरला गेले होते..तुला तर माहित आहे ना ?बाबा कसे आहे?किती मी त्यांना विनंती केली,पण रवी अनाथ ,कोणत्या जातीचा पातीचा म्हणून अडून बसले.. म्हणून मला हे पाऊल उचलावे लागले...
खरंच खूप आठवण येत होती तुझी, आईची. भेटायची इच्छा असून सुद्धा नाही भेटू शकले ..थोड्या दिवसापूर्वी, मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला तिनेच मला सांगितले की, स्वराने सुद्धा मनाने लग्न केले आहे आणि आई गावी राहते म्हणून मी शोध काढला आणि आज तुला भेटायला आले ..स्वरा खूप बरं वाटलं तुला भेटून तू भेटलीस तुला पाहून खूपच आनंद झाला... स्वरा तू खूप गोड दिसते आहेस ग ....
स्वरा: ताई तू बस मी तुला काहीतरी घेऊन येते खायला...
ताई: नको ग, काही आणू मला डोळे भरून तुला पाहु देत, किती दिवसांनी पाहत आहे तुला.. माझ्या जवळ बस..दोघींनी गप्पा मारायला सुरुवात केली ,तोच स्वराची सासू आली.
स्वराने बहिणीची ओळख करून दिली ..
आता तिघांच्या गप्पा सुरु झाल्या. तासाभराने स्वराची बहिण निघाली. जाताजाता तिच्या सासूला बोलली "काकू, स्वराची काळजी घ्या हा खूप भोळी आहे ती"
सासू: नको काळजी करू, स्वरा आमच्या लेकी सारखीच आहे. सारिका बोलली "मी उद्या आईला भेटायला जाणार आहे, तू येतेस का स्वरा???
स्वरा काही बोलणार तोच सासु बोलली, "येते का काय? घेऊन जा तीलापण, तुम्ही दोघींना बघून तुमची आई खुश होतील ..
स्वराला खूप आनंद झाला ती सुद्धा रात्री तयारीला लागली . संकेत आला
संकेत आला तसाच स्वराने त्याला घट्ट मिठी मारली,
संकेत: स्वरा खूप खुश आहेस काय बात आहे??
संकेत :सारिका ताई आली होती घरी,
संकेत: खरंच?
स्वरा: हो खरंच
संकेत: चला आपली काळजी आता मिटली.. बरं झालं ताई आली. ताई बरी आहे ना???
स्वरा :हो बरी आहे..खूप गप्पा मारल्या ...उद्या आईला भेटायला जाणार आहे ती आणि मी..
संकेत :काय तू पण जाणार आहेस??
स्वरा: हो
संकेत :हसला आणि बोलला "काय मॅडम?? आम्हाला तर काही खबर नाही .. काहीच सांगितलंच नाही,तुम्ही उद्या गावाला जानार ते??
स्वरा: हो नवरोबा, पण मातोश्रींनी परवानगी दिली आहे आम्हाला..
संकेत :हायकोर्टाने परवानगी दिली म्हटल्यावर, आम्हाला कोण विचारतंय..
स्वरा :संकेत लव यु सो मच ,खरच तू बोलला होतास, सर्व व्यवस्थित होईल आणि तसेच होत आहे फक्त आता बाबांची काळजी वाटते रे...
संकेत: बाबांची नको काळजी करू, नक्कीच त्यांचा राग आज ना उद्या शांत होईल...
स्वरा: खरंच संकेत??
संकेत :हो शंभर टक्के खरं..
स्वरा:असं झालं तर बर होईल रे ,
संकेत: चला मग मॅडम पॅकिंग करूयात ...
दोघांनी मिळून पॅकिंग केले दुसऱ्या दिवशी सकाळीच स्वराची बहीण सारिका तिला घ्यायला आली.आणि दोघी बहिणी आईला भेटायला गावी रवाना झाल्या
स्वराची बहीण तर आली,तिचा पत्ता लागला पण बाबांचा काय??काय होईल पुढे ?? त् कशी असेल भेट जाणून घेऊया पुढच्या भागात त्यासाठी वाचत रहा "नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे"
अश्विनी पाखरे ओगले..
लेख आवडल्यास नक्की प्रतिक्रिया द्या
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा