नकळत सारे घडले - भाग १२
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
"मीरा, आम्हाला जरा बोलायचं होतं तुझ्याशी."
तात्या अगदी उत्साहात धावत तिच्याकडे बोलायला आले, पण आता तिच्यासमोर तोंडातून लवकर शब्द बाहेर पडत नव्हते.
"हा पप्पा, बोला ना! काही गडबड झाली का परत? तुम्ही सगळे असे का टेन्शनमध्ये दिसताय मला."
मीरा सगळ्यांकडे बघून काळजीने विचारत होती.
मीरा सगळ्यांकडे बघून काळजीने विचारत होती.
"मीरा, मल्हारचे आजचे होणारे लग्न तर मोडले. खूप वाईट झाले."
तात्यांना बोलायला सुचत नाही हे पाहून सुनिता बाई पुढे होऊन बोलू लागल्या.
"हो ना, कशी आहे ती मुलगी. स्वतः च्या लग्नाच्या दिवशी असं कोणी पळून जातं का? अशाने आई वडिलांची किती बदनामी होते. अजिबात अक्कल नसेल त्या मुलीला तर! आपला मल्हार किती खुश होता. त्याला किती हर्ट झाले असणार."
जमलेल्या चुलत बहिणीचे बोलणे सुरू झाले.
जमलेल्या चुलत बहिणीचे बोलणे सुरू झाले.
"हो, म्हणूनच आम्ही सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला आहे."
तात्या बोलू लागले तसे सगळ्या जणी त्यांच्याकडे पाहू लागल्या.
"काय काका, आपण सर्व जण इथून लवकरच निघणार आहोत ना! आता जास्त उशीर नको करायला. इथे थांबून काही होणार नाही."
एकीने बोलून दाखवले.
"हो, लवकरच निघू आपण इथून.. पण लग्न लावल्यावरच."
तात्या बोलले तसे सगळ्या जणी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या.
"काय? ती नवरी तर सकाळीच पळून गेली ना!"
मीरासोबत तिच्या बाजूला उभी असलेली बहीण बोलली.
मीरासोबत तिच्या बाजूला उभी असलेली बहीण बोलली.
"तिचा आता कोणीही विचार करू नका. मल्हारसाठी दुसरी नवरी ठरवली आहे आपण.. आणि त्याच विषयी आम्ही इथे बोलायला आलो आहोत."
नानांनी पण सगळ्यांना सांगितले तसे सगळ्या जणी खुश झाल्या.
नानांनी पण सगळ्यांना सांगितले तसे सगळ्या जणी खुश झाल्या.
"काय नाना काका, म्हणजे मल्हारचे लग्न होणार! ही तर खूप आनंदाची बातमी आहे."
जमलेल्या सगळ्या जणी खुश झाल्या.
जमलेल्या सगळ्या जणी खुश झाल्या.
"पण मुलगी कोण आहे."
दुसऱ्या बहिणीने लगेच उत्साहात विचारले.
"आपली मीरा."
तात्यां सगळ्यांसमोर तिच्याकडे बघत बोलले तसे सगळ्या जणी मीराकडे बघू लागल्या, पण मीरा मात्र एकदम शॉकमध्ये होती.
"आपल्या मीरा आणि मल्हारचे लग्न, हे तर खूपच छान झाले.. अगदी सोन्याहून पिवळे."
दुसऱ्या बहिणीने खुश होतं बोलून दाखवले.
"मम्मी.."
मीराला काय बोलायचं हेच कळतं नव्हते. पप्पा अचानकपणे तिच्यासमोर येऊन असे काही बोलतील हा तिने स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल. मीरा तिथून निघून जाऊ लागली. तिच्या मागे सुनिता बाई पण जाऊ लागल्या आणि सोबत तात्या पण गेले. बाकीचे तिथेच बोलत बसले होते. मीराला थोडे विचित्र वाटले पण बाकीच्यांना खूपच आनंद झालेला दिसून येत होता. जवळजवळ सर्व कार्यालयात ही बातमी आता वाऱ्यासारखी पसरत होती.
"मीरा.. थांब मीरा माझे ऐकून तरी घे!"
तात्या तिला बोलले तसे ती लगेच थांबली.
तात्या तिला बोलले तसे ती लगेच थांबली.
"पप्पा, अहो हे असे अचानक माझ्या लग्नाचे काय काढले मध्येच."
मीराला बहुतेक आवडले नव्हते.
"हे बघ बाळा, आताची परिस्थिती बघता मला दुसरे काही सुचले नाही. मल्हारचे लग्न मोडले; त्यामुळे ताईच्या घरची किती बदनामी होईल. ते दोघेही किती टेन्शनमध्ये आहे. माझ्या मनात फक्त हा एकच विचार आला. माझे बोलणे सुद्धा झाले सगळ्यांसोबत.. आता तू नाही म्हणू नकोस. माझ्या ताईसाठी मी हा निर्णय घेतला आहे."
तात्या हळूहळू तिच्याशी अगदी शांततेत बोलत होते. सुनिता बाई पण तिच्याकडे आशेने बघत होत्या.
"पप्पा अहो, मी अजून लग्नाचा विचार सुद्धा केला नाहीये."
मीराला काय बोलावं तेच कळतं नव्हतं.
"मला माहिती आहे, तुला पुढे अजून शिकायचं आहे. नोकरी करायची आहे. स्वतः च्या पायावर उभं राहायचं आहे. काहीतरी करून दाखवायचं आहे. आम्हाला तुझी ही सगळी स्वप्न पूर्ण होताना बघायची आहेच, पण बेटा आता परिस्थितीच तशी निर्माण झाली आहे, की आम्हाला याशिवाय पर्याय नाही."
तात्या अगदी हतबल होऊन बोलत होते.
"तुम्हाला सगळं माहिती आहे आणि तरीही तुम्ही मला हे करायला भाग पाडत आहात."
मीरा शांतपणे आपले म्हणणे पटवून देत होती.
"तुला तुझी आत्त्या माहिती आहेच, ती तुझ्यावर कित्ती प्रेम करते. एकुलती एक भाची म्हणून अगदी सगळेच तुझी काळजी करतात. तुझा शब्द सुद्धा कोणी खाली पडू देत नाहीत. आणि ते घर काही तुला परके नाही. ताई तर तुला डोक्यावर घेऊन मिरवेल. तिच्याशी तुमच्या दोघांच्या लग्नाबद्दल बोलल्या बरोबर दोघे खूपच आनंदी झाले."
तात्यां अगदी भावूक झाल्यासारखे बोलत होते.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा