नकळत सारे घडले - भाग १
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर - जानेवारी 2025-2026
"अरे मुलगी पळाली! तरी सांगत होतो सगळे नीट पाहून घ्या, पण माझे ऐकतय कोण? सगळा आपला मनाचा कारभार. आता भोगा."
नवऱ्या मुलाचे लहान मामा तिथे असलेल्या सगळ्यांवर ओरडून बोलत होते.
नवऱ्या मुलाचे लहान मामा तिथे असलेल्या सगळ्यांवर ओरडून बोलत होते.
"तुम्ही आधी शांत व्हा बरं! सगळे बघताय तुमच्याकडे."
मामी, मामांना हाताला धरून शांत व्हा म्हणून सांगत होत्या.
"आता आलेल्या पाहुण्यांना कसे तोंड देणार आहात तुम्ही? काही विचार केला आहे का? इतक्या लांबून लांबून पाहुण्यांनी भरलेल्या गाड्या कार्यालया पुढे येऊन थांबताय. आता काय सांगणार त्यांना, की नवरी मुलगी पळून गेली; त्यामुळे लग्न कॅन्सल केलं आम्ही. शी! असं बोलायला सुद्धा लाज वाटते आपल्याला आणि ती मुलगी खुशाल तोंड काळं करून पळून गेली.. आणि मला म्हणताय शांत व्हा."
मामांचा पारा चांगलाच चढला होता. ते काही गप्प बसत नव्हते.
मामांचा पारा चांगलाच चढला होता. ते काही गप्प बसत नव्हते.
मुलाचे आई आणि वडील दोघेही शांतपणे खुर्चीवर खाली मान घालून बसलेले होते. येणाऱ्या पाहुण्यांना कसे तोंड द्यायचे? याचा विचार करूनच त्यांना जास्त टेन्शन येत होते. दोघे पण तोंडातून एक शब्द सुद्धा बोलत नव्हते.
इतक्या दिवसांची तयारी, मेहनत आणि सर्व खर्च बघता कोण भरून देणार हे! हाच विचार सगळ्यांच्या मनात घोळत होता. आजूबाजूला पाहुण्यांची होणारी कुजबुज स्पष्ट ऐकू येत होती, पण त्यांना उत्तर द्यायला कोणीच धजत नव्हते. या सगळ्यात चूक कोणाची?
तिथे असलेले पाहुणे मुलीला दोष देत होते, पण तिचे आई वडील देखील तिथेच मंडपात होते. त्यांना सुद्धा हे पचवणे जड जात होते, की त्यांची मुलगी पळून गेली आहे; त्यामुळे तिच्या आई वडिलांना बोलून काहीच उपयोग नव्हता. उगाच त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले असते; त्यामुळे शक्य होईल तितके त्यांच्याशी शांतपणे बोलणे सुरू होते, पण मामांचा मधेच आवाज चढत होता. त्यांना हे जे काही झाले होते ते मुळीच आवडलेले नव्हते; त्यामुळे मुलीच्या आई वडिलांची यात चूक जरी नसली तरी ह्या सगळ्याला ते सुद्धा कुठे ना कुठे कारणीभूत असणारच! म्हणून मामांची त्यांच्यावर चिडचिड होत होती.
"अहो शांत व्हा, तुम्हाला जितका त्रास होतोय त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आम्हाला जास्त त्रास होतोय. आमची मुलगी अशी अचानक भर मंडपातून पळून गेली. आता काही तासांनी तिचे लग्न होणार होते. किती स्वप्न बघितली होती आम्ही तिच्या लग्नाची. काय चूक झाली आमची, की तिने हे पाऊल उचलण्याआधी आमचा जरा सुद्धा विचार केला नसेल."
मुलीची आई रडत रडत बोलत होती. तिला हे सगळे असह्य होतं होते. काय बोलावं आणि काय नाही हे सुद्धा कळत नव्हते. रडून रडून त्यांचे डोळे लाल झालेले होते.
"तुम्हाला माहिती असणार हे सगळं घडणार होते ते, म्हणूनच तुम्ही तिच्या लग्नाची इतकी घाई करत होतात. तारीख पण अगदी महिन्याभरातलीच काढली होती. तुमचं नक्कीच काहीतरी गौडबंगाल असणार यामागे."
लहान मामा बोलतच होते. इतक्या पाहुण्यांमध्ये फक्त तेच एकटे बोलत होते, कारण त्यांना त्यांच्या बहिणीची काळजी वाटत होती. तिची बाजू सांभाळून घेणारे आणि बोलणारे ते एकटेच होते. बाकी लोकं तर फक्त गमंत बघत होते. काही लोकं नुसते हातावर हात धरून खाली माना घालून बसून होते. काही घरातले असूनही फक्त बघ्याची भूमिका घेत होते; त्यामुळे लहान मामांचा पारा आणखी वाढत होता.
आता पुढे काय होते ते बघुया लवकरच पुढील भागात.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंगमध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा