भाग - 1
आई वडील नाहीत, घर दार नाही, शेतीवाडी नाही,
धड 10 वी पास पण नाही, ना अभ्यासाची आवड,
ना खेळाची आवड, ना कधी कुठले वाचन, कि देवा धर्माचे नाही काही नाही तर निदान फिरायला जायचे वेड म्हणावे तर ते ही नाही. किचन मधून कणिक मळता मळता श्वेताची बडबड चालूच होती आणि हॉल मध्ये मोबाईल चार्जिंगला लावून मोबाईल मध्ये डोकं घालून बसलेला रोहन होता. त्याचे हू नाही कि चू नाही. एका कानांनी ऐकायचे दुसऱ्या कानांनी सोडून द्यायचे तेवढेच जमते आपल्याला. श्वेताने पडदा सरकावून डोकावून पहिले तितक्याच उर्मटपणे रोहनने पाय बदलून सोफ्यावर अजून ऐसपैस बसून घेतले. श्वेता आणि रोहन मामी भाचा. रोहन लहान असतानाच त्याची आई ऍक्सीडेन्टमध्ये वारली. वडील तर रोहन खूपच लहान असताना सोडून गेलेले ते परत आलेच नाहीत. खूप लहानपणापासूनच रोहनच्या मनात वडिलांचा तिटकारा होता. आई गेल्यावर कधी या मावशी कडे तर कधी त्या मावशीकडे आणि आता कामासाठी कायमचा तो पुण्यात मामा कडे राहायला आला होता. श्वेता अगदी प्रेमळ सर्वाना समजुन घेणारी सगळ्यांचे आपुलकीने करणारी होती. रोहनची आई म्हणजे श्वेताची नणंद दवाखान्यात असताना दिवसरात्र थांबणारी काय हवे नको ते बघणारी, रोहनला त्याची आई गेल्यावर जास्तीत जास्त जपणारी, 2-4 गोष्टी समजावून सांगणारी होती. पण आज मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि तळपायाची आग मस्तकात गेली. त्याला कारण हीं तसेच होते. दारावरची बेल वाजली आणि दारात पोलीस हजर... रोहन वाघमोडे इथेच राहतो का? पोलिसांनी त्यांच्या करड्या आवाजात विचारले. हो... हो... हा काय इथेच उभा आहे. अरे रोहन आत काय करतोस? पण साहेब रोहनने काय केले? तुम्ही त्याच्या बद्दल का विचारताय? श्वेता घाबरून आणि बावरून गेली होती. अचानक काय झाले ते तिला समजतच नव्हते. नाकासमोर चालणारे आपण शेजारच्या लोकांशी संपर्क नाही कि बोलणे नाही अचानक आपल्याकडे पोलीस का आले असतील? श्वेता विचारात पडली. तेवढ्यात मागून शेजारची सृष्टी तिचे आई बाबा आणि भाऊ दिसले. यांची तक्रार होती म्हणून आम्ही फक्त चौकशी साठी आलोय. पोलिसांनी श्वेता ला सांगितले. साहेब मुलगा थोडा अल्लड आणि बालिश आहे पण वाया गेलेला नाही. थोडं समजून घ्या. ठीक आहे ठीक आहे तुम्ही काय असेल ते शेजार्यांशी बोलून घ्या आणि लक्ष ठेवा. आम्ही निघतो. रोहनकडे एक कटाक्ष टाकून पोलीस गेले रोहन मात्र खाली मान घालून उभा होता.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा