Login

नावरसी भाग ३

Because of being the only child, excessive pampering spoils the boy, and in the end he becomes a great trouble for the family.
चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
जलद कथा लेखन स्पर्धा
संघ- कामिनी

नावरसी भाग ३

आबासाहेबांना कोणीच रागवत नव्हते आणि कसला धाक पण दाखवत नव्हते. आबासाहेब रोजच शाळेत मुलांच्या खोड्या काढत होते. सखाराम पाटलांचा मुलगा म्हणून गुरुजीही त्याला फार जरब बसवत नव्हते. आबासाहेब मग आता उधळलेल्या घोड्याप्रमाणे झाले होते.

आबासाहेबांच्या तक्रारी रोज घरी येऊ लागल्या होत्या. त्याची आई सुनीता हवालदिल झाली होती. ते शांत व्हावे म्हणून अंगारे धुपारे करत होती; पण विशेष काही फरक पडत नव्हता. 'दिपक' म्हणजेच 'आबासाहेब' आता दहावीत शिकत होते; पण अभ्यासात अजिबात लक्ष नव्हते. क्लासलादेखील दांड्या मारत होते. आता शिक्षक त्याचे वडील सखारामरावांकडे तक्रार करू लागले होते. त्यांनाही आपला मुलगा हाताबाहेर चालला आहे याची जाणीव झाली होती; पण आता काही उपयोग होणार नव्हता. इतर लोकही आता तो वाया गेलेला मुलगा आहे असे म्हणू लागले होते.
त्याला कुणाचा धाक उरला नव्हता. व्हायचा तो परिणाम झाला आणि दिपक दहावीला नापास झाला. एरवी 'आता याचं कसं होणार..' म्हणाल्यावर त्याचे आजोबा बोलायचे, "आमची तीस एकर शेती हाय ती रग्गड झाली त्याच्यासाठी."

कालांतराने आजोबा निवर्तले; पण दिपकचा त्रास आता त्याच्या आईबाबांना होऊ लागला होता.

दिपक काही कामधाम न करता दिवसभर उनाडक्या करत फिरायचा. लोक म्हणायचे 'आबासाहेब पाटील असे होते का?'

पण आज्जी म्हणायची, "आसू द्या सुधरल! नावरसी आहे."

दिपकची दुसरी सख्खी चुलत भावंडे चांगले शिक्षण घेत होती. दिपकचे 'नावरसी' म्हणून सगळे लाडकोड करत होते. तेव्हा घरातील इतर मुलांचे लाड त्याच्यापेक्षा कमीच झाले. मुलेही 'आबासाहेब' म्हणून दिपकला मान देत होती. हळूहळू घरातील भावंडांच्याही लक्षात आले की दिपक अतिलाडाने वाया जात चालला आहे. 'नावरसी' आहे, आबासाहेब पोटाला आले म्हणून त्याला एवढे डोक्यावर चढवून ठेवले होते की आता त्याला कुणी शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या तरी आवडत नव्हते. 'नावरसी' आबासाहेबांचे भविष्य आता सर्वांना स्पष्ट दिसत होते तरीही त्याची आज्जी त्याला पाठीशी घालून 'नावरसी' मामाजीला मान देत होती.

दारातून "ताईऽऽ "
अशी हाक येताच सुनीता भूतकाळातून बाहेर आली. तिचा मोठा भाऊ आला होता.
चहापाणी झाल्यावर भाऊ बोलला, "दिपकरावांच काय चाललंय सध्या? काय सुधारणा दिसतेय का त्यांच्यात?"

त्यावर दिपकची आज्जी सगुणाबाई म्हणाली, "आबासाहेब आता पंचविशीचे झाले, त्यांच्या लग्नाचं बघायला पाहिजे आता."

"आवं पोरगी कोण देणार त्यांना ? काय कामधंदा करायला नको का त्यांनी?" दिपकचे मामा म्हणाले.

त्यावर सगुणाबाई म्हणाली,
"आवं पाण्यात पडल्यावर पवायला शिकतील ते."

सुनिता आणि आबासाहेबांच्या मामाने कपाळावर हात मारून घेतला. आता यावर कोण काय बोलणार?
नावरसी म्हणून (दिपक) आबासाहेबांचा सगळ्या घरादाराला नुसता ताप होऊन बसला होता.

क्रमशः
©® सौ. सुप्रिया जाधव
११/९/२०२५
0

🎭 Series Post

View all