नकळत सारे घडले - भाग ११
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
"मीरा.. आपण सगळ्यात आधी मीरा आणि मल्हारला विचारायला हवे."
मल्हारच्या आईने सगळ्यांकडे बघून बोलले.
मल्हारच्या आईने सगळ्यांकडे बघून बोलले.
"पण त्या आधी मी तुझ्या भाऊजींसोबत पण बोलून घेते. त्यांना पण सांगायला हवे, ही बातमी ऐकून त्यांना जास्त आनंद होईल. बराच वेळ झाला ते खूप टेन्शनमधे बसलेले आहे. सकाळपासून कोणाशी बोलले नाही की त्यांनी काही खाल्ले सुद्धा नाही. मला तर ह्यांचच खूप टेन्शन आलं होतं."
ताई खूप काळजीत बोलत होती.
ताई खूप काळजीत बोलत होती.
"मी त्यांना इथेच घेऊन येतो, तुम्ही सर्व इथेच थांबा. आलोच मी."
असे म्हणून नाना त्यांना घ्यायला गेले.
असे म्हणून नाना त्यांना घ्यायला गेले.
"भाऊजी, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. ते.. तुमची काही हरकत नसेल तर माझी मुलगी मीरा तुम्हाला सून म्हणून चालेल?"
तात्यांनी डायरेक्ट बोलून टाकले.
तात्यांनी डायरेक्ट बोलून टाकले.
तात्या त्यांच्यासोबत होते आणि ताई मात्र मल्हारच्या वडिलांकडे बघून आनंदाने होकारात मान डोलवत होत्या. त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.
"तात्या, तुम्ही खरचं खूप मोठा निर्णय घेतला आणि आपल्या सगळ्यांसाठी तो अगदी योग्य असणार यात शंका नाही. तुम्ही अगदी योग्य वेळी धावून आलात आमच्यासाठी, कसे आभार मानू तुमचे."
मल्हारचे वडील तात्यांसोबत बोलत होते.
मल्हारचे वडील तात्यांसोबत बोलत होते.
"अहो भाऊजी, तुम्ही तरी असे नका म्हणू. माझ्या मनात जे आले ते मी बोलून दाखवले. तुम्हाला योग्य वाटतं असेल तर आपण लगेच पुढची तयारी करूया."
तात्यांनी हात जोडून त्यांचे हात हातात घेतले आणि आता ह्यावेळी सुनिता बाई पण खुश दिसत होत्या.
तात्यांनी हात जोडून त्यांचे हात हातात घेतले आणि आता ह्यावेळी सुनिता बाई पण खुश दिसत होत्या.
"तुमच्या दोघांना काहीच हरकत नाही म्हंटल्यावर आम्हाला आनंद आहे, फक्त आता दोघा मुलांना लवकरात लवकर तयार करा आणि लग्न लावून मोकळे व्हा."
नानांनी अगदी आनंदाने म्हटले तसे सगळेच खुश झाले.
"हो, मल्हारसोबत मी बोलतो. त्याची काळजी तुम्ही करू नका."
मल्हारचे वडील तात्यांना खुश होऊन म्हणाले.
मल्हारचे वडील तात्यांना खुश होऊन म्हणाले.
"मी मीरा सोबत बोलून घेतो, ती पण नाही म्हणणार नाही."
तात्यांनी पण लगेच तयारी दाखवली.
"तात्या थांब! इथे आपण सगळे खुश होतोय, पण मल्हार आणि मीरा यांच्या वयात जवळजवळ सात आठ वर्षांचे अंतर आहे. तुम्हाला माहिती आहे ना!"
ताईने आधीच बोलून घेतले.
ताईने आधीच बोलून घेतले.
"हो, माझी काहीच हरकत नाही."
तात्या इतके बोलून मीरासोबत बोलायला तिथून निघून गेले.
"अहो, मी काय म्हणते.. थांबा की जरा."
सुनिता बाई तात्यांच्या मागे मागे पळत होत्या.
"आता काय, ताई आणि भाऊजी किती खुश आहेत. मला माहिती होते त्यांना आपली मीरा सून म्हणून नक्कीच आवडणार."
तात्या अगदी खुश होऊन बोलले.
"अहो ते नाही. आता लगेच ह्याच मांडवात लग्न लावणार आहात का तुम्ही?"
सुनिता बाई जरा काळजीत दिसल्या.
सुनिता बाई जरा काळजीत दिसल्या.
"हो मग, ह्याच म्हणजे. हेच ठरले होते आपले. निदान माझे तरी."
तात्या जोर देऊन बोलले.
तात्या जोर देऊन बोलले.
"तुम्ही म्हणताय ते शक्य झाले तरी आपल्याला थोडी फार तरी तयारी करावी लागेलच ना!"
सुनिता बाई कळकळीने बोलल्या.
सुनिता बाई कळकळीने बोलल्या.
"आता अजून कसली तयारी पाहिजे तुला? सगळेच तयार आहे इथे. मांडव आहे, आपले सर्व पाहुणे देखील इथेच आहेत.. मग अजून काय पाहिजे."
तात्यांना काही कळत नव्हते.
तात्यांना काही कळत नव्हते.
"अहो ते सर्व सोडून मुलीचे लग्न म्हंटले, की किती तयारी असते. तिची साडी, दागिने आणि बरेच काही."
सुनिता बाई एक एक करून सांगू लागल्या.
"मी करतो सगळी तयारी, तुम्ही त्याची काळजी करू नका. आधी मीरासोबत बोलून घेऊ."
तात्यांना आता कसलाच अडथळा नको होता.
बोलत बोलत ते दोघे तिघे मीरा जवळ आले. ती सर्व पोरींमधे बसलेली दिसत होती. सगळ्या बहिणीच लागत होत्या. कोणी मोठ्या तर कोणी तिच्यापेक्षा लहान होत्या आणि काहींचे लग्न देखील झालेले होते. नात्यातल्याच होत्या सगळ्या जणी; त्यामुळे बिनधास्त बोलायला काही हरकत नव्हती.
"मीरा.. ए मीरा."
मीरा घोळक्यात बसून बोलत होती; त्यामुळे बहुतेक तिला ऐकू आले नसावे.
मीरा घोळक्यात बसून बोलत होती; त्यामुळे बहुतेक तिला ऐकू आले नसावे.
"हा पप्पा, काय झाले? तुम्ही सगळे असे अचानक का जमले."
मीरा सगळ्यांना तिच्यासमोर बघून जरा घाबरली.
मीराला तिच्या लग्नाचे कळल्यावर काय वाटेल तिला? तयार होईल का ती? जाणून घेऊया पुढील भागात.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा