स्वराची आई पळतच गेली ,तिचे बाबा शुद्धीवर आले पाहतात तर बायको शेजारी बसली होती.... तिच्या चेहऱ्यावर ती किती कासावीस झाली आहे ,स्पष्ट दिसत होते.....
त्यांनी तिच्यासमोर हात जोडले आणि अश्रूंनी त्यांच्या वाट काढली...स्वराच्या आईचेही ह्रदय गलबलुन आले नवऱ्याला आज तिने पहिल्यांदा रडताना पाहिले..तिच्यासाठी आश्चर्य होते, तो माणूस आज तिच्यासमोर रडत होता जो फक्त आणि फक्त आजवर तिच्यावर खेकसत होता.... कधीच प्रेमाने बोलला नाही..हे रूप पहिल्यांदाच पाहिले तिने नवऱ्याचे ....आज तो बोलू लागला मनातलं सर्व काही.........
"माफ कर सुभद्रा, क्रुरतेने वागलो तुझ्याशी, मुलींशी पण....आज माझ्या डोळ्यावरची पट्टी उतरली आहे.तू मला सोडुन गेलीस आणि मला जाणीव झाली मी तुझ्याशिवाय शुन्य आहे..सर्व चैतन्य गेले ..माहीत नाही कोणत्या अविर्भावात जगत होतो...सर्वच समोर आले सुभद्रा... कळायचंही तु माझ्यासाठी काय करते पण माझं हट्टी मन अडुन राहिले....तू गेलीस आणि अनुभवलं एकटेपणाचं विभिस्त रूप... घर खायला उठायचं मला....तुमच्याशिवाय माझ्या आयुष्याला खरंच किंमत नाही... मुली झाल्या आणि माझ्यातली विकृती फक्त तुला त्रास देत गेली.... पण खरंच आपल्या मुली चांगल्याच आहे..कधी उलटून बोलल्या नाही आजवर त्यांना मी कधीच जवळ केलं नाही ..गुन्हेगार आहे तुम्हा तिघींचा ,माफ करा मला....
सुभद्रा मला नको सोडून जाऊ पुन्हा,
सुभद्रा : नाही ,ओ तुम्हाला नाही सोडून जाणार कुठे.... देवाचे आभार की तुम्ही सुखरूप आहाता.....आणि तुम्हाला तुमची चूक समजली अजून काय हवं.. आयुष्यभर ह्याच दिवसाची वाट पाहिली मी.....पण नंतर नंतर आशा सोडली... मनाची समजुत घातली तुमच्याशिवाय जगायचं आता..पण आता नाही,माझ्यासाठी हा सोनेरी दिवस आहे...आज खऱ्या अर्थाने तुम्ही मला तुमची अर्धांगिनी स्वीकारले ...हेच हवं होतं मला..हेच हवं होते......
स्वराचे वडील:"खरंच ,तू मला माफ केले,?????कदाचित मी तुझ्या ठिकाणी असतो तर शक्य नसते झाले... मी तर तुला एक फोनही नाही केला..एवढ्या वर्षाचा त्रास सुभद्रा खरंच विसरशील??
सुभद्रा: हो,आम्हा बायकांना देवाने जणु शक्तीच दिली आहे..ज्याला आम्ही मनापासून प्रेम करतो त्याचा साथ नाही सोडत...वेळ पडली तर स्त्री चंडिका होते आणि लक्ष्मीसुद्धा.... पण हे सर्व नवऱ्याच्या हातात असते ,तुम्ही आम्हा बायकांना प्रेम दिलं ,सन्मान दिला तर आमच्याही मनात नेहमी तुमच्या तुमच्याविषयी प्रेम असते आणि मनापासुन आशीर्वाद निघतात...पण जर का तुम्ही आमचा सतत अपमान करत राहिला ,तर आमच्यातली चंडिका जागृत होते....... पण खरं सांगू तुमचा अपघात झाला हे जसे कळलं तसं तुमच्याविषयी असलेला राग न जाणे क्षणात नाहीसा झाला... असं वाटलं तुम्हाला कधी पाहते.... शेवटी लग्न हे असे बंधन आहे ज्यात पती पत्नी वचन घेतात एकमेकांना साथ देण्याचे, ते पूर्ण करण्याचं.. आजपर्यंत पत्नी म्हणुन सर्वच वचन मी पाळले मग आता अश्या वेळी तुमचा साथ सोडने अशक्य आहे.......आता तुम्ही शांत व्हा आराम करा...मी आली आहे ना,काळजी करू नका......
स्वराचे वडील:खरंच मला काळजी नाही आता...पती,वडील म्हणुन जी कर्तव्य पार पाडली नाही आता मला पार पाडायची आहे...कुठे आहे माझ्या मुली बोलावं त्यांना.......
स्वरा आणि सारिकाही दोघी आल्या वडिलांना भेटायला.... पाठून संकेत त्याचे आई वडील.....
