नकळत सारे घडले - भाग ६३
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
मल्हार मीराला हवा तितका वेळ देत नव्हता. तिला खूपदा त्याच्याशी बोलायचे असायचे, पण तो खूप उशिरा बेडरूममध्ये यायचा, तोपर्यंत मीरा कधी कधी झोपलेली सुद्धा असायची.
एक दिवस मिनल रात्री उशिरा खाली आली पाण्याची बाटली भरायला तेव्हा तिला मल्हार टिव्ही समोर बसलेला दिसला. तिला वाटले हा इतक्या उशिरापर्यंत का बसला असेल? म्हणून ती सरळ त्याला विचारायला जाते.
"दादा, अरे मीरा एकटीच असेल रुममध्ये.. आणि तू काबर असा इथे बसून आहे? ते ही इतक्या उशिरापर्यंत! वाट बघत असणार ती तुझी. जा जाऊन झोप. नवीन लग्न झालंय तुमचं, तिला जरा वेळ दे. सारखंच काय टिव्ही बघत बसतोस. बरं नाही दिसत ते."
मिनल त्याच्यापेक्षा लहान असली तरी तिला इतके समजत होते आणि म्हणूनच त्याला समजावून सांगत होती.
"हम्म्म, जातो थोड्या वेळाने. पण तू का जागी आहेस?"
मल्हार विषय बदलायचा म्हणून बोलत होता.
"मी पाणी घ्यायला आले होते. तू विषय बदलू नकोस."
मिनू त्याच्याकडे बारीक डोळे करून बघत होती.
मिनू त्याच्याकडे बारीक डोळे करून बघत होती.
"मला सगळं कळतंय, फक्त मला जरा वेळ हवा आहे आणि कदाचित मीराला सुद्धा पाहिजे असणार; त्यामुळे उगाच घाई नको.
मल्हार अगदी समजुतीने बोलत होता म्हणून मिनलला पटले.
"अरे पण तिच्याशी निदान बोलायला काय हरकत आहे. तुम्ही काही एकमेकांना अनोळखी आहात का? आधीसारखे तर बोलूच शकतात ना!"
मिनल इतकं बोलून निघून गेली.
मिनल इतकं बोलून निघून गेली.
मिनल इतकं सांगत होती तरीही मल्हार मुद्दाम दुर्लक्ष करत होता; म्हणूनच मिनल तिथून वरती निघून गेली. मीरा एकटीच आहे म्हणून तिच्याशी बोलायला गेली.
"मीरा, झोपलीस का?"
मिनूने हळूच दरवाजा उघडून विचारले.
मिनूने हळूच दरवाजा उघडून विचारले.
"नाही अजून, हे काय पुस्तकच वाचत होते. थोड्या दिवसांनी परीक्षा येईल ना आता."
मीरा पुस्तकं बाजूला ठेवून बोलू लागली.
"अरे वाह! लगेच तयारीला लागली. मस्तच. हुशार आहेस तू, करशील सगळं नीट."
मिनू तिला प्रोत्साहन देत बोलत होती.
"हो, आत्त्या बोलली त्यामुळे मला आणखी हुरूप आला. अभ्यास तर होऊनच जाईल माझा. एकदा वाचले की होऊन जाते माझे. मग काय फक्त परीक्षेच्या एक दिवस आधी गेले तरी बस झाले."
मीरा छान गप्पा मारत होती.
"मम्मी ना सगळ्यांना चांगल शिका म्हणते, स्वतः च्या पायावर उभे रहा म्हणते."
मिनल पण आईचे कौतुक सांगत होती.
"हो ना, पण फक्त.."
इतके बोलून मीरा अचानक गप्प झाली.
"अरे! काय झाले? बोल ना! काही प्रोब्लेम आहे का?"
मिनू तिला बोलत करत होती.
"नाही काही नाही, ते असच जरा."
तरीही मीरा बोलत नव्हती.
"अग बोल बाई, तुला काहीही वाटले तरीही मी तुझी नणंद नंतर आधी मैत्रीण आहे; त्यामुळे तू माझ्याशी अगदी मोकळेपणाने बोलू शकतेस."
मिनलने तिला विश्वासात घेत बोलत केल.
"काल जेव्हा मी ह्यांना विचारले तेव्हा ते सुद्धा हो म्हणाले पुढच्या परीक्षा द्यायला. लग्न झाले म्हणजे शिकायचे नाही असे काही नसते. तू शिक म्हणाले."
मीरा बोलत होती आणि मिनू तिचं ऐकत बसलेली.
"अग मग यात वाईट काय आहे. बरोबर तर बोलला दादा."
मिनू लगेच बोलली.
"हो, त्यांचं सगळं बरोबर आहे.. पण फक्त मला त्यांचं एकच वाक्य नाही आवडलं."
बोलता बोलता मीराचे तोंड पडले.
"काय?"
मिनू मात्र खूप लक्ष देऊन ऐकत होती.
"तू माझी जबाबदारी आहे म्हणे."
मीरा इतके बोलून शांत झाली.
"मग.."
"मला जबाबदारी म्हणण्यापेक्षा तू माझी पत्नी आहे. हे बोलले असते तर जास्त छान वाटले असते मला."
इतके बोलून मीरा पुन्हा गप्प झाली.
इतके बोलून मीरा पुन्हा गप्प झाली.
"मीरा, तू नको वाईट वाटून घेऊ. अग असच सहज बोलून गेला असेल तो. त्याच्या मनात सुद्धा नसेल असे काही. तू नको लक्ष देऊ."
मिनलला कळतं होते मीराला काय म्हणायचे ते.
"हम्म्म, झोपा आता खूप उशीर झालाय."
मीरा आळस देत बोलली.
"हम्म्म, दादा येईल म्हणून पळवतेस ना मला."
मिनू पुन्हा चिडवत बोलली.
"हा हा हा.. तसे काहीच नाही. आमच्यात साधे अजून इतके बोलणे पण होत नाही. तू उगाच वेगळा अर्थ नको काढू."
मीरा अंथरूण घेत बोलली तसे मिनल आश्चर्याने बघत होती.
"अग खरचं, तुझा दादा म्हणे आपण वेळ द्यावा एकमेकांना."
मीरा इतके बोलून पाठ फिरवली.
"मीरा, मला कळतय सगळं. तू नको काळजी करू. होईल सगळं नीट. लवकरच."
इतके बोलून ती मीराकडे बघते. तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या सारख्या जाणवत होत्या.
पण इकडे मल्हारला वाटतं होते त्याच्यातच काही कमी असेल, म्हणून मिताली त्याला सोडून पळून गेली. आणि म्हणूनच तो स्वतः ला कमी समजू लागला होता. मीरा सोबत लग्न होऊनही तो तिच्या जवळ जात नव्हता. आधी ते बोलायचे तसे मैत्रीपूर्वक तरी बोलावे असे मीराला कायम वाटायचे. निदान त्याच्या मनात काय आहे हे तरी समजेल, पण मल्हार कायमच शांत असायचा. मीरा बोलायला लागली की तो उठून निघून जायचा आणि ती झोपली तेव्हाच रूममध्ये परत यायचा. काही दिवसांनी हे मीराला सुद्धा समजले होते त्याचे वागणे. तेव्हापासून ती स्वतचं त्याच्याशी बोलणे टाळत होती, पण असे किती दिवस चालणार होते. कधी ना कधी बोलावेच लागणार होते. नवरा बायको म्हणून बाहेर एक आणि घरात एका खोलीत वेगळेच रूप दिसून यायचे त्याचे.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा