Login

नाही करू शकलो मी काही | कविता

Poem About Love.
      नाही करू शकलो मी काहीतू आयुष्यात आलीस
भेटलीस जेव्हा तू मला
झालो तेव्हा सखे तुझा
नाही करू शकलो मी काही

मने लागली होती जुळायला
भेटणं होतं आपलं वाढलं
वेगळंच वळण नात घेत होतं
नाही करू शकलो मी काही

प्रेम झालं होत तुझ्यावर
जीव माझा होता जडला
विसरून गेलो होतो स्वतःला
नाही करू शकलो मी काही

सोबत तुझी खास होती
संगतीने चालायची वाट होती
स्वप्न पाहत गेलो सोबत तुझ्या
नाही करू शकलो मी काही

आली परिस्थिती वाईट माझ्यावर
सर्व काही तेव्हा हरून गेलो
वाटलं होतं मी लढत राहीन पण
नाही करू शकलो मी काही

सोबत तुझी हवीशी वाटली
वाटलं दुःख होतील नाहीशी
पण तूही दूर ती निघून गेलीस
सखे काहीच करू शकलो मी नाही

चेतन सुरेश सकपाळ
0

🎭 Series Post

View all