स्वरच्या बाबांनी सर्वांची माफी मागीतली.....स्वरा,सारिका बाबांच्या शेजारी उभ्या राहिल्या...त्या दोघींचीसुद्धा हात जोडून माफी मागितली... स्वराने आणि सारिकाने वडिलांचे हात पकडले .. बाबा आमची नका माफी मागू......माफी आम्हाला मागायला हवी आम्ही दोघींमुळे तुम्हाला त्रास झाला..
वडिल: नाही ग,पोरीनो माफी मागायची आहे मला..तुम्ही तर माझ्या घरी लक्ष्मीच्या रूपाने आला आणि मी कधी बापाचे प्रेम नाही दिले.. तुम्ही दोघी गेला आणि घराचे चैतन्य खरोखर गेलं.. तुमच्या आईचा आणि तुम्हा दोघींचा गुन्हेगार आहे....खरंच माफ करा..पश्चाताप झाला आहे..मी काय गमावलं आजवर हे जेव्हा माझं मरण डोळ्यासमोर आले तेव्हाच दिसले...आता नाही गमवायचं काही.जे राहिलेले आयुष्य तुमच्या सोबतीने सुंदर पद्धतीने जगायचे आहे......
स्वरा आणि सारिकाने बाबांना कवटाळले....... आज खऱ्या अर्थाने वडिलांनी दोघीना आपलं मानलं होत.....
संकेतच्या डोळ्यात आंनदाश्रू आले....त्याच्या स्वराचं स्वप्न पुर्ण झाले होते... स्वराच्या वडिलांनी संकेतला आवाज दिला...
"संकेत बेटा... खूप चांगला माणूस आहे तू, तू माझ्यापेक्षा खूप लहान आहेस पण मनाने खूप मोठा..मी बाप म्हणून स्वराला प्रेम दिलं नाही पण एक पती म्हणून तू खरंच तिला खूप प्रेम दिलं..तू खुशसुदधा ठेवशील..तुझी तुझ्या आईबाबांची माफी मागायची आहे....अपमान केला तुम्हा सर्वांचा ..काय काय बोललो..... आणि आज तूच माझ्या संकटसमयी धावुन आला अगदी तू मला रक्तदान केलंस......तुझ्यामुळेच जीव वाचला माझा... कसे फेडु उपकार तुम्हा सर्वांचे....
संकेत: बाबा ,अहो असे काही बोलू नका..उलट उपकार तर तुमचे आहेत, स्वरासारखी गोड मुलगी माझ्या आयुष्यात आली..एकनिष्ठ..खूप सुंदर केलं तिने आयुष्य माझे....
संकेतचे वडील बोलले: हो,बरोबर बोलतोय, संकेत तुमची स्वरा आमच्या घरात आली आणि भरभराट झाली......उलट तुमचे उपकार आहे...
स्वराचे वडील: संकेतचे बाबा...खरंच तुम्ही महान आहात...खूप सुदंर विचार आहे...खरंच मीच कमनशिबी होतो,मुली झाल्या म्हणून नेहमी नाराजच राहिलो.. माझ्यासारखा दुरदैवी कोणी नाही या जगात.....
संकेतचे वडील: अहो झालं ते झालं, नका लावून घेऊ मनाला..आता या नात्याला बहर नक्कीच येईल.......
स्वराचे बाबा: हो नक्की...आता नव्याने सुरवात करूया...
स्वराला अचानक चक्कर आली....डॉक्टरांनी चेक केले....स्वराला वाटलं पोटात अन्न नाही म्हणून चक्कर आली असावी ....
डॉक्टरांनी तिला सांगितले तुम्ही आई होणार आहात..सर्वच खुश झाले.....खरंच नव्याने सुरवात झालीच होती....
स्वराच्या आईने तिच्या बाबांना खबर दिली..
बाबा बोलले "मला तर स्वराच हवी आहे छोटीशी,वडील म्हणून मी कर्तव्य पार नाही पाडले पण आता आजोबा म्हणुन नातीची हौस करायची आहे".....
हे ऐकुन सर्वांचे डोळे पाणावले...…
संकेत आणि स्वराच नातं जे मैत्रीपासुन सुरू झालं होतं ते फक्त प्रेमाच्या अलिकडे न राहता ,अनेकांच्या आयुष्याला सुखद कलाटणी देणारं ठरलं......
चिमुकल्या पावलांच्या चाहुलीने नव पर्वाला सुरवात केली होती..
आशा करते अशीच गोड कलाटणी प्रत्येकाच्या आयुष्यात येवो... शेवट असाच सुखद होवो.. हो पण सुखद शेवट हवा असेल तर संयम, संघर्ष, प्रेम, अतुट विश्वासाची साथ कधीच सोडू नये.........
**********समाप्त***********
©®अश्विनी पाखरे ओगले...
वाचकहो, कथामालिका लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न होता..तुम्ही खूप सुंदर प्रतिसाद दिला,खुप खुप धन्यवाद...कशी वाटली कथा "नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमच्या अलीकडे" नक्की अभिप्राय द्या.....पुन्हा नवीन कथेसह इरावर लवकरच सुरवात करेल,धन्यवाद....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा