Login

नागशास्त्र एक अद्भुत गाथा(भाग - दोन)

नागशास्त्र चा पुढचा भाग नक्की वाचा

काही वेळानंतर...


घरी परतल्यावर आपल्या आईला सांगते. “आई , आज मला सारख आवाज देउ नकोस मी खुप बीझी आहे हं.” अस सांगुन वेदांगी आपल्या खोलीत निघुन जाते आणि पुस्तक वाचण्यात मग्न होते. जस ती पुस्तकाची पान उलटायला सुरवात करते तोच तिला एक आवाज ऐकु येतो. “ वेदांगी पुस्तकाला हात लाउ नकोस महागात पडेल अजुन पुस्तक उघडण्याची वेळ आली नाही आहे.”  हे ऐकुन ती त्या दिशेने बघते. तीच्या अंगाचा थरकाप उडतो ती थर थर कापु लागते कारण तो एक मनुष्यरुपी नाग असतो. त्याला बघुन ती खुप घाबरते आणि थरथरत्या आवाजातच त्याला विचारते. “ तु तुम्ही कोण?” तो नाग तिच्याशी बोलु लागतो . “ घाबरु नकोस बाळ, मी तुझा एक हितचिंतक आहे आणि तुला सावध करायला आलो आहे. आत्ता तु जे करत होतीस जर ते केल असतस तर त्याचे परीणाम खुप वाईट झाले असते. कारण अजुन तुझी शक्ती जागृत झाली नाहीये जेव्हा ती शक्ती जागृत होईल तेव्हा त्याचा तुला आपोआप प्रत्यय येईल आणि मग तुला हया पुस्तकाचा अर्थ देखील कळेल. हे पुस्तक साधारण पुस्तक नाहीये हे खुप शक्तीशाली पुस्तक आहे आणि हयाचा संबंध तुझ्या शक्तींशी देखील आहे. म्हणून याच्या मागे वाईट शक्ती लागल्या आहेत हे जर उघडल गेल तर ही गोष्ट लपुन राहणार नाही आणि तुझ्या जीवाला तर धोका होईलच पण हया पुस्तकाला ही धोका असेल. आणि म्हणूनच खुप सांभाळून ठेवल गेल आहे हे. पण तु याला बाहेर काढुन खुप मोठी चुक केली आहेस आता तरी सावध रहा आणि हे पुस्तक जिथे होत तीथे ठेवुन ये. देव तुझ रक्षण करो.” “ पण अजुन देखील मला हे कळल नाहीये की नेमक तुम्ही आहात कोण आणि मला कस ओळखता आणि हे शक्तीच काय प्रकरण आहे हे ही सांगा कृपा करुन” वेदांगी अगदी अगदीग होउन विचारते. नागराज श्रीधर जरा विचारात पडतात आणि काही वेळानंतर एक रहस्य उलगडु लागतात. “ बर ऐक आज तुला एक रहस्य सांगतो नीट ऐक काय माहीत तुला यातुन काही चांगली माहीती मीळेल. आणि यातुनच तुला तुझ्या शक्तीच्या वरदानाबददल देखील समजेल. जस माणसांमध्ये एक समज आहे की, वाईट शक्तींना उत्तर देण्यासाठी चांगल्या शक्तींची गरज असते तसच तु आमच्यासाठी आहेस. तु आमची उध्दारकर्ती आहेस तुझा जन्म आमच्यासाठी झाला आहे अस म्हणलस तरी चालेल. पुढच्या काही काळात आम्हाला तुझी खुप मदत लागणार आहे. पण तुझ्या वयाच्या २५व्या वर्षां नंतर.. कारण तुझी शक्ती २५ व्या वर्षा नंतरच जागृत होईल आणि मग तुझी आम्हाला मदत होईल. ती कशी ते ऐक. मी श्रीधर नागलोकाचा राजा. पण माझ्या ही आधी कालीया नाग नागलोकाचे राजे होते परंतु श्रीकृष्ण आणि त्यांच्या युध्दात कालीया नाग पराभूत झाल्या नंतर जेव्हा ते परत नागलोकात परत आले तेव्हा त्यांना राजगादी वरून काढुन टाकण्यात आल त्या नंतर ते कुठे गेले हे आज पर्यंत समजु शकल नाही आणि त्यांचा मणी देखील कुठे आहे हे देखील समजु शकल नाही त्यांचा शोध लावण्यात आम्हाला तुझी मदत होईल. परंतु हयात खुप अडचणी देखील आहेत त्याचेच मार्ग हया पुस्तकात आहेत ही एक नियती आहे तुझी आणि आमची जी देवाने लिहुन ठेवली आहे आणि हे तुला हळुहळू कळेल.”

क्रमशः



0

🎭 Series Post

View all