नात टिकतचं भाग २

विवाह प्रेम असो की अरेंज शेवटी माणुस महत्वाचा
मागील भागात.

“बोल ना.” आराध्याने तिला बेडवर बसवलं. “काय झाल? काही टेन्शन आहे का? मी करते ना मदत. कोणाला म्हणजे कोणालाच सांगणार नाही. अगदी पिंकी प्रॉमीस.”

आता सानिकाला जरा धीर आला. तिने तिच्या पाठीमागचा हात हळुच पुढे केला. आराध्याने तिच्या हातात पाहीलं तर तो आराध्याला मिळालेलेच जरा मोठ अस काचेच शोपिस होता. जे आता पुर्ण तुटलेलं होता. आजवर आराध्यासोबत तिच इतकही बोलण झाल नव्हतं की ती नक्की रिॲक्ट करेल हे सानिकालाच माहीत नव्हतं. पण घरात मिळालेल्या संस्कारांनी तिला खरं बोलण्यासाठी आराध्याजवळ आणलं होत. पण आराध्याचा चेहराच बघून सानिकाला अजूनच टेन्शन आलं होत.

आता पुढे.

“स.. सॉरी.” सानिका चाचरत बोलली. “त.. ते मी टेबलवरून माझा मोबाईल उचलायला गेली तर माझाच धक्का लागला.” सोबत तिचे डोळे ही भरून आले.

तस आराध्या अजूनच टेन्शनमध्ये आली. ते बघून सानिकाला आता रडायलाच सुटणार तेवढ्यातच आराध्या बोलायला लागली.

“तुला लागल नाही ना?” आराध्या सानिकाच्या हातात पायाला तपासुन बघत बोलली. सानिकला जरा आश्चर्यच वाटलं. कारण नाही म्हटलं तरी तो शो पीस किमान पाच ते दहा हजाराचा होता. वरुन तो आराध्याच्या माहेरूहून आराध्याला गिफ्ट म्हणून मिळालेला होता.

आराध्याच वागणं बघून सानिकाचा एक अश्रु गालावरून ओघळाच. ते बघून आराध्या अजून टेन्शनमध्ये येत तिला निट बघू लागली.

“नाही लागल मला.” सानिका लगेच सावरत बोलली. “मला वाटलं तुझ स्पेशल गिफ्ट आहेस तर खूप ओरडायला लागशील मला.”

“का?” आराध्या प्रश्नार्थक बोलली. “गिफ्ट काय परत येईल. पण एकदा गेलेला माणुस परत भेटत नाही.” आराध्याने प्रेमाने सानिकाचे अश्रु पुसले.

“मी तुला एवढी खडूस वाटली?” आराध्या लटक्या रागात बोलली.

“ते माझ्या मैत्रीणी बोलत होत्या.” सानिका “नवीन नवीन चांगली वागेल आणि नंतर…” पुढे बोलता बोलता सानिका थांबली.

“अच्छा.” आराध्या “मला पण अस सांगणारे बरेच बोलले कि नणंदा ही खाष्ट असतात. पण तु तर खूप गोड आहेस.”

आता सानिकाने तिची बत्तीशी दाखवली आणि तिच्या वहिनीच्या कुशीत पहील्यांदाच बिलगली. आराध्याची घरात माणस जोडायला सुरवात झाली होती. नंतर सानिकाच लक्ष कॉम्प्युटरवर गेल आणि तिचे डोळेच मोठे झाले.

“वहिनी काय गं हे?” सानिका कॉम्प्युटरसमोर जाऊन बसली आणि आराध्याने घट्ट डोळे मिटले.

सानियाने तिचा सगळाच कॉम्प्युटर चाळायला घेतला. बघून झाल्यावर डोक्याला हात लावुन बसलेल्या तिच्या वहिनीकडे पाहीले. मग सानिकाना तिचा ही मोबाईल काढला आणि आराध्यासमोर धरला. तसा आराध्याला ही आश्चर्याचा धक्काच बसला.

“प्लिज नको सांगुस कोणाला.” आराध्या तिला विनंती करत बोलली.

“का?” सानिका आता गालातच हसत बोलली.

“अजून माहीत नाही ना कोणाला.” आराध्या एक आवंढा गिळत बोलली. आत्ताच तर दोघींची निट भेट झाली होती. त्यामुळे सानिका तिच हे सिक्रेट इतरांपासून लपवेल की नाही हाच मुख्य प्रश्न होता.

“माझ्या काही अटी आहेत.” सानिका पुर्ण नणंदेच्या भुमिकेत उतरली आणि बेडवर उभी रहात बोलायला लागली. आराध्या तिला कमरेवर हात ठेवुन बघू लागली.

