नकळत सारे घडले - भाग ३
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
"मितूची आई, चला आता घरी. इथे थांबून तरी काय करणार? आणखी त्रास आपल्यालाच होईल."
मितालीचे वडील आईला सांगत होते.
मुलीकडचे पाहुणे सगळेच तोंड लपवून होते. खरंतर ह्या सगळ्यात त्यांची कोणाची चूक नव्हतीच, पण तरीही त्यांना खाली मान घालायला नियतीने भाग पाडले होते. मुलीचे मामा मामी, काका काकू त्यांच्याकडाच्या पाहुण्यांना घरी जाण्यास सांगत होते. त्यांना हे सगळं करायला जड जात होते, पण तरीही आलेल्या परिस्थितीला तोंड तर द्यावेच लागणार होते. एका मुलीची शिक्षा सगळ्यांना भोगावी लागतं होती.
"मी काय म्हणतो, तुम्ही कार्यालय वाल्यांना सांगून बाहेर एक बोर्ड लावा."
मल्हारचे मामा मुलीच्या मामाला सांगू लागले.
मल्हारचे मामा मुलीच्या मामाला सांगू लागले.
"पण त्यावर लिहायचं काय?"
मामांना मोठा प्रश्न पडला.
मामांना मोठा प्रश्न पडला.
"मुलीच्या आजोबांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे लग्न कॅन्सल झाले आहे; त्यामुळे आलेल्या सर्व पाहुण्यांची मनापासून माफी असावी."
तात्यांनी त्यांना मजकूर समजावून सांगितला आणि त्यांना तो पटला देखील.
तात्यांनी त्यांना मजकूर समजावून सांगितला आणि त्यांना तो पटला देखील.
"तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. प्रत्येकाला तोंड देणे खरचं शक्य नाही आणि प्रत्येकाला काय सांगावे हे ही कळत नाहीये."
मुलीच्या मामांनी त्यांची बाजू सांगितली.
मुलीच्या मामांनी त्यांची बाजू सांगितली.
"मी समजू शकतो, यात तुमची तरी काय चूक. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ."
तात्यांनी त्यांना दिलासा दिला.
तात्यांनी त्यांना दिलासा दिला.
"तुम्ही खरचं खूप चांगली मंडळी आहात, आमची भाची तुमच्या घरात खूप सुखी राहिली असती. काय माहिती तिच्या मनात काय चालू होते आणि तिला अशी दुर्बुद्धी सुचली. इतके सगळे झाले तरीही मुलाचे आई वडील खूप समजून घेत आहेत आणि शांत आहेत. काहीही आरडाओरडा नाही की भांडण नाही, नाहीतर लोकं मारामारी करायला सुद्धा कमी करत नाहीत. तुम्ही खूप भली माणसं आहात. मी खरचं मनापासून माफी मागतो तुम्हा सगळ्यांची."
मुलीचे मामा सगळ्यांसमोर हात जोडून उभे होते. त्यांना असे बघून सगळ्यांनाच वाईट वाटतं होते.
मुलीचे मामा सगळ्यांसमोर हात जोडून उभे होते. त्यांना असे बघून सगळ्यांनाच वाईट वाटतं होते.
"मामा अहो हे काय करताय तुम्ही, तुम्ही नका असे हात जोडू."
तात्यांनी त्यांच्या पाठीवर हात ठेवत दिलासा दिला.
तात्यांनी त्यांच्या पाठीवर हात ठेवत दिलासा दिला.
"आजपर्यंत ज्या भाचीसाठी आम्ही लहानपणापासून तिचे सर्व लाड पुरवले, तिने आज हे ही करायला भाग पाडले. आमच्या स्वप्नात सुद्धा हा विचार आला नव्हता कधी, जे आज घडतंय."
मामांचे डोळे भरून येत होते.
मल्हारच्या मामांच्या सांगण्यावरून बाहेर बोर्ड लावण्यात आला. तो बोर्ड वाचून गावातली बरीचशी पाहुणे मंडळी आता न येता बाहेरच्या बाहेर निघून जात होती. चर्चा तर चांगलीच होणारच होती आख्ख्या गावात, पण थोड्या दिवसांनी वातावरण शांत झाल्यावर विसरून जातील सगळे, पण मितलीच्या आई वडिलांचे काय? त्यांना हा त्रास कायमच आठवणीत राहणारा होता. मनात मुलीविषयी ही सल कायम धगधगत राहणार होती.
पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी वाचत राहा.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंगमध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा