चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
जलद कथा लेखन स्पर्धा
संघ- कामिनी
जलद कथा लेखन स्पर्धा
संघ- कामिनी
नावरसी भाग ४ अंतिम
सगुणाबाईने मामाकडे चांगलाच आग्रह धरला होता. ती वरचेवर मामाला निरोप पाठवत होती. आबासाहेबांचे प्रताप अवघ्या पंचक्रोशीतील लोकांना माहिती होते, त्यामुळे त्याला कोणी मुलगी द्यायला तयार नव्हते. पाटील घराण्याची तीस एकर जमीन; पण घराण्याचा कुलदिपक दिवट्या असल्यावर आपली मुलगी त्याला कोण देणार?
खूप प्रयत्न केल्यावर एका खेड्यात सोयरीक जुळली. मुलगी सालस, सुंदर होती. धुमधडाक्यात लग्न लागले आणि आबासाहेबांचा संसार सुरू झाला. सुरुवातीचे दिवस चांगले गेले. आजी आता म्हणत होती, "आता संसार सुरू झाला. आता शेतीत लक्ष घाला. आपलं गुऱ्हाळ आहे, टोमॅटो प्लॉट आहे तिथे चुलत्याला आणि बाबाला कामात मदत करा."
परंतु आळस आणि ऐदीपणा नसानसात भिनलेला लाडावलेला दिपक उर्फ आबासाहेब आज्जीच्या आणि कुणाच्याही बोलण्याला जुमानत नव्हता. त्याला जबाबदारीची जाणीव अजिबात आली नाही. गाडी काढायची आणि गावभर, नाक्यावर टवाळकी करायची एवढेच त्याला जमत होते.
आज्जी तर 'आबासाहेबांचं कस होणार?'या विचाराने खंगून गेली आणि एक दिवस तिची इहलोकीची यात्रा संपली.
आबासाहेब उर्फ दिपकला फार लाडावून ठेवणारी व्यक्ती निवर्तली होती. त्याचे प्रताप बघून सुनीताताई नेहमी काळजीत असायची. सखारामलाही तो जुमानत नव्हता. त्याची बायको नंदा, नवी नवरी हे सारे गपगुमान बघत होती. तीही एकदोन वेळा आपल्या नवऱ्याला कामधंद्यात लक्ष घालण्याबद्दल बोलली होती तेव्हा तिला त्याचे नाही नाही ते ऐकून घ्यावे लागले होते.
आबासाहेब उर्फ दिपकला फार लाडावून ठेवणारी व्यक्ती निवर्तली होती. त्याचे प्रताप बघून सुनीताताई नेहमी काळजीत असायची. सखारामलाही तो जुमानत नव्हता. त्याची बायको नंदा, नवी नवरी हे सारे गपगुमान बघत होती. तीही एकदोन वेळा आपल्या नवऱ्याला कामधंद्यात लक्ष घालण्याबद्दल बोलली होती तेव्हा तिला त्याचे नाही नाही ते ऐकून घ्यावे लागले होते.
त्याच्या लग्नाच्या सहा महिन्यानंतर आजी निवर्तली होती. आतापर्यंत तिने घराला बांधून ठेवले होते. हा कणा आता मोडला होता. त्यामुळे घरातील भावाभावातील वातावरण हळूहळू गढूळ होऊ लागले होते. त्यात दिपकच्या कारवायांमुळे भर पडत होती. नाहक सर्व कुटुंबाला त्रास सोसावा लागत होता. एकदिवस मधल्या भावाने वेगळे राहण्याचा विषय काढला तसे धाकट्या भावानेही त्याची री ओढली. त्यांच्यासमोर सखारामचे काही एक चालले नाही आणि पाटील घराण्याचे हे कुटुंब विभक्त झाले.
घराची, शेतांची वाटणी झाली. सखारामला खूप दु:ख झाले. आईवडिलांच्या मागे तो कुटुंबाला बांधून ठेवू शकला नाही. ही वेळ लवकर आली ती आपल्या नावरसी दिवट्यामुळे हे त्याला पक्के माहीत होते. एका चुलीच्या तीन चुली झाल्या. हळूहळू सगळे आपापल्या स्वतंत्र संसारात रममाण झाले.
सखारामचा दोन नंबरचा मुलगा शहरात मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. सखारामला दिपककडून अपेक्षा होती तो आता तरी शेतीत मदत करेल; पण कसले काय! आता तर आईबाबांबरोबर त्याचे रोज खटके उडू लागले होते.तो व्यसनांच्या आहारी गेला होता. एक दिवस त्याने आपल्या बायकोवरही हात उचलला.
सखाराम आणि सुनीता दोघे कपाळाला हात लावून बसले होते. नावरसी आबासाहेब उर्फ घराण्याच्या कुलदिपकला बिघडवणारे निघून गेले होते आणि त्याचा कायमस्वरूपी ताप कुटुंबाला सहन करावा लागत होता.
समाप्त
समाप्त
©® सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव
११/९/२०२५
११/९/२०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा