नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलिकडे भाग ७

True love

मागच्या भागात पाहिलं संकेत स्वराला प्रपोस करणार असतो पण तिचे बाबा तिचं लग्न आत्याच्या मुलाशी लावून देनार असतात..आता पुढे पाहु.

आठच दिवस होते स्वराच्या लग्नाला... तिला आता घरातून बाहेर पडायला मना केले होते.. ती कदाचित शेवटची भेट होती संकेतची आणि स्वराची...

संकेत तडफडत होता...जेवणावरची वासना उडाली होती,गप गप राहू लागला..कशातच मन न्हवते लागत.. खूप निराश झाला..घरच्यांपासून लपून रडत रहायचा..पुढे काय करावे त्याला सुचत न्हवते..

तोच त्याला छान नोकरीसुद्धा मिळाली... त्याच स्वतःच्या पायावर उभं राहण्याच स्वप्न खूप लवकर सत्यात उतरलं कारण त्याची जिद्द, त्याची चिकाटी ,हुशारी....पण तरी तो खुश न्हवता कारण ज्या मुलीवर प्रेम केलं होतं ती तर त्याच्या आयुश्यातून निघून चालली होती..ज्या गोष्टीची आतुरणतेने वाट पाहत असतो ,ती मिळाली तरी सुद्धा त्यापेक्षाही प्रिय  अनेक गोष्टी हातातून निसटून जातात ..तसेच झाले संकेतचे.. नोकरी मिळाली पण प्रेम मात्र निसटून जात होते.. स्वरा लग्नबंधनात अडकणार होती,तेसुद्धा तिच्या विरुद्ध होत होते लग्न....त्याला तिच्या मनाची तळमळ कळत होती, पण तिच्यापेक्षा जास्त अधिकार तर तिच्या जन्म दात्याचा होता ना???
म्हणून होणारी घुसमट त्याला सहन न्हवती होत... हतबल झाला होता..देवाकडे  सतत प्रार्थना करत होता,"स्वराच लग्न मनाविरुद्ध होतंय हे थांबव..भले माझ्याशी नाही पण तिला जो मुलगा आवडेल त्याच्याशी होऊ दे देवा...तिचं स्वप्न पूर्ण कर देवा..... तिचं स्वप्न पूर्ण कर देवा.....
हेच असते  ना खरे प्रेम ,स्वतःची नाही फक्त आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याचच सुख देवाकडे मागणे ...हेच असते खरं प्रेम.प्रेमाचा सहवास नसला,तरी आपलं प्रेम सुखी आहे ह्याच्यात समाधान शोधत असते आणि समाधानी राहते.. भले स्वतःला कितीही त्रास होऊ दे...आपल्या प्रेमाला त्रास नाही झाला पाहिजे हेच असतं खरं प्रेम जे संकेतच होतं...

इथे स्वरा मात्र सतत गुमसुम होती.... लग्न होतं तरी तिला अजिबात आंनद न्हवता... आता तर तिने सर्वांशी बोलणे बंद केले..फक्त शांत असायची.. न जाणे का पण सतत तिला संकेतची आठवण येत होती... तिला तर फोनवर बोलण्याची मनाई होती... आता तर काका,काकी, मामा मामी सर्वच पाहुणे आले होते ..सर्व घर भरले होते .आनंदाचे वातावरण होते. सगळे खुश होते स्वराला सोडून..त्या घोळक्यात ती एकटीच होती....

भलेही तिने संकेतला प्रेमाची कबुली दिली न्हवती, पण मन तीच सतत हेच सांगत होत.. तुझं खरं प्रेम संकेत आहे....मनाने ताबा सोडला होता ..फक्त संकेत हवा होता...एवढ्या दिवस आई बाबा साठी तिने कधी व्यक्त होऊ दिले नाही...तिला माहीत होतं संकेत किती प्रेम करतो, किती काळजी घेतो, किती जपतो... पण स्वतःच्या आई वडिलांसाठी मनावर तिने बंधन लादले होते... पण जसजसे लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले तसतसे तिच्या मनाने बंधन तोडले...

तिचं मन ओरडून सांगत होतं तिला....स्वरा तू चुकीचं वागते आहेस. ज्याने तुझ्याशी खरं प्रेम केलं आज तू त्याला ठोकर दिली आहेस..आणि अश्या माणसाशी लग्न करते आहेस ज्याच्याविषयी  तुझ्या मनात तसूभर भावना नाही...खरच राहशील का त्याच्यासोबत खुश ???

स्वरा फक्त रडत होती,तिच्या हातात काहीच शिल्लक न्हवते...लग्नाला सामोरे जावेच लागणार होते ...तोच पर्याय होता.... काय पुढे होईल ..स्वराच लग्न होईल की नाही???पाहू पुढच्या भागात...


अश्विनी पाखरे ओगले
लेख आवडल्यास  लाईक, कंमेंट नावसाहित शेअर करा.

🎭 Series Post

View all