“माझा सकाळचा नाश्ता माझ्या रुममध्ये घेऊन यायचा.” सानिकाची अट ऐकुन आराध्या गोंधळून गेली.

“अगं पण घरात भांडतील ना दोघींना.” आराध्या टेन्शनमध्ये येत बोलली. “माझ्यामुळे तुला ही ओरडा पडेल.”

“त्याच टेन्शन नको घेऊस ते मी बघेल.” सानिकाचा तो नणंदेचा अभिनय बघून आराध्याला आता जरा हसायलाच येत होत.

“नाश्ता आणला कि माझा अभ्यास तुच घ्यायचा.” सानिका

“बरं बाई ते करेल मी.” आराध्या

“आणि तिसरी शेवटची अट.” सानिका आता दात दाखवत बोलु लागली. “मला ना डार्क चॉकलेट आईस्क्रीम खूप आवडतं.”

“मग?” आराध्याला सानिका जरा अंदाज आला. आजवर घरात राहून इतकं तर समजलं होत की ती तिच्या या आईस्क्रीमसाठी किती वेडी होती ते.

“मग काय?” सानिका खांदे उडवत बोलली. “माझ मन होईल तेव्हा ते मला आणुन द्यायचं.”

आराध्याने सानिकाला आठ्या पाडुन पाहील. “तुझ्या तब्येतीच्या जास्त महत्वाचं माझ्यासाठी काहीच नाहीये. त्यापेक्षा जे आहे ते मिच जाऊन सांगते घरात.”

तशी सानिकाने बेडवरून टुणकन खाली उडी मारली आणि जाणा-या वहिनीच्या हाताला धरून थांबवल. “नको नको नको. मला आईस्क्रीम नको. पण माझा अभ्यास मात्र तुच घे.”

तशी आराध्याने तिच्या टपलीत मारली. “ठिक आहे.” नंतर कॉम्प्युटरकडे बघत ती बोलली. “आळीमिळी गुपचिळी.”

तस सानिकाने ही होकारात मान हलवली आणि उड्या मारत तिच्या रुमकडे धूम ठोकली.

तिची आणि सानिकाची झालेली गट्टी बघून सुमितला जरा समाधान वाटलं. त्याला त्याचा निर्णय सार्थ वाटु लागला होता.

आराध्याने नवीन पदार्थाच्या नावाखाली हेल्दी फुड बनवायला सुरवात केली होती. खास करून आजी आजोबांना ते खूपच आवडायला लागले होते.

एके दिवशी आराध्या सुमितच्या आईसोबत भाजीमार्केटला गेली होती. भाजी घेता घेता एका ठिकाणी एक भाजीवाला तिला वजनात काटा मारताना जाणवला. म्हणुन तिने बाजुच्या किराणामालाच्या दुकानातून त्या भाजीच वजन परत करायला लावलं होत. तसा तो भाजीवाला जरा चिडून उध्दटासारखा बोलायला लागला. तशी आराध्या ही चिडली. सुमितची आई तिला शांत करू बघत होती. पण तो सुमितच्या आईकडे बघून वेडवाकडं बोललल्याने आराध्या चांगलीच तापली गेली.

“माझ एकच म्हणणं होत की तुझा काटा जर चांगला आहे. तर तुला दुसरीकडे काटा करायला काय प्रोब्लेम आहे.” आराध्या शांतपणाने बोलली.

“मला नाही द्यायची भाजी.” भाजीवाला ती पिशवी परत ठेवु लागला.

“म्हणजे तु काटा मरतोस ना?” आराध्या आता मोठ्याने बोलली. “म्हणजे आजवर किती लोकांचे पैसे खाल्ले असतील. पचतील का तुला?”

सुमितची आई आराध्याचा असा रागातला अवतार पहिल्यांदाच बघत होती.

“ए म्हतारे तुझ्या मुलीला घेऊन जा इथुन.” भाजीवाला बोलून थांबला ही नसेल तोवर त्याच्या कानाखाली जाळच निघाला होता. आता बाकीची माणसं ही त्या भाजीवाल्याला चांगलेच भांडु लागले होते.

“पुन्हा एक शब्द जरी बोललास ना तर सगळेच दात पाडीन तुझे.” आराध्या “माझ्या आईला म्हातारी बोलतोस.”

सुमितची आई आता तिच्या या सुनेकडे कौतुकाने बघे लागली. ‘तिने तर आपल्याला मानापसुन स्विकारलं पण आपण?’ हा विचार येताच त्यांचे डोळे भरले गेले होते. त्यांनी मग त्याच आईची शपथ घालून तिला तिथुन घरी आणले होते. घरी आले होते तरी तिची चिडचिड चालूच होती.

क्रमशः

🎭 Series Post

View all