नाचता येईना अंगण वाकडे भाग 3 अंतिम
मागील भागात आपण पाहिले सर्जेराव आणि दोस्त मंडळी लोणचे करायचा घाट घालतात . त्यासाठी सर्जेराव आपल्या सासूला बोलावतो . कैऱ्या फोडताना त्यांची प्रचंड धांदल उडते . आता पाहूया पुढे .
" पारू , अंगणात काय पसरलं हाय हे ? "
रखमा म्हणाली .
" अय रखमा , कैऱ्या फोडल्या हाय . "
शिरपा पुढे झाला .
" अगं बया ! हे म्हणजी सुगरण माझी बया आन नवऱ्याची गेली रया . "
पारू मोठ्याने हसली .
पारू मोठ्याने हसली .
" शिरपा , कावळ्याच्या शापान गाय मरत न्हाय . "
सर्जाने उत्तर दिले .
सर्जाने उत्तर दिले .
" रखमे मला तर कुठं गाय दिसत न्हाय . पर सांड दिसत्यात . " पारू हसली .
" हसून पिवळ दात दाखवत्यात ते पार घशात जात्यात का न्हाय बघा . "
सर्जा चिडला .
सर्जा चिडला .
इकडे मंजुळाबाई घाबरली . आजपर्यंत लोणचे तिने प्रत्यक्ष कधीही केले नव्हते . आधी सासूबाई करत आणि नंतर त्यांच्या तालमीत मुली तयार झाल्या . मुलींची लग्न झाल्यावर सरू करायला लागली . पण जावई एवढे विचारतो आणि नाही म्हणायचे कसे ? शेवटी ती पारुकडे गेली .
" म्या काय म्हणते पारे ? बापय माणूस हाय इतक कशाला नादी लागायचं ? "
" म्या कुठं नादी लागले . त्यांनीच सांगितलं अस्स लोणच बनवून दाखवीन . "
" व्हय पर त्वा मला कशाला घेती ह्यात ? "
मंजुळाबाई चिडली .
मंजुळाबाई चिडली .
" मग तू सांगून टाक पारू माहेरून आणायची ते लोणच कोण बनवायचं . "
" पारे , आईला उलटं बोलती व्हय ? आता तुला दाखवते का न्हाय बघ . "
मंजुळाबाई रागाने बाहेर निघून गेली .
मंजुळाबाई रागाने बाहेर निघून गेली .
शेवटी मंजुळाने तिच्या एका मैत्रिणीला फोन लावून सगळे विचारून घेतले . दुसऱ्या दिवशी सर्जा आणि मंजुळा बाजाराला निघाले . जाताना सर्जा मित्रांना कैरीच्या फोडी नीट सुकवून ठेवायच्या सूचना देऊन गेला होता .
" जावाय , समद घेतल आता बघा कसं मस्त लोणच व्हत ते . " मंजुळाबाई स्वतःवर खुश झाली .
दुपारपर्यंत सगळे परत आले .
" चिंगे , पाटा आन वरवंटा धुवून घे . "
" कशाला , मिक्सर हाय की आपल्याकड ."
चिंगीने उत्तर दिले .
" कशाला , मिक्सर हाय की आपल्याकड ."
चिंगीने उत्तर दिले .
" कार्टी आईवर गेली . नुसत उलटं बोलती . सांगते तेवढं कर . " मंजुळाबाई मोहरी वाटायला बसली .
थोड्याच वेळात तिचे दंड भरून आले . घरी ती फक्त हुकूम सोडायची . इथे स्वतःला सगळे काम करायला लागत होते .
सर्जेराव देखील मनातून वैतागला होता . सगळी कामे करावी लागत होती . तरीही हट्टाने ते सगळेजण पुढे रेटत होते .
" मेले , दंड गेल कामातून . चिंगे , उरलेली मोहरी तू वाट . "
" आज्जे , आधीच म्हणलं व्हत मिक्सर वापर आण हिकडं . " चिंगी चिडून आत गेली .
" शिरपा आन रामा त्याल तापवायला ठिवा ."
सर्जा म्हणाला .
सर्जा म्हणाला .
कसेबसे दोघांनी चूल पेटवली . गॅसवर तेल तापवायला मंजुळाबाई नको म्हणाल्या आणि धूर सोसत तेल तापू लागले .
" तुम्हाला सांगते जावाय , आमच्या घरच लोणच समद्यासनी आवडतं . "
" बास का मामी म्हणून तर तुम्हाला बोलावलं . शिरपा समद्यासनी भजी पाव आण ."
सर्जा खुशीत म्हणाला .
सर्जा खुशीत म्हणाला .
शिरपा जाऊन गरमगरम भजी घेऊन आला . मस्त भजी खात सगळे गप्पा हाणत बसले .
अचानक बाहेरून वारा सुटल्याचा आवाज झाला .
" आर पळा लवकर . "
गणपा ओरडला .
तोपर्यंत वळवाच्या पावसाने आपले काम केले होते . सुकायला टाकलेल्या कैऱ्यांच्या फोडी भिजल्या होत्या आणि अर्धे तेल पाण्यात वाहत होते .
कसेबसे सगळे गोळा करून आत आणले . पाऊस आल्याने पारू लवकर घरी आली . घरात झालेला पसारा बघून ती चिडली .
" बया , मला वाटलं लोणच बनून इकायला गेल असलं . "
" पारे , इतक काय बोलती , जाईल की इकायला . आता पाऊस आला म्हणून . "
मंजुळाबाई म्हणाली .
मंजुळाबाई म्हणाली .
" व्हय काय ? नाचता येईना अंगण वाकड . आई सरीला बोलावल हाय म्या . उद्या ती समद बनवून ठिवल . व्हा बाहेर चहा करते समद्याना ."
" आता तूच म्हणती म्हणून , न्हायत मला काय जड नव्हतं ."
मंजुळाबाई असे म्हणताच सगळेजण मोठ्याने हसायला लागले .
" पारू वैनी , खरच साधा जिन्नस बनवायला पण लई मेहनत लागती . नुसत खायचं काम न्हाई ते ."
बाळूने कबुली दिली .
" भावजी आव संसार असाच लोणच्या सारखा असतो . निगुतीन केला तर रंगत जातोय न्हाय तर मंग हाय नाचता येईना अंगण वाकड . "
पारूने आत जाताना चांगलेच अंजन घातले आणि पुरुष मंडळी कानाला खडा लावून यापुढे पदार्थाला नावे ठेवायची नाहीत असे ठरवूनच बाहेर पडली .
©® प्रशांत कुंजीर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा